Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

मुजोर फेरीवाल्याचा महिला सहाय्यक आयुक्तांंवर कोयत्याने हल्ला ..दोन बोटे तूटून रोडवर पडली.... याहल्याच्या निषेधार्थ खालापूर तालुक्यातील सर्व शासकीव कार्यालयाकडून काम बंद करुन केला जाहिर निषेध ...

. खोपोली ..(किशोर साळुंके ) रस्ते आडवून भर रस्त्यांवर भाजी विक्रि करणार्या मुजोर भाजी विक्रेत्याकडून कर्तव्य बजावणार्या ठाणे पालिकेच्या डँशिग समजल्या जाणार्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळेंवर परप्रांतीय भाजी विक्रेत्याने कोयत्याने केला हल्ला .हा हल्ला इतका भयानक होता कि या हल्यात पिंगळे यांची दोन बोटे तूटून भर रस्यावर पडली .अशा मुजोर हल्लेखोरांच्या दादागिरीला कुठेतरी चाप बसावा यासाठी तसेच कर्तव्यदक्ष अधिकार्यांवर अशा प्रकारचे जिवघेणे हल्ले होवू नयेत अशा मुजोरांवर कुठेतरी जरब बसून संबधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी खालापूर तालुक्यातील नगरपंचायत,खोपोली नगरपरिषदेसहीत संपूर्ण तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या वतीने ,नियम कायदे मोडणार्यांनी केलेल्या कृत्याचा जाहिर निषेध करत संपूर्ण काम बंद अंदोलन करण्यात आले.

खोपोली शहरात अत्याधुनिक कुस्ती संकुलाचे निर्माण

खोपोली प्रतिनिधी-- (किशोर साळुंके )राजू कुंभार यांनी साकारले "कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल". कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे दि.29 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साधून उद्घाटन आणि क्रीडा शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. संकुलाचे उद्घाटन रायगड भूषण आणि रायगड केसरी सन्माननीय प्रकाश हातमोडे आणि गोदरेज आणि बॉईस कंपनीचे प्रबंधक तानाजी चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानीय क्रीडा अधिकारी संदिप वांजळे, छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर ,दत्तात्रय पालांडे, कर्जत तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे, सुभाष घासे, दिलीप देशमुख, गुरूनाथ साठेलकर, सुनील नांदे,एकनाथ कुरळे,दिनेश मरागजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. या संकुलाची निर्मिती करणाऱ्या राजू कुंभार यांनी कुस्ती या क्रिडाप्रकारात विषेश करून महिला खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळी पासुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणार असल्याचे आणि यापूर्वीपासुन सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगत कुस्ती मह

राष्ट्रवादी महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या कार्य आढावा अहवालाचे लोकार्पण संपन्न

खोपोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या खोपोली महिला अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे (गायकवाड )यांनी शहर अध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारल्या पासून अद्याप पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा अहवाल तयार करून मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करून विविध मान्यवरांना सदर अहवाल भेट देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात तरुणांची फळी उभी करण्यास सुरुवात झाली. पक्षातील प्रत्येक घटकात, कमीट्यानमध्ये वरिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची फळी उभारण्याचे काम सुरु झाले. यात महिला कमिटी सुद्धा आली आणि सर्व राज्यात युवा कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे कार्य सुरु असताना खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा पदी सुवर्णा संतोष मोरे यांची निवड रायगड चे महामहीम खासदार सुनिल तटकरे यांनी केली. सुवर्णा मोरे यांनी खोपोली शहर अध्यक्षा म्हणून पदाभार स्वीकारल्यापासूनचा त्यांच्या कार्याचा आलेख वाढतच गेला आणि जात आहे. महिला सक्षमीकरण असो, मुलांच्या कला गुणांना वाव मिळणे असो, वृक्षारोपण असो, मदत असो, सामाजिक उपक्रम असो, जनतेच्या

स्व.ह.भ.प. गोटीराम पाटिल यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांना भजनी पेहरावाची भेट

खोपोली: (किशोर साळुंके)-खालापूर तालुक्यातील नामवंत व लोकप्रिय असणारे स्व. ह. भ. प. गोटीराम पाटिल यांच्या स्मरणार्थ धाकटी पंढरी साजगांव येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात ह. भ. प. तानाजी महाराज कर्नूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख /गटनेते सुनिल पाटिल यांच्यावतीने वारकरी बांधवांना भजनी पेहराव भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी गटनेते सुनिल पाटिल, नगरसेवक राजु गायकवाड, युवा नेते /उद्योजक हरिष काळे, मनसे शहर उपाध्यक्ष संजय दळवी, शिव व्यापारी सेना उपाध्यक्ष राकेश चव्हाण उपस्थित होते.

