Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

नालंदा बुध्द विहार विहारी खोपोली येथे संविधान दिन उत्साहात साजरा संविधान दिनाचे औचित्य साधत मुलांना शालेय वस्तुंचे वाटप

खोपोली - किशोर साळुंके -- खोपोली शहरातील भारतीय बौध्द महासभा वॉर्ड शाखा विहारीच्या वतीने नालंदा बुध्द विहारात ७२ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेने झाली,जेष्ठ कार्यकर्ते हरीभाऊ कदम,व कर्जत शाखेचे दगडू जाधव यांनी मार्गदर्शन केले या दिवसाचे औचित्य साधून बुध्द विहार समन्वय समिती पूणे यांचे सहकार्याने व कोमल शेलार यांचे माध्यमातून लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले स्थानिक पत्रकार किशोर साळूंके व सचिन यादव यांनी या शुभ दिनी बुध्द विहारास संविधान प्रतिमा भेट दिली. नालंदा क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने विहार प्रारंगणात संविधान प्रतीकृतीचा हुबेहूब सुंदर देखावा साखारण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन व मुंबई अतिरेकी हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून वरिल कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली.या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विहारी वाँर्ड शाखेचे विजय सताने होते, तर नालंदा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष उत्तम पवार ,सुजाता महिला मंडळाच्या लताताईं कदम या होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किर्ती सोनवणे व वैभव स

बहुजन युथ पँथरचे किशोर साळुंके यांच्या वतीने ७२ व्या संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाटप .

बहुजन युथ पँथरचे किशोर साळुंके यांच्या वतीने ७२ व्या संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाटप . . खोपोली ( प्रतिनिधी) -- आज दि,२६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा होत असाताना ,खोपोली शहरातील विविध ठिकाणी बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांच्या वतीने संविधानाच्या प्रास्तविकेच्या प्रतीमा वाटप करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोहेंबर १९४९ रोजी भारतासाठी निर्माण केलेले संविधान राष्ट्रपती डां. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपुर्द करुन देशाला अर्पण करण्यात आले.यानंतर सदर संविधानाची अंमल बजावणी २६ जानेवारी 1950 रोजी होवून भारताचा संपूर्ण संवैधानिक कारभार या संविधानानूसार झाला.२६ नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी भारत देशाला वरिल संविधान दिल्याने त्याचा गौरव दिन आजच्या दिनी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच निमित्ताने खोपोली शहरातील बहुजन युथ पँथरचे निडर समजले जाणारे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी युथ पँथर जिल्हाध्यक्ष सुशिलभाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहराती

शिवशाही व्यापारी संघटनेच्या खोपोली शहरातील वार्ड क्रमांक 07च्या उपाध्यक्षपदी मयुर अरूण पातकर यांची निवड जाहीर.

प्रतिनिधी-- ( किशोर साळुंके ) शिवशाही व्यापारी संघटनेचे खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफिक करजीकर यांच्या सुचनेने व शाहीद भाई शेख यांच्या अनुमोदनाने मयुर पातकर यांची निवड संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालय शिळफाटा या ठिकाणी जाहीर करून पातकर यांना नियुक्ती पत्र दिले. नवनियुक्त पदाधिकारी मयूर पातकर यांनी शिवशाही व्यापारी संघ खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफिक करजीकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी वर्ग,सर्वसामान्य जनतेची व माता भगिनींची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी आरपीआय कोकण प्रदेशाध्यक्ष तुषार दादा कांबळे, अपघात ग्रस्त टिमचे शाहिद शेख शिवशाही व्यापारी संघटना कार्याध्यक्ष तौफिक करजीकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र

रायगड जिल्हा वन्यजीव रक्षकांचे चर्चासत्र संपन्न वन्यजीवांसाठी तात्पुरत्या उपचार केंद्राची मागणी.

