Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

विघ्नहर्ता पुरस्कार-२०२१ प्रदान सोहळा संप्पन्न .

खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खोपोली पोलीस ठाण्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, या वर्षीपासून पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये विविध मुद्द्यांवर स्पर्धा सुरू करण्यात आली होती व या स्पर्धेच्या विजेत्यांना “विघ्नहर्ता पुरस्कार” सोहळा खोपोली शहरातील गगनगिरी महाराज यांच्या लगत असलेले कँम्पोलियन रिसाँर्ट येथे वरिल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासोबतच पोलीस ठाणे आवारात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र विश्रामगृहाच्या इमारतीच्या वास्तुची पायाभरणी समारंभ पार पाडण्यात आला. 2021 या पारितोषिक वितरण सोहळ्यात रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे,खालापूर तालुका उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला ,खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल ,खोपोली पोलीस निरिक्षक शिरीष पवार, रसायनीचे पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोली शहरासाठी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीला, सहज सेवा फाउंडेशन, खोपोली अॅक्ट, अल्टा लॅबोरेटरीज या ध्येयवेड्या वरिल चार सामाजिक संस्थांना

कसईशेत येथे हनुमान मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न

परळी : मंगेश वाघमारे सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीतील कसईशेत ठाकुरवाडी येथे रायगड भुषण ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमंत राय यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने दिनांक २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत प्राणप्रतिष्ठा महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवार दिनांक २५ /१२ / २०२१ रोजी वास्तु पुजा, नवग्रह पूजन, होम हवन विधी, हरिपाठ, जलावास, धान्यवास असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा तर रात्री ९ नंतर जागर भजन करण्यात आले. रविवार दिनांक २६ / १२ / २०२१ रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, कळशारोहन, सत्यनारायणाची महापूजा, सामुदायिक हरिपाठ आणि रात्री ९ वाजता गुरुवर्य ह.भ.प. श्री. रामदास महाराज पाटील यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. या कार्यक्रमाला महाप्रसाद हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई रमेश पाठारे व संदेश सखाराम तवले यांच्या वतीने देण्यात आला. दिनांक २६ /१२ / २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलतान

खोपोलीत अपघात,अपघात ग्रसतांच्या टीमसह मदतीला आले नगरसेवक

खोपोली :(प्रतिनिधी ) : खोपोली नगरीत आज सायंकाळी साधारण ७ चे सुमारास अपघात घडला असता अपघात ग्रसतांच्या टीमसह खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक यांनी धाव घेऊन सदर अपघात ग्रस्तास उपचारासाठी दाखल केले. आज सायंकाळी साधारण ७ वाजताचे सुमारास शाम सुंदर राय. (रा. पटेल नगर, खोपोली ) हा इसम युनिमाउंट बिल्डिंग समोरच्या रस्त्यावरून जात असताना एका दुचाकी वाहनाने उडविल्याचे समजले. तात्काळ अपघात ग्रसतांची टीम, स्थानिक नागरिक, रिक्षा चालक यांनी धाव घेऊन अपघात ग्रस्तास खोपोली नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे दाखल केले. खोनपा चे नगरसेवक प्रशांत कोठावळे, नगरसेवक नासिरभाई पटेल, गुरु साठीलकर, खोपोलीतील युवा वर्ग यांनी मोठी धावपळ केली. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून दवाखान्यातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णास इतर रुग्नालयात हलविण्यात आले. (सचिन यादव -LIVE )

नगरसेवक किशोर पानसरे यांनी केलेल्या प्रभाग तिन मधील हटके भूमिपूजनाचे सर्वत्र कौतुक

खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) : खोपोली शहरात गेले काही महिन्यांपासून विविध विकास कामांचे भूमिपूजन सूरु आहेत.ही भूमी पुजने होत असताना प्रभागा क्रमांक तिनचे धडाडीचे व प्रभागाचा विकासाठी आहोरात्र झटणारे कार्यसम्राट म्हणून ज्यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये छाप उमटविणारे किशोर पानसरे यांनी आपल्या प्रभागातील भूमिपूजनाचे वेगळ्याच पद्धतीने , हटके भूमिजनाला सूरवात केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या प्रभागातील नव्याने विवाह झालेल्या नवं दांपत्य यांच्या हस्ते भूमिपूजन केले. नगरसेवक किशोर पानसरे यांनी आपल्या मनोगतात विचार मांडताना सांगितले कि,ज्यांच्या प्रामाणिक काम केलेल्य व माझ्यावर विश्वास दाखवून आज या नगरसेवक या पदावर विराजमान करणारे जेष्ठ नागरीक , मित्रपरिवार , वार्डातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा मान देत भूमिपूजन करुन घेत आहोत. शहरातील प्रकाशनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमित चव्हाण व सोनू चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागून सांड पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठीकाणी सांडपाण्यामुळे दुर्

प्रभाग तिन मध्ये नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून हाँटेल जया बार ते विहारी ठाकुरवाडी या रोडवरील खड्डे बूजविण्याचे काम सूरु . प्रभाग तिन मध्ये नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून हाँटेल जया बार ते विहारी ठाकुरवाडी या रोडवरील खड्डे बूजविण्याचे काम सूरु .