स्थानिकांना कंपनीत नोकरीत प्रथम प्राधान्य द्या - शिवसेना अवजड वाहतूक सेनेची मागणी

खोपोली (किशोर साळुंके ):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले. *शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग*

स्थानिकांना कंपनीत नोकरीत प्रथम प्राधान्य द्या - शिवसेना अवजड वाहतूक सेनेची मागणी

खोपोली (प्रतिनिधी ) ):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले. *शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग* व *

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज अखेर सूत्रे स्वीकारली.

अलिबाग -: तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अचानक बदली करण्यात आली. यानंतरही त्या जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नाला लागल्या होत्या. तशी चर्चा प्रशासनातही होती. मात्र आता कल्याणकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर यातील स्पर्धा संपली.जिल्हाधिकारी पद सांभाळताना निधी चौधरी यांचे स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद हेते. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी चौधरी यांचे अनेकदा खटके उडाले होते. नियोजन मंडळाच्या निधी वाटपाच्या मुद्यावर पालकमंत्र्यांचे त्यांच्याशी चक्क भांडण झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच्या वितुष्टानंतर त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. नव्याने डॉ. कल्याणकर याच्याकडे पदाची सूत्रे त्यांनी सोपवली. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता. ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच त्यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शास

पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे यशस्वी प्रयत्न

यंदाच्या पर्यटन मोसमात वीक एन्ड आणि हॉलीडेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात खालापूर तालुक्यात दाखल होत असताना नदी, तलाव, धबधबे त्याच प्रमाणे धरणात बुडून होणाऱ्या पर्यटकांच्या मृत्यूला आळा घालण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून पर्यटकांसाठी जिल्हा बंदीचे निर्देश दिले होते. पर्यटनावर बंदी आणि अतिवृष्टीने हाहाकार उडालेला असूनहा पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथून बेधुंद पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे निर्बंध जुगारत पर्यटनाचा असुरी आनंद घेताना दिसले, परिणामांती अनेक पर्यटकांना जीवाशी मुकावे लागले. पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनेने व्यथित झालेल्या खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी असे दुदैवी अपघात घडूच नयेत म्हणून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या कार्यकारिणीसोबत याबाबतीत उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करून तातडीने उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या परवानगीने अपघात प्रवण क्षेत्रांत पोलीस कर्मचारी नेमन्याचा, दंडात्मक कारवाई करण्याचा आणि संबंधित विभागातील पोलीस पाटील यांना सतर्क ठेवण्याचा निर्णय घेतला. या उपाय योजनांच्या अनुषंगाने खालापूर पोल

पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह 18 कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ

खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि करारी वाटणारा प्रत्येकजण अंतर्मनातून भावुक असतो हे खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर आणि इतर 18 कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभच्या वेळी दिसून आले. ओठात अडलेले शब्द, पाणावलेले डोळे आणि आठवणींची शिदोरी घेवून बदलीच्या ठिकाणी जाताना जड होणारी पावले असेच काहीसे चित्र खोपोली शहरातील कँपोलिन हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमात होते. अवघ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात क्षीरसागर यांनी दाखवलेले कर्तुत्व, कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन, कर्तव्यदक्षतेचे दिलेले धडे, बॅडमिंटन हॉलच्या निर्माणातून सर्वांच्या फिटनेसकडे दिलेले लक्ष आणि त्याच सोबत कर्मचारी वर्गाप्रती दाखवलेला विश्वास सर्वांच्या मनोगतातून दिसुन येत होता. खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते सर्वांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. खोपोली पोलीस ठाण्याच्या दैनंदिन घडामोडींसोबत इतर माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी यावेळी भूषण पाटिल, गुरूनाथ साठेलकर आणि खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या मनोगतातून व्यक्त

आम्ही खोपोलीकर या ग्रुप तर्फे भिकाऱ्यांना भीक नं देता कुपन द्यावे असा उपक्रम करण्यात आलं .