रायगड जिल्ह्यातील वन्यजीव जीव रक्षकांना एकत्रितपणे चर्चासत्रात आमंत्रित करून वन्य जीवावर प्राथमिक उपचार करणेकरिता टी. टी. सी. अर्थात टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षकांनी" मार्गदर्शन केले आणि सल्लामसलत केली. वाढत्या नागरी वस्ती, उद्योग धंदे, रस्ते त्याचप्रमाणे इतर निर्माणामुळे रायगड जिल्ह्यातील जैविक वैविध्यता संकटात आली आहे. त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याने वेळीच पावले उचलून प्राणी, पक्षी, सर्प, जलचर इत्यादींचे संवर्धन, संरक्षण होतअसताना त्यांच्यावर उपचार करून प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सर्वांनी वनखात्याशी समन्वय साधून तात्पुरते उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी "साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, गोरेगाव" येथे रायगड जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक एकत्र आले होते. वन्यजीव रक्षकांनी आपल्या समस्या रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक यांच्यासमोर मांडल्या आणि त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना व्हाव्यात याबाबतीतही चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांती
आज आझाद मैदान येथे बीजेपी पक्षांचं धरण आंदोलन.महाराष्टातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंदू वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून प्रविण दरेकर ह्यांनी आपले विचार मांडले संकेत घेवारे, महाराष्ट्र टाइम्स25 न्यूज.

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी श्री राजेंद्र भगवान गायकवाड यांची निवड जाहीर.

शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी यांच्या सूचनेने व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन आण्णा लिमकर यांच्या अनुमोदनाने आज शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी राजेंद्र गायकवाड यांचे शिवशाही व्यापारी संघा मध्ये सहर्ष स्वागत केले. श्री राजेंद्र गायकवाड यांचे बार्शी शहरांमधील कामकाज पाहता तसेच सर्वसामान्य जनतेशी, व्यापारी वर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते त्यांच्यासाठी काहीतरी सकारात्मक काम करण्याचे ध्येय समोर ठेवून करत असलेले काम पाहून शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी श्री राजेंद्र गायकवाड यांची शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर करून त्यांना आज नियुक्तीपत्र प्रदान केले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र गायकवाड यांनी सर्वसामान्य जनतेच्या सोबत व्यापारी वर्ग, दिव्यांग बांधव ,तृतीय पंथी भगिनी यांची सेवा अविरतपणे चालू ठेवावी अशा प्रकारच्या सूचना देऊन त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी गावात येथे शिवशाही व्या

खोपोलीत शांतता कमिटीची बैठक संपन्न.

खोपोली (किशोर साळुंके ) देशभरातील दुर्दैवी घटनांचे पडसाद खोपोलीत न उमटल्याने पोलीस प्रशासनाने मानले सर्वांचे आभार खोपोली : देशभरात विविध ठिकाणी त्रिपुरा मधील विवादास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर उमटलेल्या पडसादाची कोणतीच लक्षणे खोपोली शहरामध्ये दृष्टीपथास आलेली नसल्याचे संपूर्ण श्रेय हे खोपोलीतील सुज्ञ जनतेलाच जाते, त्यामुळे पोलिस प्रशासनाच्यावतीने मी सर्व खोपोलीकरांचे कौतुक करतो, अशा शब्दात शांतता कमिटीच्या बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी प्रतिपादन केले. विवादित घटनाक्रमाचा विपर्यास्त सोशियल मीडियाच्या माध्यमातून झाल्याने सामाजिक सलोखा बिघडला आणि परिणामांती दंगली सारख्या घटना घडल्या त्याबाबतीत खोपोलीकरानी अत्यंत सोशिक भूमिका घेतलेली आहेच मात्र भविष्यात कोणत्याही घटनेची पार्श्वभूमी समजून घ्यावी आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशी सूचना वजा आवाहन पोलीसनिरीक्षक पवार यांनी या बैठकीमध्ये केले. खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनीही शांतता कमिटीला संबोधित करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री देताना त्यासाठी यापुढे आपण सर्वजण सतर

तमनाथ रेशन दुकानात होणाऱ्या काळ्याबाजाराची सखोल चौकशी करा -सुशील भाई जाधव

कर्जत प्रतिनिधी दि 12 नोव्हेंबर गरिबांना आधार देणारे रास्त भाव रेशनिंग दुकानांमध्ये अनेक ठिकाणी धान्य मिळत नसल्याची ओरड आहे या विरोधात बहुजन युथ पँथर ग्राहकांच्या मदतीला सरसावली असून कर्जत तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तमनाथ येथिल रेशन दुकानात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी त्याची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी बहुजन युथ पँथर चे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली आहे. कारवाई नाही झाली तर आंदोलन केले जाईल असा इशारा सुशील जाधव यांनी दिला आहे. कर्जत तमनाथ येथे सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानात आहे. अनेक वर्षांपासून या दुकानदाराकडून धाण्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप स्थानिक करीत असून त्या बाबतची लेखी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार, कर्जत पुरवठा तहसीलदार , तहसीलदार यांच्याकडे बहुजन युथ पँथर चे जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जण आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.यावेळी त्यांच्यसमवेत कर्जत तालुका अध्यक्ष आनंद जगताप बहुजन य

सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे पुस्तक लायब्ररीचा शुभारंभ,सहजसेवा फाउंडेशनचा सातत्यपूर्ण नवीन उपक्रम...

