Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

नेरळ ते माथेरान दरम्यान दरड कोसळली, माथेरानचा संपर्क तुटला

  कर्जत|कर्जत प्रतिनिधी   जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे अऩेक ठिकाणी दरड कोसळण्याच्यां किंवा भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. माथेरानमधील घाटातही दरड कोसळली आहे. तसेच डोंगवरची माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला आहे. नेरळ ते माथेरानला जाणा-या घाटात ही घटना घडली आहे. माथेरानकडे जाण्या-येण्याचा रस्ता बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. स्थानिकांची टीम या ठिकाणी मदतीला पोहोचली आहे. पण मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने ती रस्त्यामधून हटवण्यात अडचणी येत आहेत. तसेच पाऊसही सुरू असल्याने काम वेगाने करता येऊ शकत नाही.   संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टी सुरू झाली आहे. संपूर्ण कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्हयात पावसाने जोर धरला आहे. बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अगोदरच नदीकाठीवरील गावांना सतर्क

कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न

  कर्जत: कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे खुर्द येथे खासदार निधीतून ७लाख व १ लाख ८३ हजार रुपये नगरपरिषद फंड असे ८ लाख ८३ हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे व ३लाख खासदार निधी व ३ लाख३१ हजार रुपये असे ६ लाख ३१हजार रुपये खर्चून दहिवली मधील गुरव आळी येथे उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.    मुद्रे खुर्द येथे पालक व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, विशाखा जिनघरे,भारती पालकर, नगरसेवक बळवंत घुमरे, विवेक दांडेकर,बिनीता घुमरे, नगरसेविका भारती पालकर, कृष्णा घाडगे,अरूणा वायकर, संतोष पाटील, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर, भालचंद्र जोशी, बांधकाम सभापती स्वामींनी मांजरे आदी उपस्थित होते

आम्ही खोपोलीकर यांच्या वतीने वाढीव घरपट्टी मागे घेण्याबाबत निवेदन सादर

आम्ही खोपोलीकर यांच्या वतीने वाढीव घरपट्टी मागे घेण्याबाबत निवेदन सादर      खोपोली  :( किशोर साळुंके  ) : खोपोली नगर पालिकेने खोपोली शहरातील अनेक भाडोत्री घर मालकांना वाढीव घरपट्टी लावली असल्याने हा अन्याय कारक निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही खोपोलीकर या सामाजिक संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.       सध्या कोरोना काळ आहे. मागील दोन वर्षात अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जण मृत्यूमुखी पडलेत. आर्थिक बाब बंद आहे. अशात खोपोली नगरपालिका यांच्या वतीने भाडोत्री तत्वावर घर /गाळा /फ्लॅट भाड्याने देणाऱ्या घर मालकांना वाढीव घरपट्टी आकारली आहे.यामुळे संपूर्ण खोपोली नगरीत असंतोष पसरला आहे. हा अन्याय कारक निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही खोपोलीकर या सामाजिक संस्थेच्या वतीने खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांना निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी चर्चे दरम्यान सर्व सदस्यांना दिलासादायक उत्तरे दिली.       सदर समयी मुख्याधिकारी यांच्या समवेत नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेवक किशोर पानसरे, सामाजिक कार्यकर्ते तात्या रिठे व आम

कर्जतला शिव जनसंपर्क अभियांनांतर्गत शिबीर संपन्न

खोपोली :(किशोर साळुंके ) :  संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकत वाढविण्यासाठी शिवसेनेने केलेली विकास कामे घराघरात पोहचविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 12 ते 24 जुलै पर्यंत शिव संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती देण्यासाठी कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली शिबीर आयोजित केले होते. यासमयी जिल्हा पदाधिकारी, खालापूर तालुका व खोपोली शहरातील पदाधिकारी, लोक प्रतिनिधी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे कामगारांना माॅस्कचे वाटप

कर्जत:प्रतिनिधी आज शुक्रवार दिनांक ०९/०६/२०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत युनिटच्या माध्यमातून अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत स्टेशन मास्टर व SSE P/Way आँफिस मधील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून     स्टेशन मास्टर आँफिस, एस.एस.ई. P/Way, एस.एन.टी, बुकिंग आँफिस, इलेक्ट्रिक आँफिस मधील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांसह जी.आर.पी,आर.पी.एफ आँफिस मधे पेढ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कर्जत सेंट्रल कँबिन येथील कर्मचाऱ्यांना मास्कसह पेढ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महापुरूषांसह संघटनेच्या घोषणांचा जल्लोष करण्यात आला.  या प्रसंगी केंद्रीय चिटणीस  मिलिंद शेळके  , डिव्हिजन उपाध्यक्ष श्री बाबू सोनावणे, कर्जत युनिट अध्यक्ष कुमार भारत पेमारे, युनिट सचिव विश्वनाथ लदगे खजिनदार  केतन धुळे, उपाध्यक्ष श्री रवींद्र मोडक,निलेश पडवळ,  अरूण निरगुडा, सदस्य .अरविंद लोभी, निलेश लोभी,  गणेश घोडविंदे  पंढरीनाथ कोळंबे, श्री निलेश पाटील, रमेश शिंदे, सौरभ पिंपळे,  राहूल सरकाटे, निलेश त्रिकोणे,  अतुल भोईर, आकाश गवळीकर, रूपेश शिं

जेष्ठ निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षलागवड व संवर्धन अभियान.*.