खोपोली (प्रतिनिधी ) त्यांनी त्या कुपनवर.... नाष्टा, औषधं, भोजन घ्यावे यासाठी... 2 व 5रुपयांच्या कुपणचे खोपोली बाजारात वितरण केले...कार्ड मिळण्याचे ठिकाण -वर्धमान मेडिकल स्टोअर ,तसेच कार्ड स्वीकारण्याचे ठिकाण -: अपना सुपर मार्केट किराणा जनरल स्टोअर ,वर्धमान मेडिकल स्टोअर ,आम्रपाली शिव भोजन ,ओंकार किर्वे वडापाव इथे कोणत्याही प्रकारची महिला ,पुरुष ,मुलं ,व्यक्ती भीक मागत असेल तर पैसा ऐवजी अन्न ,किराणा ,मेडिकल देऊ पण यापुढे पैशाची भीक नाही देणार असे आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय पैसे देण्याऐवजी उपलब्ध करून देत आहोत कार्ड त्यावर एक ठराविक किंमत 2.5 रु असेल तसेच ते कार्ड दिल्यावर ठराविक हॉटेल तसेच किराणा दुकान ,मेडिकल स्टोअर मध्ये ते देऊन तेवढ्याच पैश्याचे नाश्ता , शिवभोजन ,किराणा सामान व औषध घेऊ शकतात . नागरिकांनी उत्स्फूर्तपणेसहकार्य करत कुपन विकत घेतले व ते भिकाऱ्यांना देऊन एक चांगल्या उपक्रमात सहभाग नोंदवला... .....काही जण आपल्या लहान मुलांना भीक मागायला लावतात अश्या गुन्हे गारांच्या टोळ्यांचा अंत होण्यासाठी ही नक्कीच मदत होऊ

रक्षाबंधनच्या दिवशी झाडांना असंख्य भगिनींनी बांधल्या रख्या.. सहजसेवा फाउंडेशनचा आगळावेगळा उपक्रम..

खोपोली =किशोर साळुंके ) सहजसेवा फाउंडेशन ही समाजाप्रती जागरूक आलेली सामाजिक संस्था, समाजकार्यातून प्रभावी संदेश देणारे उपक्रम राबविण्यात संस्था अग्रेसर असते. मनापासून वेळ देणारे सहकारी असल्याने या वर्षभरात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात संस्था वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे सर्व जगाला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजनचे महत्त्व लक्षात आले.वृक्ष हे आपले कुटुंबातील जणू एक घटक आहे.वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत नात्यांची वीण घट्ट करताना ,त्यांचा आदर करून त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडताना वृक्षतोड कशी थांबेल व वृक्षवाढ कशी झपाट्याने होईल,याचा प्रसार करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनने महाराष्ट्रातील विविध शाखांच्या माध्यमातून जवळपास 12000 वृक्षांना रविवार 22 ऑगस्ट रोजी अर्थातच रक्षाबंधनच्या दिवशी झाडांना राखी बांधून वृक्षावर असणाऱ्या प्रेमाचे नाते दृढ करून समाजास आगळावेगळा संदेश दिला आहे. निसर्ग चळवळीत आवड असेल त्यांनी नक्कीच सामील व्हा,या आवाहनाला साथ देऊन संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागासाठी मुंबई शहरातून कल्याणी आपटे,मुंबई उपनगर येथून डॉ.अलका नाईक,ठाणे जिल्ह्या

रक्षाबंधनच्या दिवशी झाडांना बांधु या राखी... सहजसेवा फाउंडेशन राबविणार महाराष्ट्रभर उपक्रम...

किशोर साळुंके खोपोली :- कोरोनामुळे सर्व जगाला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजनचे महत्त्व लक्षात आले.वृक्ष हे आपले कुटुंबातील जणू एक घटक आहे.वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत नात्यांची वीण घट्ट करताना ,त्यांचा आदर करून त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडताना वृक्षतोड कशी थांबेल व वृक्षवाढ कशी झपाट्याने होईल,याचा प्रसार करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशन महाराष्ट्रातील विविध शाखांच्या माध्यमातून किंवन 10000 वृक्षांना रविवार 22 ऑगस्ट रोजी अर्थातच रक्षाबंधन च्या दिवशी झाडांना राखी बांधून वृक्षावर असणाऱ्या प्रेमाचे नाते दृढ करण्याचा संकल्प करणार आहेत. या निसर्ग चळवळीत आवड असेल त्यांनी नक्कीच सामील व्हा, असे आवाहन सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा श्रीमती माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा सौ. इशिका शेलार, सचिव सौ. वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर,कार्यवाह बी. निरंजन व जनसंपर्क प्रमुख सौ. जयश्री कुलकर्णी यांनी केले आहे.

