Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन व  पुरस्कार प्रधान सोहळा उत्साहात संपन्न

(खोपोली - किशोर साळुंके ) ) - रायगड प्रेस क्लब संलग्न खालापूर प्रेस क्लब चा १४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्ताजी मसुरकर, शिवसेना नेते सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मतदार संघ अध्यक्ष संतोष बैलमारे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी , शेकाप चिटणीस संदीप पाटील, यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर उपस्थित होते. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यात आघाडीच्या वृत्त निवेदिक विलास बडे यांनी आजकी पत्रकारिता या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले . वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक

श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. शेखर जांभळे यांनी आयोजीत केला उपक्रम... खोपोली... .

आर्मी,नेव्ही व एअर फोर्स मध्ये प्रवेशासाठी सहज मार्गदर्शन शिबिर संपन्न... श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. शेखर जांभळे यांनी आयोजीत केला उपक्रम... खोपोली... ( किशोर साळुंके ) सहज सेवा फाउंडेशन विवीध क्षेत्रात सातत्यपूर्ण सामाजीक कार्य करीत असते.शिक्षण क्षेत्रातील वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षण मिळावे या हेतूने वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी असणारी सहज निसर्ग शाळा ही समाजास आदर्श देणारी ठरत आहे.शिक्षण क्षेत्रातील सामाजीक भावनेतून नवीन उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या मातोश्री श्रीमती अलका तुळशीदास जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर सामाजीक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सैन्यात जाण्याची इच्छा बऱ्याच विद्यार्थ्यांची असते, परंतु योग्य माहिती नसल्याने ही इच्छा प्रत्यक्षात उतरत नाही. यासाठी 10 वी पासूनच तयारी केल्याने तिन्ही दलात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अचूक व अनुभवी मार्गदर्शन दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी लोहाणा समाज हॉल, खोपोली येथे सहजसेवा फाउंडेशनच्या माध्

शितल गायकवाड कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड २०२२ ने सन्मानित.

शितल गायकवाड कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड २०२२ ने सन्मानित (खोपोली - किशोर साळुंके ) - शोतोकोन क राटे स्पोर्ट्स असोसिएशन ने आता पर्यंत केल्याल्या कामगिरीला आता खऱ्या अर्थाने यश मिळायला सुर्वात झाली आहे. पहिल्यांदा अथक परिश्रमाचे श्रेय आणि आता या गुणांचे कौतुक असा काहीसा अनुभव या असोसिएशनच्या संचालिका शितल गायकवाड यांना अनुभवायला मिळत आहे.पुण्यातील कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इनोव्हेशन आणि रिसर्च प्रेझेंट यांच्या वतीने अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या शुभहस्ते नुकताच कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खोपोली शहरातील विद्यार्थ्यांना शोतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहचविण्याचे काम शितल कृष्णा गायकवाड या तरूण मुलीने केले आहे.शेकडोच्या घरातील गोल्ड मेडल मिळवित तिने खोपोली शहराचे नाव खेळाच्या मैदानात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आज शितल गायकवाड या नावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठीच्या प्रयत्नाला आता यश मिळायला लागले असल्याचे शितल गायकवा

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल