Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ चालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनाच्या पाठपुराव्याला यश.... ------------------------------ परिवहन विभागाने मंञालयात बोलावली सयुंक्तिक बैठक......

 खोपोली  प्रतिनिधीं ..किशोर  साळुंके                 रिक्षा टॅक्सी चालकांचे अनेक वर्ष शासन दरबारी रिक्षा टॅक्सी चालकांचे खुले रिक्षा परवाने बंद करणे, कल्याणकारी महामंडळ अमलबजावणी प्रलंबित भाडे दरवाढ व इतर मागण्या तातकाळ सोडविणे संदर्भात मंञलयात नामदार मा . अनिल  परब परिवहन मंञी मा. अविनाश ढाकणे परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य व मुबंई एम,एम,आरटीऐ क्षेञातील रिक्षा टॅक्सी संघटना प्रतिनिधी यांची सयुंक्तिक बैठक दिनांक २७ नोव्हेबंर रोजी सांयकाळी पाच वाजता बोलावली होती . रिक्षा टॅक्सी संघटनाचां सात्तत्याने केलेला पाठपुरावा याची दखल घेऊन खुद्द परिवहन मंञी यांनी परिवहन विभागास संयुक्तिक बैठक आयोजनाचे निर्देश दिले होते . यामुळे रिक्षा  टॅक्सी चालकांच्या काही प्रमुख मागण्या लवकरच मान्य होतील अशी खाञी आहे . बैठकित मुबंई प्रमुख रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर नाना यांनी प्रलंबित मागण्या सोबतच दहा वर्ष जुनी रिक्षा परवान्यावर बदली करण्याची परवानगी द्यावी ही  मागणी केली उपरोक्त बैठकीस कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर नाना,  खालापूर

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साजगांव यात्रेवर कोरोनाचे संकट :यात्रा रद्द खोपोली (सचिन यादव):संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध

       खोपोली (सचिन यादव):संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या खोपोली साजगांव मधिल बोंबल्या विठोबा च्या यात्रेवर कोरोनाचे संकट पसरले असून कोरोना आजार पुन्हा मोठया जोमाने डोके वर काढत असल्याने या वर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व ग्रामस्थांनी घेतल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.       संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी सध्या विविध देवतांच्या यात्रांचा महोत्सव सुरु होत असून पंढरपूर यात्रे नंतरचा पहिल्या यात्रेचा मान खोपोलीतील साजगांव यात्रेचा असतो. बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे. धाकटी पंढरी म्हणून ख्याती असलेली ही भूमी जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. स्वतः तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत असल्याची नोंद आहे.तेव्हा पासून अद्याप पर्यंत अव्याहत पणे सुरु असलेल्या या यात्रेच्या परंपरेवर कोरोनाने खंड पाडला असून या वर्षी पहिल्यांदाच जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना मुळे ही यात्रा रद्द झाली आहे.       येणाऱ्या एकादशी पासून सुरु होणारी ही यात्रा पंधरा दिवस चालते. करोडो रुपयांची उलाढाल होऊन शेकडो कुटुंबांचा उदर निर्वाह चालतो.

महिला बचत गटाचे कर्जमाफीसाठी रायगडात मनसेचा मोर्चा

*कर्जत : प्रतिनिधी* मराठीहृदसम्राट सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हामधील महिला बचत गट यांच्या समर्थनार्थ मायक्रोफायनांस कंपनी विरोधात  महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते श्री.शिरीष सावंत, सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीपबाप्पू धोत्रे,मनसे सरचिटणीस रिटाताई गुप्ता,महिला उपाध्यक्षा स्नेहल जाधव आणि रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतत्वाखाली   मोर्चा   काढण्यात आला.     महिलांनी बचत गट कर्ज घेताना आपल्या कर्जातून विमा रक्कम काढून घेतली जात असते.तो विमा हा संकट आल्यावर लागू केला जातो,परंतु विमा रक्कम काढून घेऊन त्याचे सर्टिफिकेट मिळाले नाही त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीत विमा लागू करणे अशक्य झाले आहे.व्यवसाय बुडाले साहित्याची नासाडी झाली यामुळे महिलांना आता नव्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे.तरी सरकारने यामध्ये योग्य मार्ग काढून अडचणीत आलेल्या महिलांना दिलासा देण्यासाठी बचतगटांनी घेतलेले कर्ज माफ करावे,अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून मनसेच्या वतीने करण्यात आली.    सदर मोर्चाला मनसे उपाध्यक्षा अनिशा माजगावकर,महिला जिल्हाअध्यक्षा  स्वप्ना दे