Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021
 पाली खोपोली महामार्ग विनफिट कंपनी मे अखेर पुर्ण करणार ....................................... डायरेक्टर समीर जेधे व शंकर पाटिल यांचे प्रतिपादन ........................................ स्थानिक अनुभवी रवी देवकर यांच्या सारख्या अनुभवी ठेकेदारांमुळे उत्कृष्ट दर्जाचे काम ==================== खोपोली (प्रतिनिधी )- ⭕पाली खोपोली महामार्गचे काम 2016/17 चे काळात मंजूर होऊन सुरु झाले... ⭕साधारण 40 किमी चे काम आहे.. ⭕मूळ ठेकेदाराकडून कोरोना काळापर्यंत दोन पोट ठेकेदारांनी काम घेतले.. ⭕दोन्ही ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम करत तुकड्या -तुकड्यात काम केले.. ⭕त्याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना होत होता... ⭕सरते शेवटी विनफिट टेक्नो इंजिनियर्स प्रा. लि. कंपनीने हे काम हाती घेतले... ⭕20नोव्हेंबर 20रोजी या कंपनीने काम हाती घेतले.... ⭕या कंपनीचे डायरेक्टर शंकर औराडे पाटिल व समीर जेधे यांनी सर्व रस्त्याचा सर्वे केला.. ⭕सर्व ठिकाणी निकृष्ट व अर्धवट तुकड्यात काम होते.... ⭕नदी, नाल्यावरील ब्रिज -मोऱ्या अर्धवट होत्या... ⭕संपूर्ण सर्वे पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली... ⭕आज मितीस 22 किमी पर्य
 खोपोली प्रतिनिधी -किशोर साळुंखे -    मोहोनवाडी रोडच्या कामात खो घारणारा तो  विकासकंठक कोण .... *  सदर काम त्वरीत सूरु न केल्यास नगरपालिकेवर येथील  नागरीकांचा आक्रोश मोर्च... * प्रभाग  ३ मधील कार्यसम्राट समजले जाणारे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून  लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन २८ नोहेंबर रोजी मोहोनवाडी,प्रकाशनगर ,चैतन्यनगर येथील नागरीकांसाठी रस्ता रुंदीकरण व पुलाच्या  अतिमत्वाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.......    * गेली अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेला  रस्ता रुंदीकरण व पुलाच्या    कामाला  पाच ते सहा दिवसात  सूरुवात झाली होती.... *  नागरिकांसाठी वरिल पुल व वाढीव रस्त्याचे  काम   लवकरात लवकर मार्गी लावून  लोकार्पण करण्याच्या उद्देशाने संबंधित ठेकेराराने आवश्यक साधनसामग्री लावून सदर कामाला जोरदार सूरवात केली होती... * या विभागातील  हजारो नागरीक सद्या मोहोन राँकी कंपनीच्या जागेतून ये जा करत असून  नागरीकांना कंंपनीकडून  या रोडवरुन ये जा करण्यास मज्जाव केला  जात आहे... पर्यायाने येथील नागरीकांना लक्ष्मीनगर मार्गाने बाजारपेठ व अन्य महत्वाच्या  कामासाठी लांबच्या पल्याने प्रवास

खोपोली नगरपरिषदे तर्फे शंभर टक्के घरपट्टी /पाणीपट्टी भरणा करणार्या मालमत्ता करदात्यांसाठी ग्रिन कार्ड कर सवलत योजना शुभारंभ सोहळा संप्पन्न .....

किशोर साळुंखे :-  खोपोली शहराच्या विकासाकरिता  कर भरणा करण्याचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी   केले खोपोलीकरांना  आवाहन ...............      *   खोपोली -- खोपोली नगरपरिषद , नागरिक व  शहरातील काही  व्यापारी यांच्या संकल्पनेतून खोपोली नगरपरिषद घरपट्टी / पाणीपट्टी कर सवलत योजनेचा आज दि.०५/ ०२/ २०२१ रोजी पालिकेच्या नविन इमारतींमधे ग्रिन कार्ड   कर सवलत योजनेचा शुभारंभ सोहळा संप्पन्न झाला.खोपोली शहरातील तमाम करदात्यांना मूलभूत सुखसूविधा देण्याकरता नागरीकांनी कर   लवकरात लवकर  भरणा करण्याचे खोपोली नपाचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी यावेळी  आवाहन करत नागरिकांना पालिकेत येवून वेळ वाया न घालवता  काही दिवसांमधेच  नागरिंकांना घरबसल्याच  आँनलाईन पद्धतीने कर भरणा करण्याची सुविधा सूरु करणार   असल्याचेही या सोहळ्या  प्रसंगी  बोलत होते. शहरातील करदात्यांनी  शंभर टक्के कर भरुन  शहराच्या विकासासाठी  पालिकेला सहकार्य करावे यासाठी खोपोली शहरातील काही सुज्ञ   दूकानदार ,मेडिकल व हाँटेल मालकांनी पूढाकार घेत ०१ /फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत १००%  कर भरणार्या नागरिकांसाठी ग्रिन कार्ड योजनेत सहभाग घेत

सहजसेवा फाउंडेशन च्या वतीने बीड खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मास्क वाटप...

किशोर साळूंखे :- कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू होत आहेत. शहरात व ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद विद्यार्थी व पालक देत आहेत. बीड येथील जिल्हा परिषदेची शाळा सुरू होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांना सहजसेवा फाउंडेशच्या माध्यमातून मास्क दिनांक 01 फेब्रुवारी रोजी देण्यात आले. यावेळी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपक्रम प्रमुख कीर्ती ओसवाल, बी. निरंजन,रायगड जिल्हा परिषद बीड खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जैन व शिक्षक वर्ग, डॉ. थोरात, आरोग्यसेवक श्री.काळे,ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. भाऊ पवार,मयूर मुंढे,लवेश कर्णुक उपस्थित होते.  या उपक्रमासाठी उपक्रम प्रमुख  श्री. कीर्ती ओसवाल यांचे विशेष सहाय्य लाभले.रायगड जिल्हा परिषद शाळा बीड खुर्द यांच्या वतीने सहजसेवा फाउंडेशन व शाळेला नेहमीच मदत करणारे लवेश लवेश कर्णुक यांचे आभार मानण्यात आले.