Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

कर्जत चार फाट्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी नारीशक्तीने छेडले बेमुदत उपोषण*

    कर्जत : ( कर्जत प्रतिनिधी )               कर्जत शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा आहे. या चारफाट्यावर कृषी संशोधन, प्रादेशिक केंद्र असून त्यांच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाई होण्यासाठी नारीशक्ती संघटनेने मंत्रालय ते शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार केले होते. त्यासंदर्भात कारवाई होण्यासाठी आदेश आले असतानाही कारवाई केली जात नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने मंगळवारी २९ जून ला टिळक चौकात उपोषण छेडले आहे.            मंगळवारी सकाळी 11 वाजता नारीशक्ती चे संघटनेचे ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे हे उपोषणाला बसले असून अर्चना हगवणे, नीता केरकर, मानसी बार्शी उपस्थित होते.                      दिवसेंदिवस चारफाट्यावर अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये प्रसिद्ध पर्यटन केंद्र माथेरान असल्याने तसेच डॅम , धबधबे, फार्महाउस , किल्ले, लेणी , जंगल परिसरामुळे गिर्यारोहण करण्यासाठी व  पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मुंबई -पुण्यावरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यात शनिवार व रविवारी या सुटीच्या द

सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार*...

खोपोली :-(किशोर साळूंके )                              कोरोनाच्या संकटात अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत.महाराष्ट्रात बऱ्याच संस्था व व्यक्ती अंत्यसंस्कार करण्यासाठी आपापले योगदान देत असतात.समाजात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थामुळे गरजु घटकांना याचा मोठा आधार होत आहे. दिनांक 28 जून 2021 रोजी खालापूर येथील ज्येष्ठ नागरिक कोरोनामुळे मयत झाले असता खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसेना नेते व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे  नवीन घाटवळ यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद देऊन सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपाध्यक्षा इशिका शेलार, कार्यवाह बी. निरंजन,बंटी कांबळे,आफताब सय्यद यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून सदर प्रेताचे खालापूर येथील स्थानिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार पूर्ण केले. या अंत्यविधीसाठी पी.पी.ई.किट कर्जत येथील युसूफ भाई यांनी उपलब्ध करून दिले.  कर्जत व खालापूर तालुक्यात आवश्यक असल्यास 24 तास निशुल्क सेवा पुरविण्यास सहज टीम 24 तास उपलब्ध आहे,गरजूंना यासाठी नक्की कळवावे असे आवाहन सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित हरिष काळे यांचा वाढदिवस साजरा

  खोपोली :-(किशोर साळुंके)-:खोपोली नगरीतील शिवसेना नेते हरिष काळे यांचा वाढदिवस कोरोना काळ असल्याने साध्या पद्धतीने करण्यात आला. या समयी आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.       सर्व देशाभर कोरोनाचे संकट आहे.अनेक सामाजिक कार्यक्रम रद्द होत आहेत. अशात आपल्या नेत्याचा वाढदिवस असेल तर कार्यकर्ते उत्साहात असतात. नेत्यांना भेटायला तुडुंब गर्दी होते. असेच एक नेते, खोपोली नगरीतील शिवसेना पक्षाचे तरुण तडफदार नेते हरिष काळे यांचा वाढदिवस आला. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते तसेच मित्र परिवाराची गर्दी होणार हे निसश्चित होते. पण त्यांनीच सर्वांना नम्रपणे वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद पर संदेश पाठवून गर्दी न करण्याचे आवाहन केले. प्रेम करणाऱ्यांचा हिरमोड झाला पण सर्वांनी प्रेमरूपी संदेश देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.        खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे व तालुक्यातील दिग्गज शिवसेना नेते यांनी एकत्र येत सर्व नियम पाळत वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न केला.

उर्मिला रविंद्र देवकर यांच्या वतीने छत्री वाटप

खोपोली (किशोर साळुंके):खोपोली नगर परिषदेच्या माजी नगर सेविका उर्मिला रविंद्र देवकर यांच्या वतीने साईबाबा नगर मधिल नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.        कोरोना काळ असल्याने अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रोजंदारीचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत साईबाबा नगर येथील माजी नगरसेविका उर्मिला रविंद्र देवकर यांनी आपले पती रविंद्र देवकर यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन कोरोना काळात गोळया, औषधंचे वाटप, तसेच धान्य वाटप करून अनेक जणांना कोरोना काळात दिलासा दिला आणि आज पुन्हा सामाजिक अस्मिता जपत आपल्या प्रभागातील नागरिकांना छत्र्या वाटप करून एक आदर्श निर्माण करून दिला.

