Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

खोपोलीत पालकमंत्री यांनी कोरोना रुग्णालयाचा घेतला आढावा..

खोपोली प्रतिनिधी :- किशोर साळुंके  *सर्व ना हरकत घेऊनच हॉस्पिटल सुरू करावे*..पालकमंत्री आदिती तटकरे  खोपोली... खोपोलीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिनांक 27 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या कोरोना हॉस्पिटल संदर्भात आढावा घेतला.फायर ऑडिट,ऑक्सीजन लाइन यांचे ऑडिट करणे गरजेचे तसेच दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व सुरक्षा साधनांची तपासणी करणे गरजेचे आहे.सदर हॉस्पिटल कॉलेजच्या इमारतीत असल्याने त्याची कालमर्यादा यावर परखड मत त्यांनी व्यक्त केले.सर्व ना हरकत घेऊनच हॉस्पिटल सुरू करावे अशी सूचनाही त्यांनी केली.महाविद्यालयात कोविड हॉस्पिटल सुरू करताना येणार असलेल्या अडचणी यावर भाष्य केले. याचवेळी खोपोली नगरपरीषदेचे हॉस्पिटल मध्ये कायम स्वरूपी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी सुद्धा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन व त्यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.DCHC सेन्टर सुरू करण्यासंबंधी स्थानिक प्रशासन यांनी यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी,खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार,नगराध्यक्षा सुमन औसरमल,खोपोली नपाचे मुख्याधिकारी गणेश शेटे, खालापूर च्या मुख्याधिकारी स

खोपोलीतील सहज सेवा फाउंडेशनला मारुती ओम्नी कार भेट

खोपोली -(किशोर साळुंके)- ⭕खोपोली नगरिसह सर्व तालुका व रायगड जिल्ह्यात.. ⭕विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असलेल्या... व  ⭕विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या.. ⭕सहज सेवा फाउंडेशन... ⭕या संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन... कर्जत येथिल.. ⭕हाजी अश्रफ शहाबुद्दीन खान फाउंडेशन.. ⭕यांच्या वतीने मारुती ओम्नी कार भेट देण्यात आली.. ⭕सदर कार चा वापर खोपोलीत मोफत अन्नाचे डब्बे पोहचविण्यासाठी करणार आहेत.. ⭕या कारचा लोकार्पण सोहळा आज लोहाणा हॉल येथे संपन्न झाला.. ⭕खोपोली मधिल विविध मान्यवर या सोहल्यास उपस्थित होते... यात... राकेश ओसवाल.. सचिन यादव..पत्रकार  प्रशांत गोपाळे..पत्रकार  रवींद्र कानिटकर.. राकेश मिरवणकर.. महेश काजळे.. निलेश मोडवेc.. शरद सुरवसे.. मनोज माने.. शैलेश विठ्ठलानी.. परेश मजेठीया.. राजेंद्र फक्के.. बल्ली भाई.. मोहन केदार.. वर्षा मोरे..सचिव.. स.से.फा. इशिका शेलार.. उपाध्यक्ष.. स. से. फा. जयश्री कुलकर्णी.. जनसंपर्क प्रमुख..स. से. फा. बंटी कांबळे..कार्यवाह स. से. फा. बी.निरंजन..कार्यवाह..स. से. फा. सहज सेवाचे सर्वेसर्व -शेखर जांभळे.. यांच्यासह नागरिक उपस्थित होते..

भगवान महावीर जयंती निमित्ताने खोपोलीत रक्तदान शिबीर संपन्न

खोपोली (सचिन यादव ) :- संपूर्ण जगभरात भगवान महावीर जयंती साजरी होत आहे... ⭕कोरोना महामारीने सर्वत्र नियम पाळत घरातच जयंती साजरी होत आहे... ⭕महामारीत सध्या रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे... ⭕हीच गरज ओळखून खोपोली जैन मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले.. ⭕सदर शिबिराचे आयोजन.. .. खोपोली -शीळफाटा श्री जैन संघ, लायन्स क्लब ऑफ खोपोली, खोपोली व्यापारी असोसिएशन व समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.. ⭕नागरिकांनी प्रचंड उत्साहात शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले... ==================== सचिन यादव -पत्रकार खोपोली -7744093474 LIVE -25/4/2021=1:00pm ====================