पळसदरी गावात महानगर गॅस आणि इनेबल हेल्थ सोसायटी यांच्या माध्यमातून आरो प्लँन्टची उभारणी.

कर्जत रायगड :- महानगर गॅस आणि इनेबल हेल्थ सोसायटी यांच्या CSR फंडातुन पळसदरी गावासाठी आरो प्लँन्टची उभारणी करण्यात आली आहे. या आरोच्या पाण्यामुळे पळसदरी करांचे आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होणार आहे. या प्लांटच उद्घाटन बुधवारी पळसदरी ग्रामपंचायतीचे सरपंच जयेंद्र देशमुख आणि महानगर गॅसचे प्रमुख शर्विन फ्रॅन्सिस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच देशमुख यांनी महानगर गॅसचे आभार मानले आहेत. त्या सोबतच या प्रमाणेच तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा सरपंचांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. गावात हा प्रकल्प आण्यासाठी ॲड. प्रदीप सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज गावकऱ्यांना प्युरिफायरचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो ॲड. प्रदीप सुर्वे यांचा आहे. या प्रकल्पाची उभारणी करताना गावातील ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यामुळेच आम्ही इथे हा प्रकल्प उभारून शकलो. आणि यांच्या मदती शिवाय आम्ही आमचा प्रकल्प पुढे सुरू ठेवू शकत नाही अस मत व्यक्त करत इनेबल हेल्थ सोसायटीचे दीपक काळनकर यांच्यावतीने ग्रामस्थ ॲड. प्रदीप सुर्वे, महेंद्र

७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पळसदरी नगरीत वाचनालयाचे उद्धघाटन ...

कर्जत (प्रतिनिधी ):- संपूर्ण भारतात जल्लोषात ७५ वा स्वतंत्र्य दिन साजरा होत असताना कर्जत तालुक्यातील पळसदरी या गावामधे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहना सोबतच विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाचनालयाचे उद्धघाटन करण्यात आले,सद्यास्थितीत तरुण पिढी मोबाईल व टीव्हीच्या आहारी जावून तरुण वर्ग वाचन संकृती पासून दूर जात असल्याने पळसदरी गावातील जागृत तरुणांनी पूढाकार घेत आपल्या गावातील सुशिक्षित युवा पिढींमधे वाचनाची आवड निर्माण व्हावी या प्रामाणिक उद्देशाने गावातील जेष्ठ मंडळींंच्या मदतीने वाचनालयाचे उद्धघाटन करण्यात आले.सुरु करण्यात आलेले वाचनालय हे मोफत असून या ठिकाणी विविध भाषेतील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध असतील.तसेच पळसदरी गावात वृत्तपत्र येत नसल्याने नव्याने सूरु करण्यात आलेल्या वाचनालयात वृत्तपत्र वाचता यावे यासाठी सहा प्रकारची वृत्तपत्र सुद्धा उपलब्ध करुन दिली जाणार आहेत .वाचनालय सूरु करण्यासाठी गावातील जेष्ठ मंडळींंच्या मदतीने गावातील तरुणांनी पुढाकार घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी गावातील जेष्ठ मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाचना

७५ वा स्वातंत्र्य दिन अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथिल स्थानिकांकडून मोठ्या आनंदोत्सवात साजरा..

*"७५ वा स्वातंत्र्य दिन अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथिल स्थानिकांकडून मोठ्या आनंदोत्सवात साजरा.."* अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथे आपल्या भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन अगदी आंनदोत्सवात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास आदि. कविता वसंत निरगुडे(आदिवासी महिला समाजसेविका),श्रीम.अपर्णा अनिल बोराडे(सरपंच ग्रुप ग्राम पंचायत सागाव),श्री.अनिल बोराडे,नंदकुमार सुरोशे,मनोज बोराडे,रुपेश सुरोशे,अशोक जाधव,महेंद्र सुरोशे,प्रवीण धलपे,योगेश जमदरे,हरी जाधव,आदी तरुण मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील तरुणांनी समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनीं यांना आपल्या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमात १००% उपस्थित राहण्यासाठी गळ घालण्यात आली.आणि तरुणांच्या या जनजागृतीला दाद म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी,आबाळ वृद्धांसह कार्यक्रमास उपस्थित होते.गावात प्रभात फेरी काढून झेंडावंदन करून गावातील समाज मंदिरात सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी यांना एकत्र बसविण्यात आले.विद्यार्थी व उपस्थितांची भाषणे,गाणी व करमणुकीचे कार्यक्रम झाले.सदर कार्यक्रमात उस्थितांच्या चेहऱ्यावर एक अनपेक्षित जोश व आनंद उत

स्वातंत्र्य दिनी खोपोलीत शहरात रक्तदान शिबिर संप्पन्न ...