खोपोली- ( किशोर साळुंके ) सहजसेवा फाउंडेशन ही सातत्यपूर्ण उपक्रम समाजासाठी राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमातुन समाजाची सेवा करणे हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे. खालापूर कारागृह ( जेल ) येथील वाचनालय व लायब्ररी यानंतर सामाजिक जाणिवेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय,खोपोली येथे विविध वेळा विविध कारणाने दवाखान्यात जाणे येणे होते.प्रसंगी कित्येक वेळ वाट पाहत थांबावे लागते.याचसोबत ऍडमिट असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक व कर्तव्यवरील स्टाफ वेळ घालविण्यासाठी पुस्तके वाचण्यासाठी असतील तर ज्ञानात भर पडून वेळेचा सदुपयोग होऊ शकतो.या भावनेतून दवाखान्यात लायब्ररी चा शुभारंभ गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर 2021रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय,खोपोली येथे दौंड येथील व्यावसायिक व सहजसेवा फाउंडेशनचे मार्गदर्शक अनिल देशमुख यांच्या हस्ते रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आले तर खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,गटनेते सुनील पाटील,नगरसेवक अमोल जाधव, दौंड येथील पोलीस पाटील मोतीलाल

खालापुरातील लोहप गावावर काळ्या केमिकल पावडर चे संकट,माणसांच्या जीवितास व निसर्गास धोका

JqdjRXEcVVX79kGR4JDF99QMq_TTi1VUtWAnJVl3ntLIq79K-rW3NwS_EfzsDibqUGy6uUn5WPoAikADvDY9qRpa2ixXIHbBHaIrMQ=s1152" style="display: block; padding: 1em 0; text-align: center; "> खोपोली : (आदर्श बेंबडे) : खालापूर तालुक्यातील लोहप गावानजीक असणाऱ्या आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून निघणाऱ्या काळ्या केमिकल युक्त पावडर मुळे स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून निसर्गाचीही हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खालापूर तालुका तसा औद्योगीकरणात अग्रेसर आहे. साधारण पाचशेच्या आसपास येथे छोटे मोठे कारखाने आहेत. अशाच कारखान्यांपैकी एक असणारा लोहप गावा लागतचा मौजे तळवली येथिल आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कं.यात केमिकल युक्त काम चालते. यामुळे या कारखाण्यातून काळ्या रंगाची केमिकल युक्त पावडर मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. या पावडर ला 'चारकोळ 'म्हणुन संबोधले जाते. ही पावडर हवेतून आसपासच्या गावांमध्ये पसारते. यामुळे येथिल नागरिकांना श्वसनाचे व चर्मरोगाचे विविध आजार जडत चालले आहेत. दमा, खोकला, टीबी यासारख्या भीषण आजरांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच निस

खोपोली शहरात टोविंंग जॅक सकट गाड्या पळविल्या

खोपोली - ( किशोर साळुंके ) : खोपोली शहरातील अनाधिकृत पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या चार चाकी वाहनांना टोविंंग कर्मचाऱ्यांनी लावलेल्या जॅक सकट संबधित वाहनाच्या मालकांनी आपली वाहने नेली असून त्यांचा तपास खोपोली पोलीस ठाणे करत आहे. खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत बाजारपेठत दोन चार चाकी वाहाने गेलेल्या आठ दिवसांमध्ये अनाधिकृत पार्किंगमधे उभ्या होत्या. खोपोली पोलीसांच्या कर्मचार्यांंनी सदर वाहानांना टोविंंग जँक लावला असतानाही संबधित वाहन मालकांनी जँक लावलेले टायरच काढून आपल्या गाड्या घेवून निघून घेले. तपासा नंतर MH02 AP 2658 या नंबरची गाडी वावरले खालापूर व दूसरी गाडी MH 46 बे 9762 कर्जत येथील असल्याचे समजूनआले असून खोपोली पोलीस ठाणे अधीक तपास करीत आहेत