खोपोली सुभाषनगर रस्त्याच्या लढ्याला यश रस्ता कायम स्वरूपी करून डांबरीकरण सुरु

खोपोली (सचिन यादव ) :- 🟪खोपोली नगर परिषद प्रभाग क्रमांक एक मधिल .... 🟪2500लोकसंख्या असलेले सुभाष नगर हे गाव.. 🟪मस्को गेट ते सुभाष नगर मधिल जाधव मामांच्या घरापर्यंतचा रस्ता कायम न ठेवता पर्यायी रस्ता नव्याने देण्याचा प्रस्ताव होता.. 🟪त्यास विरोध करत ग्रामस्थांनी नगरपरिषदेकडे 3 मागण्या केल्या होत्या... 🟪यात सध्याचा रस्ता कायम स्वरूपी करून डांबरीकरण करावे, नव्या पर्यायी रस्त्यास विरोध व सदर रस्त्यास माजी नगराध्यक्ष कै. सखाराम गेणू जाधव यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागण्या होत्या... 🟪खोपोली नगर परिषद, महिंद्रा सान्यो कंपनीप्रशासन, महिंद्रा अँड महिंद्रा प्रशासन, नगरसेवक /गट नेते मंगेश दळवी, नगरसेवक तुकाराम साबळे या सर्वांनी विशेष सहकार्य करून.. 🟪आज पन्नास वर्षाच्या लढ्याला यश येवून सदर रस्ता कायम स्वरूपी करून डांबरीकरण सुरु झाले आहे... 🟪सदर रस्त्यास 94लाख 23हजार 294/-रुपये खर्च येणार आहे..... 🟪या लढ्यास ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे  प्रमुख ग्रामस्थ राहुल सखाराम जाधव यांनी विशेष आभार मानले आहेत. ==================== सचिन यादव -पत्रकार खोपोली -7744093474 LIVE NEWS-24/4/20

राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूर शेळके याच्या नावाची शिफारस करणार - श्रीरंग बारणे

स्वतःचा जीव धोक्यात घालून  चिमुकल्याचे प्राण वाचविणाऱ्या मयूरचा खासदार बारणे यांनी केला गौरव  खोपोली (  किशोर साळुंखे) - 22 एप्रिल - प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव मयूर शेळके याने वाचविला आहे. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा. राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.  सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजन मध्ये पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर शेळके मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत मधील नेरळ तलवडे ययेथील रहिवासी आहे.  कर्जत तहसील कार्यालयात खासदार बारणे यांनी मयूरचा आज (गुरुवारी) सत्कार केला. त्याच्या धाडसाचे, धैर्याचे कौतुक केले. त्याचे आई-वडील , कर्जत नगरपरिषद अध्यक्षा सुवर्णा जोशी, आमदार महेंद्र थोरवे, प्रांताधिकारी वैशाली परदेशी,  तहसीलदार विक्रम देशमुख यावेळी उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना लहान मुलगा  तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला. त्यावेळ

आम्ही खोपोलीकर यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

 आम्ही खोपोलीकर यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न खोपोली (किशोर साळुंके)-संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याने रक्ताची गरज वाढत आहे.. याच अनुषंगाने खोपोली मधील तरुण एकत्र आले व आज रक्तदान शिबीर आयोजित केले.. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज रक्तदान करून अनेक रक्तदात्यांनी अनोखी क्रांती केली..या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालापूर चे तहसीलदार इरेश चप्पलवार, शिवसेना शहर प्रमुख सुनिल पाटिल, माजी उप नगराध्यक्ष राजु गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खोपोली अध्यक्ष अनिल मिंडे तसेच सर्व मित्र पक्षीय नेते, मित्र परिवार, कार्यकर्ते यांनी भेट देऊन सदर पदाधिकारी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.. सदर आयोजक सदस्य.. महेश काजळे, किशोर साळुंके (पत्रकार), संदेश माने, इंद्रसेन घोडके, तोसीफ शेख, अल्ताफ मान्सूरी, सागर बिरवाडकार, विलास चाळके, महेश गायकवाड, प्रवीण गायकवाड, इरफान शेख, प्रदीप देशमुख, दिनेश जाधव, संजय तन्ना, सतीश येरुणकर, राकेश मिरवणकर, प्रदीप मोरे, निलेश मोडवे, अजय सोनावणे, संदीप कांबळे, आकाश घरडे, k. K. कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली..