*डिकसळ येथे आमदार  महेंद्र थोरवे यांच्या हस्ते वृक्षारोपण*  *कर्जत :प्रतिनिधी* जेष्ठ निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी  प्रतिष्ठानच्या वतीने  वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.सदर कार्यक्रम तातोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी  कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बैठकीचे जनक व पुज्यनिय दासबोध ग्रंथातून निरूपण करून डाॅ नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्माचे धडे देताना शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.  तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांनी आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचल

पळसदरी विज समस्यां बाबत आमदार थोरवें साहेब सहीत गृप.ग्रामपंचायतीच्या वतीने दिले निवेदन......

 कर्जत ( अभिजीत दरेकर ) -:   कर्जत तालुक्यातील गृ. ग्रा .पंचायत पळसदरी येथील श्री.स्वाँमी समर्थांच्या पवित्र भूमित विज समस्यांनी येथील   नागरीक प्रचंड  हैराण झाले आहेत.पळसदरी या गावातील वाढत असलेल्या  लोकसंख्येच्या  गावात  सतत सूरु असलेल्या विजेच्या  लपंडावामुळे  नागरीक त्रस्त झाले असून विजे अभावी येथील नागरीकांना अनेक  अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या वस्तीमधे विजेची समस्या दूर व्हावी यासाठी  विद्युत ट्रान्सफार्मर बसविणे आवश्यक असल्याबाबत  उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.महामंडळ कर्जत येथील कार्यालयात दि.०७  जून  2021 रोजी कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी   निवेदन दिले  आहे..तसेच पळसदरी हद्दीमधील पळसदरी गावातील स्मशानभूमी येथे रात्री अपरात्री अकस्मिम मृत्यु झालेल्या मयत  व्येक्तींना घेवून जाणे मोठे जिकरीचे झाले असून या ठिकाणी विजे अभावी अंधार असल्यामुळे साप ,विंचू व अन्य सरपटणार्या विषारी जनावरांच्या भितीने येथील नागरीकांना  जिव मुठीत जावे लागत  असल्याने  स्मशानभूमीमधे विजेचे पोल लावण्याची मागणी  गृ.ग्रा.पंचायत पळसदरीच्या वतीनेही संबधित अधिकार्यांन

शिवसेना आवजड वाहतूक सेनेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

  https://youtu.be/oXT-mWUAItM खोपोलीतील डॉक्टरांचा केला सन्मान शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इंद्रजीतसिंह बल यांच्या वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधुन केला उपक्रम... रुपेश बैलामारे यांचा पुढाकार खोपोली (अभिजित दरेकर ):-खोपोली नगर परिषद हद्दीत आज शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इंद्रजित सिंह बल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खालापूर तालुका अध्यक्ष रुपेश बैलमारे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करून खोपोली मधिल डॉक्टर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले.      सदर समयी रुपेश बैलमारे (खालापूर तालुका अध्यक्ष), मोहन अरमान(खालापूर तालुका उपाध्यक्ष ), अभिजित दरेकर (खालापूर तालुका उपसचिव ), मलकीत सिंग, हुसेन शेख (खोपोली शहर सचिव ), प्रफुल्ल कदम (सदस्य ), जयेश पाटिल (तालुका उपसंघटक ), रेश्मा आंग्रे (शिवसेना खालापूर महिला ), योगेश शिंदे (तालुका सचिव ), डॉ. मनोज मिश्रा, डॉ. उमेश गुंडरे, डॉ. प्रसाद पाटिल, डॉ. गणेश मोरे, जैनदत्त झरकर व असंख्य सदस्य उपस्थित होते.

अभिनेता अजिंक्य देव यांनी घेतली आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट...

कर्जत (प्रतिनिधी) मराठी सिनेमा स्टार अभिनेते अजिंक्य देव यांनी कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आगामी चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी आपण कर्जत ग्रामीणची निवड केल्याचं त्यांनी सांगितले. तर कर्जतचे निसर्ग अनेकांना भुरळ घालतो त्यामुळे येथे आले की मन प्रसन्न होते असेही त्यांनी नमूद केले यावेळी आमदार यांनी अजिंक्य देव यांचे स्वागत केले. यावेळी सेनेचे नगरसेवक संकेत भासे,प्रसाद थोरवे ,अभिषेक सुर्वे यांच्या सह कार्यालयीन सर्व स्टाफ उपस्थित होता.

घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

कर्जत-|कर्जत प्रतिनिधी                केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई  विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन पुकारले असल्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे, त्यांच्या  सूचनेनुसार रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात हे आंदोलन आज दिनांक 3 जुलै रोजी करण्यात आले होते.             कोरोना चे नियम पाळून कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारच्या निषेध म्हणून मोठ्या प्रमाणात फलक बाजी करण्यात आली होती तर मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. रंजना धुळे, ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण,राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी तालुका अध्यक्ष एकनाथ धुळे, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष सागर शेळके, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, शरद लाड, आदी सह कार्यकर्ते मोठ्या