Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

खोपोलीत पार पडणार निशुल्क रजिस्टर विवाह...

किशोर साळुंखे (खोपोली प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्यातील गरजू व दुर्बल घटकांसाठी सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम... सहज सेवा फाउंडेशन ही समाजासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी आपले कर्तव्य मानून सेवा करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.याच सामाजिक भावनेतून दिनांक 21 मार्च  2021 रोजी रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील सुतारवाडी येथे गीता फार्म याठिकाणी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ऋण काढून लग्न करू नका,विवाह हा आयुष्यभर कर्जात जगण्याचा मार्ग बनवू नका असा संदेश देत बऱ्याच कुटुंबातील पुरुष व महिला काबाडकष्ट करून मुलांना शिकवितात,यात बराच पैसे खर्च होतात,मात्र अपत्यांचे विवाह करताना अनेक वेळा कर्ज काढून विवाह केले जातात. आयुष्यभर हलाखीचे जगून पुढील आयुष्य लग्नात काढलेल्या कर्जातच जगावे लागते. म्हणून सहज विवाह संस्था या मान्यताप्राप्त विवाह संस्थेच्या माध्यमातून  सहज सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने  समाजातील दुर्बल घटकांच्या अपत्यांचे विवाह  ( दोन्ही परिवाराच्या संमतीने ) रजिस्टर पद्धतीने न

तहानलेल्यांना पाणी पाजण्यासाठी भाजपचे किर्ती ओसवाल यांनी केली पाणपोईची व्येवस्था !

किशोर साळुंखे /खोपोली प्रतिनिधी  🛑  तहानलेल्यां जिवांना  पाणपोईचा आधार.. 🛑 वरिल स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक .. 🛑 खोपोली -- उन्हाळ्याची चाहूल लागली कि उन्हाचा पारा चढू लागतो  तसतशी घशाला कोरड पडते तसतशी घशाला चार घोट पाण्याचे घ्यावशे वाटतात.आशा तहानलेल्या जिवांची तहान भागविण्यासाठी भाजपचे रायगड जिल्हा व्यापारी सेलचे उपाध्यक्ष तथा खोपोली शहरातील   यशस्वी युवा उद्योजक किर्ती चंपालाल ओसवाल संकल्पनेतून खोपोली शहरातील नागरिकांच्या गर्दीच्या  ठिकाणी शहरातील मुख्यबाजारपेठेत मोफत  पाणपोईची व्येवस्था सूरु  करण्यात आली.दि.15 मार्च रोजी भाजपाच्या उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी  पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.खोपोली शहराचा विचार करता शहरातल्या  मुख्यबाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते तसेच या ठीकाणी दर  गुरुवारी आठवढ्याचा बाजार भरत असतो. शहरातील व ग्रामिण भागातून  या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, येथे येणाऱ्या नागरिकांना बाटली बंद पाणी विकत घेवून पिणे  सर्वांनाच शक्य नसल्यामुळे त्या प्रत्येक तहानलेल्यांना पाणी पाजणे हि आपली भारत

खोपोली शहरातील सर्व प्रभागामधे पतांजली योगपाठ निशुल्क वर्ग शाखा लवकरच सूरु करणार -- हरिश काळे

🛑  खोपोली -- शहरातील शिळफाटा येथे पतांजली योगपाठ हरिद्वार निशुल्क योगवर्ग शाखेचा तिसरा वर्धपान दिन शिवसहकार सेनेचे खोपोली शहरप्रमुख ,देशमुख मराठा संघ खालापूर तालुका उपाध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष एकता मित्रमंडळ शिळफाटा येथील   हरिश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व  शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी हरिश काळे यांनी  उपस्थितीतांना योगाबाबत  मार्गदर्शन करताना बोलत होते कि ,   सद्यास्थितीत नागरीकांना वेगवेगळ्या अजाराने ग्रासले असून धावपळीच्या या जगण्यात आपण आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष करत आहोत , आपल्या आरोग्याची  काळजी न घेतल्याने  विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजारांवर मत करण्यासाठी योगा हा रामबाण उपाय असून , शहरातील  नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी  लवकरच शहरातील विविध भागातील नगरसेवकांच्या मदतीने   संपूर्ण शहरात योगावर्ग सूरु करण्यासाठी  मी स्वता पुढाकार घेणार   आसल्याचे  हरिश काळे यांनी यावेळी सांगितले तर योगाच्या माध्यमातून  अनेकांना जिवदान देणार्या त्या प्रत्येक योग गुरुंना उदंड आयुष्याच्या  काळे यांनी यावेळी शुभेच्छ