खोपोली -- (किशोर साळुंके ) सहजसेवा फाउंडेशनचा सहज साद, सहज साथ कोरोना काळातील अत्यावश्यक सेवेसाठी... सहजसेवा फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सर्वत्र कौतुक ....

खोपोली शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बरेचसे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत व  काही रुग्णालयात आहेत.आर्थिक नियोजन असूनही अनेकांचे नातेवाईक वा इतर सोबत कुणीही नसल्याने जेवणाची कुचंबणा  होत आहे.सहज सेवा फाउंडेशनच्या मार्फत खोपोली नगरपालिका हद्दीतील अशा रुग्णांना दुपारी व रात्रीच्या जेवणाचे डब्बे त्यांच्या राहत्या घरी अथवा दवाखान्यात संस्थेच्या स्वयंसेवका मार्फत योग्य ती काळजी घेऊन संबधीत ठिकाणी पोहोच केले जातील.जेवणाचा अधिभार हा संबंधित रुग्णाचा वैयक्तिक असेल व सहज सेवेच्या माध्यमातून डब्बे नियोजित ठिकाणी पोहोच केले जातील  अशी ही सहजसेवा नि:शुल्क सेवा सूरु करण्यात आली असून वरिल स्तुत्य उपक्रमाबाबत सहजसेवा फाउंडेशचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरी नागरिकांनी अधिक माहितीसाठी वा सेवेसाठी 9975492470 / 8788110739 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.शेखर  जांभळे यांनी केले आहे. सहजसेवा फाउंडेशन ही मार्च 2020 पासून कोरोना काळात कर्जत व खालापूर तालुक्यात सातत्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. समाजास या सेवेची महत्त्वपूर्ण गरज असल्याचे प्रतिपादन के.ऐम.सी. कॉलेजचे प्रा.डाॅ.भा
 

राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोल माफ - केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा ; तातडीने अंमलबजाव

 राष्टीय महामार्गाच्या  चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात  आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील  सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे  या महामार्गावरून प्रवास करताना  अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा  कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व  वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  केली.       संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील  पत्रकारांना आजपासून टोलमुक्त  प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.  आमदार, खासदार, स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे  पत्रकारदेखील समाजासाठी झटत  असतात. सर्वस्व देत असतात. जीव  धोक्यात घालत असतात. पत्रकार  हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. या पत्रकाराला  त्याची सेवा बजावत असताना  वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास  टोलमाफी मिळावी अशी पत्रकार संघटनांची मागणी होती .त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या.त्याचप्रमाणे  राष्ट्रीय महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा आपघाती मृत्यू झाला, तर

हाळ खुर्द गावाजवळील मार्गावर गतिरोधक टाकावा. किशोर साळुंखे-: (खोपोली प्रतिनिधी )

  जांबरूग फाट्यावरून कर्जत जाणाऱ्या तसेच हाळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मार्गावर गतिरोधक टाकावा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ मंसुरी व खोपोली शहर उपाध्यक्ष तौफीक करंजीकर यांच्या नेतृत्वाखाली आज शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हाळ खुर्द गावाला भेट देवून नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी करण्यात आली.                  खोपोलीवरून  कर्जतकडे जाणारा मार्ग मोठ्या रहदारीचा आहे. पाली, पेण, पुण्याकडून येणारी वाहने याच मार्गाने कर्जतला जात-येत असतात. अवजड वाहनेही भरधाव वेगाने आवागमन करीत असतात. रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला ग्राम पंचायत कार्यालय, शाळा, दुकाने असल्याने हाळ खुर्द येथील नागरिकांना रस्ता ओलांडून येणे-जाणे करावे लागत असते. पण भरधाव वेगाने आवागमन करणाऱ्या वाहनांमुळे लहान मुले व नागरिकांना जीवमुठीत घेवून रस्ता ओलाडांवा लागतो. तरी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मार्गावर गतिरोधक टाकावा तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फलक लावून वाहन