किशोर साळुंके खोपोली प्रतिनिधी :- खोपोली,परळी, जांभुळपाडा, लोहाणा महाजन समाजबांधवांच्या वतीने खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरसाठी खोपोली शहरातील लोहाणा समाज हॉल मध्ये रक्तदान शिबीरियाचे आयोजन केले गेले. दरवर्षी राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत रक्तदानाचे शिबीर आयोजित करून आपले देशप्रेम प्रकट करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची परंपरा यंदाच्या स्वातंत्र्य दिनीही जपली गेली. . कोरोना आणि साथीच्या रोगामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे अनेक संस्थांच्या सहभागातून खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरमध्ये उपलब्ध होणारे रक्त हे स्थानिक स्तरांवर अत्यंत मोलाची भूमिका पार पडत असते. खास करून खोपोलीतील रुग्णांना अशा शिबिरांचा फायदा होतो. या शिबिरात विविध क्षेत्रातल्या मान्यवर आणि रक्तदात्यानी तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. लोहाणा महाजन समाजाचे शैलेश विठ्लानी, प्रवीण शहा, पंकज विठ्लानी, राजेश आभाणी, मनीष ठक्कर, मनीष विठ्लानी, जयेश आभाणी, दर्श आभाणी,यांनी या शिबिराच्या संपन्नतेसाठी विशेष प्रयत्न केले. खोपोली नगरपालिके

🚩 *कारखान्यात विरोधात खोपोली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भुमिका..*🚩

खोपोली /किशोर साळूंके :-      महिंद्रा सॅनियो कारखान्यात शुक्रवार दि ६/८/२०२१ रोजी *संतोष तोंडे* या कामगाराचा आकस्मित मृत्यु झाला. कारखान्यात काम करत असताना चक्कर येऊन कामगार पडला त्यावेळी कंपनी प्रशासनाने कामगाराला दवाखान्यात उपचारासाठी आणन्यासाठी कुठलीही व्यवस्था केली. कारखान्यात काम करणार्या कामगारांची काळजी घेणे याची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनाची असते. *ना ऑम्बुलस ना कुठल्या प्रकारच्या चार चाकी गाडीची व्यावस्था नाही यामुळेच तो कामगार मृत्यू पावला असा खोपोली शहर मनसेचा कंपनी प्रशासनावर आरोप आहे.*  या बाबतचा पुरावा देखिल उपलब्ध आहे. कामगाराला इतर कामगारांनी त बेशुध्द अवस्थेत उचलुन दोन चाकी गाडीवरून आणले. त्यामुळेच त्या कामगाराचा मृत्यू झाला. यावरून हि गोष्ट लक्षात येते की कारखाना प्रशासन कामगारांच्या सुरक्षेसाठी,आरोग्यासाठी कुठलेही गांभीर्य घेताना दिसत नाही . त्यामुळे महिंद्रा सॅनियो या कारखान्यावर मनुष्य बळीचा गुन्हा दाखल करावा  अशी मागणी खोपोली शहर मनसेचे अध्यक्ष अनिलदादा मिंडे यानी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यावेळी  खालापुर तालुका अध्यक्ष सचिनजी कर्णूक  खोपोली शहर संघटक हु

शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर यांस कडून महाड तालुक्यातील आपत्तीग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूची मदत .

खोपोली प्रतिनिधी :-  मदत नव्हे तर  कर्तव्य ,शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष श्री इन्द्रजीत सिंग बल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बाबू  मोरे व रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश दादा पाटिल यांच्या                                                          आदेशानुसार महाड तालुक्यातील  दादली,शिरगाव व कोल गावांमध्ये माझ्या बंधू-भगिनींना अतिवृष्टीमध्ये बाधित आपत्तीग्रस्त बांधवाना जीवनावश्यक वस्तूची मदत करणात आली . शिवसेना अवजड वाहतुक सेना खालापूर तालुका अध्यक्ष मा श्री .रुपेश बैलमारे व पदाधिकारी ह्यांच्या हस्ते मदत करण्यात आली.