.*DigiBreaking न्युज पोर्टल चा मनसे आमदार राजुदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.*

कर्जत : सध्याचे युग हे प्रचंड धावपळीचे आणि गुंतागुंतीचे झाले आहे अशातच महाराष्ट्र भरतील बातम्या आपल्या हातात सतत असणाऱ्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर फक्त एका क्लिक वर पहायला मिळाव्यात या साठी आज पत्रकारिता क्षेत्रात अनेक डिजिटल न्युज पोर्टल कार्यरत आहेत.       आज मनसेचे आमदार राजू पाटील हे कर्जत शहरात आले असता त्यांच्या हस्ते या डिजिटल न्युज पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार राजू पाटील यांनी संकल्पनेचे कौतुक करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच क्षेत्रात प्रगती करत राहण्याचे आशीर्वाद दिले.यावेळी मंचावर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष जेपी पाटील,खलापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णुक,सचिव अभिजित घरत,खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सपना देशमुख, महिला खलापूर तालुका अध्यक्ष हेमताई चिंबुळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेचे इंजिन धीम्या गतीने येऊन सुद्धा पाटलांच्या लोकप्रियतेमुळे अन तरुणाईच्या उत्साहामुळे ताटकळत का होईना पण सुसाट धावलं...!

  कर्जत- : कर्जत प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन तसेच डिकसळ ते उमरोली स्वयंचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहळा मनसेचे लोकप्रिय आमदार राजुदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला.आमदार साहेबांच्या लोकप्रियतेची प्रचिती आज सर्व पत्रकारांना दिसून आली मनसेचे इंजिन धीम्या गतीने का येत आहे हा प्रश्न पत्रकारांसकट कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांमध्ये पडला होता.तब्बल दोन अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर आमदार राजू पाटील साहेबांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला दोन तास ताटकळत बसून सुद्धा जमलेल्या  कार्यकर्त्यांनमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला  (पॉपुलैरिटी) लोकप्रियता काय असते तरुणाई आशा लोकप्रियते मागे का धावते हे आज समजलं  मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आज कर्जतच्या भूमीत कार्यक्रमा निमित्त येत असल्याचे समजताच जागोजागी कार्यकर्त्यांनी व  हितचिंतकानी त्यांचा सत्कार केला लोकांनी एवढ्या मनोभावणेने केलेल्या सत्काराचा स्वीकार करता करता त्यांना कार्यक्रमाच्या सोहळ्याला यायला बराच वेळ लागला तरी प्रत्येकजण त्यांच्या येण्याची वाट प

अनधिकृत फिटनेस क्लबवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी*

 *अनधिकृत फिटनेस क्लबवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी*  रायगड: (प्रतिनिधी ) कर्जत नगरपरिषद हद्दीतील नानामास्तर नगर येथे मुद्रे गावातील नागरिकांना शासनाने निवासी कारणासाठी भूखंडाचे वाटप केले होते. सदर भूखंड हस्तांतरण करण्यास व वाणिज्य व्यवसाय करण्यास तरतूद  नसताना एका विकासकाने यावर इमारत विकसित करून त्याठिकाणी सुसज्ज जिम उभारल्याच समोर आलं आहे. तसेच बांधकाम नियमावली नुसार पार्कींग साठी जागा न सोडता त्याठिकाणी ऑफिस सुरू केले असल्याने सामाजिक कार्यकर्ते किरण ठाकरे यांनी या इमारतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर इमारतीच्या जागेचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले आहे का? मूळ मालकच याचा वापर करत आहे का? याबाबत तहसीलदार कर्जत यांना विचारणा करून शर्थभंग झाला असल्यास जमीन शासनजमा करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. तसेच नगरपरिषद कर्जत यांच्याकडे अनधिकृत बांधकामाबाबत  आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जमिनीचा शासनाच्या परवानगी शिवाय गैरवापर होत असल्याने शासनाचा गोरगरिबांना घरे देण्याचा उद्देश सफल होणार नाही व शासनाच्या जमिनीचा गैरवापर करून गुन्हेगारी वाढीस लागेल असे मत ठा

सीड बॉलच्या माध्यमातून जंगलात वृक्षारोपण...

खोपोली प्रतिनिधी-- किशोर साळुंके यंदाच्या पावसाळ्यात सहजसेवेचा आगळा वेगळा उपक्रम. सहजसेवा फाउंडेशनने यावर्षी सीड बॉलच्या माध्यमातून जंगल भागात वृक्षारोपण करण्याचा अभिनव संकल्प घेतला होता.सहजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात 20 जून 2021 या दिवशी जवळपासच्या जंगल भागात सीड बॉलच्या माध्यमातून नकळतपणे झाडे उगविण्यास मदत करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.झाडाझुडपात यावेळी असंख्य सीड बॉल टाकण्यात आले. याची सुरुवात विस्तीर्ण जंगल भाग असलेल्या बोरघाटात खालापूर तालुका वनविभाग व महामार्ग पोलीस मदत केंद्र, बोरघाट,दस्तुरी यांच्या मदतीने  करण्यात आली.यावेळी खालापूर तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील, खोपोली वनपाल हिरामण धाकवळ,खोपोली दक्षिणचे वनरक्षक शशिकांत पाटील, आडोशी वनरक्षक शीतल साळुंखे, आत्करगाव वनरक्षक स्वरांजली बांगर, लव्हेज वनरक्षक राजेंद्र बेवनाळे तर महामार्ग पोलीस मदत केंद्र,बोरघाटचे दुय्यम अधिकारी महेश चव्हाण,पो.ह.प्रशांत बोंबे,पो.ना. प्रशांत वर्तक, संतोष बांबळे,रुपेश कोंडे,प्रदीप कोळंबे उपस्थित होते. यानंतर खोपोली येथील जवळच्या जंगलभागात,याक एज्युकेशन सोसायटीच्

