Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

राष्ट्रवादी पक्षाच्या सुवर्णा मोरे यांच्या पूढाकारातून प्रभाग ३ मध्ये कोविड लस नोंदणीला सूरवात....

खोपोली (किशोर साळुंके ):महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने १८ते  ४५  वर्षांच्या वरिल सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करण्याचे आदेश  संपूर्ण राज्यातील शासकीव रुग्णालयांना दिले आहे.तसेच या आदेशा नूसार लसीकरण करण्याचे काम सूरु केले आहे.सदर लसीकरण करुन घेण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी करणार्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे.परंतू  अनेक नागरिकांकडे स्मार्ट  फोन नाही तर काहींना  आँनलाईन नोंदणी करण्यास अडचण होत आहे.या नागरिकांना आँनलाईन नोंदणी करण्यास अडचणी येवू नये यासाठी खोपोली शहर महिला राष्ट्रवादी काँ.पक्षाच्या अध्यक्षा सुवर्णा  संतोष गायकवाड यांनी पूढाकार घेत शहरातील विविध भागात त्यांच्या कार्यकर्यांनी नोंदणी सूरु केली आहे.या कार्यक्रमानूसार प्रभाग क्रमांक ३ मधील मोहोनवाडी येथील समाजमंदिरात लसीकरण करण्यासाठी नोंदणी सूरु केली असून  यावेळी असंख्य नागरिकांनी राष्ट्रवादीच्या वतीने सूरु केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे  कौतुक करत आहेत.या उपक्रमाचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला आहे.