सिद्धार्थनगर मध्ये घरातील सामान चोरीला

  खोपोली (किशोर साळुंके ) : खोपोली नगरीतील सिद्धार्थनगर मध्ये घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने घरचे छप्पर तोडून घरातील सामान लंपास केल्याचे उघड झाल्यावर खोपोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.       सिद्धार्थ नगर चे रहिवासी श्री.राणाप्पा चंद्रशा कम्मन हे काही दिवसान पासून काही तांत्रिक अडचणीमुळे सिद्धार्थनगर येथिल घर सोडुन इतरत्र राहत आहेत. त्यांचे घर बंद होते व घरात मोठ्या प्रमाणात सामान, भांडी, फर्निचर होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेऊन कोणी अज्ञात इसमाने घराचे छप्पर व खिडकी तोडून घरातील लाखो रुपयाचे सामान चोरून नेले.     सदर घर मालक व त्यांच्या पत्नी सौ.अक्कम्मा राणाप्पा कम्मन या पावसाळ्यापूर्वी घरावर कागद टाकण्यासाठी आल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी खोपोली पोलीस ठाण्यात रितसर निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली असून पोलीस योग्य तो तपास करीत आहेत.

खोपोली मनसेच्या वतीने वाफेचे मशिन (स्टिमर) वाटप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस केला साजरा....

  🌹  खोपोली --( किशोर साळुंके ) शहरातील महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या वतीने आपल्या लाडक्या नेत्याचा म्हणजे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत  खोपोली शहरातील नागरिकांच्या  व खोपोली पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेत १४  व १५ जून रोजी   वाफ घेण्याचे मशिन  (स्टिमर) वाटप करुन राज ठाकरे यांचा वाढदिवस शहरात  साजरा करण्यात आला.कोरोना काळात स्वताची व आपल्या कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा न करता या काळात आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे खोपोली पोलीसांना  वाफेचे  मशिन भेट देण्यात आले. तसेच कोरोनाच्या वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत   लोहाना हाँल खोपोली येथे शेकडो नागरिकांना  वाफ घेण्याच्या मशिनचे वाटप   खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे व  प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्यांच्या हस्ते करण्यात आले. मनसे  खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील  जनतेच्या जिव्हाळ्याचे समजले जाणार्या अनेक  महत्वाच्या प्रश्नांबाबत शहरातील मनसेने  अंदोलने करुन खोपोलीकरांना  द्याय देण्याचा प्रामाणिक  प्रयत्न केला तर    अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवणा

खोपोली शहरात पाचशे वृक्ष वाटपाचा संकल्प करुन किर्ती ओसवाल यांनी केला वाढदिवस साजरा..

 खोपोली प्रतिनिधी-- किशोर साळुंके /                       खोपोली शहरातील भाजप रायगड जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष तथा शहरतील सुप्रसिद्ध उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते  किर्ती चंपालाल ओसवाल यांनी शहरातील बाजारपेठ व खोपोली पोलीस स्टेशन येथे  विविध जातींच्या वृक्षाच्यांचे  वाटप   खोपोली शहर बिजेपीच्या  पदाधीकार्यांच्या  प्रमुख उपस्थितीत साजरा करुन  शहरात एक वेगळा आदर्श ठेवला आहे.. सामाजिक कार्याची मनात  आवड  व तळमळ असणारे किर्ती ओसवाल यांनी यापूर्वी सुद्धा सर्वसामान्यं नागरिकांसाठी शहरात  मोफत चष्मे वाटप  तसेच भर उन्हाळ्यात लाँकडाउनच्या काळात  त्या तहानलेल्यांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत स्वताच्या खिशाला झळदेत स्वखर्चाने   थंडगार पाणपोई  , शाळकरी मुलांना मोफत मास्क वाटप करणे असे  अनेक  सामाजिक  उपक्रम निस्वार्थपणे राबवले आहेत.. कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे आँक्सिजन अभावी अनेक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले..आँक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी ,प्राण वायूची गरज असल्याने  वृक्ष रोपन ही काळाची गरज  ओळखत ..आँक्सिजनची  कमतरता भरुन काढण्यासाठी वृक्ष रोपन गरजेचे असल्यामुळेच   व