. खोपोली प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खोपोली शहरातील प्रभाग तिन मधील जया बार ते विहारी ठाकुरवाडी या रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम खोपोली नगरपालिकेचे विकासपुरुष समजले जाणारे नगरसेवक पानसरे , यांनी हाती घेतले आहे. यामुळे या रोडवरुन ये- जा करणार्या नागरीकांमधून समाधान व्येक्त होत आहे.या रोडवर अनेक खड्डे पडले होते ,या खड्यांमुळे या रोडवरुन ये जा करणार्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता . यामुळे वाहन धारकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय लक्षात घेवून या प्रभागाचे कर्तव्यदक्ष समजले जाणरे नगरसेवक किशोरभाई पानसरे यांनी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत वरिल रोड वरिल खड्डे बुजवण्यात आल्याने या रोडवरुन ये जा करणार्या नागरिकांनी नगरसेवक पानसरे यांचे आभार मानले. प्रभाग तिन मध्ये येणार्या सर्व रस्त्यांच्चे काम पानसरे यांच्या प्रयत्नाने पुर्ण झाले आहेत .जया बियर बार ते विहारी ठाकुरवाडी रोडसाठी पानसरे यांनी काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कौन्सिलमधे ( सभागृहात ) ५३ लाख रुपयांच्या कामाची मंजूरी घेतल

नगरसेवक समीर मसूरकर व नगरसेविका यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. ५ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे उद्धघाटन ..

खोपोली प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खोपोली नगरपरिषद क्षेत्रात येणार्या प्रभाग क्र.५ मधील आर.डी .नगर गेट पासून ते खोपोली शहरातील मुख्यबाजारपेठ रोड पर्यंत खोपोली नगरपरिषदेच्या माध्यमातून सुखसुविधा अंतर्गत या प्रभागातील कर्तव्यदक्ष समजले जाणारे नगरसेवक समीर मसूरकर व नगरसेविका केविना गायकवाड यांच्या प्रयत्नातून दि.२४ डिसेंबर रोजी डांबरी करणाच्या कामाचे आज खोपोली नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सुमन औसरमल , उपनगराध्यक्षा वनिता कांबळे ,व शहरातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डांबरीकरणाच्या कामाचे उद्धघाटन करुन डांबरीकणाच्याच्या कामाला सूरवात करण्यात आले.प्रभाग ५ मधील नगरसेवक समीर मसूरकर व नगरसेविका केविना गायकवाड यांनी वरिल रोडच्या डांबरीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत वरिल विभागातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे कामाला सुरवात केल्याबद्दल प्रभाग क्र.५ मधील नागरिकांनी नगरसेवक समीर मसूरकर व नगरसेवका केविना गायकवाड यांचे आभार मानले.प्रभाग क्र. ५ मधील संपूर्ण विभागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे उकृष्ट दर्जांची कामे काही महिन्यांपूर्वीच

मा. आमदार सुरेश लाड यांचे आंदोलन तूर्तास स्थगित

खोपोली -(रोहिदास वाणी )-खालापूर तालुक्यातील ३५०एकर जमीन शेतकऱ्यांकडून एका खाजकी कंपनीने विकत घेऊन लोकप्रतिनिधिच्या नातेवाईकांना विकत असल्याचा प्रकार समोर आल्याने व शेतकऱ्यांना अजुन पुर्ण रक्कम मिळत नसल्याने त्यांना न्याय मिळावा या उद्देश्याने माजी आमदार सुरेश लाड यांनी आज खालापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार होते. पण तांत्रिक बाबी मुळे त्यांचे आंदोलन स्थगित करून पुढे ढकलण्यात आले. खालापूर तालुक्यातील नंदनपाडा, गोहे, गोठीवली या ठिकाणी औद्योगिक कारणा करिता न्यूमिलेनियम कंपनीने शेतकऱ्यांकडून साधारण ३५० एकर जमीन विकत घेतली. ती जमीन आता सदर कंपनी काही लोकप्रतिनिधी यांच्या नातेवाईकांना विकण्याचा आरोप होत आहे.तसेच या शेतकऱ्यांना जमिनीचा पुर्ण मोबदला मिळाला नसल्याचे समोर आले. यानंतर मा. आमदार सुरेश लाड यांनी खालापूर तहसीलदार यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण कारवाई न झाल्याने आज २३/१२/२१रोजी लाड यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आत्मदहन करण्यास आले होते. परंतु प्रशासनाच्या विनंतीवरून व तांत्रिक अडचणीमु

शहरातील विविध समस्यांबाबत आम्ही खोपोलीकर या सामाजिक संघटनेचे खोपोली पालिके समोर धरणे आंदोलन ..

🛑 खोपोली शहरातील नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्यां जैसे थे असून शहरातील समस्यांबाबत लेखी पत्राद्वारे पत्रव्यवहार करुन देखील शहरातील समस्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी खोपोली शहरातील विविध भागातील नागरिक एकत्र येवून खोपोली शहरातील नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवणारी आम्ही खोपोलीकर आमच ठरलय या सामाजिक संघटने आज दि.22 डिसेंबर पासून पालिके समोरील मोकळ्या जागेत धरणे आंदोलनाला सूरवात केली आहे. नागरी सुविधा व पालिकेच्या गचाळ कारभारा विरोधात खोपोली शहरातील अनेक गावातील विशेषतः तरुण वर्ग या अंदोलनामधे सामील झाल्याचे दिसून आले.शहरातील नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्या पालिकेने न सोडविल्यास पुढील अंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वरिल संघटने दिला असल्याचे समजते. वरिल संघटकनेच्या अंदोलनाला खोपोली नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे,खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, नगरसेवक अमोल पाटील व शहरातील वेगवेगळ्या राजकिय व सामाजिक संघटने आम्ही खोपोलीकर आमच ठरलय या सामाजिक संघटकनेला यावेळी पाठींबा दि

सम्यक क्रांती विचार मंचच्या वतीने वारकरी परिषद संपन्न

सुधागड -(प्रतिनिधी)- संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सुधागड तालुक्यातील वारकरी संप्रदाय एकत्र आणुन वारकरी परिषदेचे आयोजन सम्यक क्रांती विचार मंचच्या वतीने करण्यात आले. सम्यक क्रांती विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबवितानाच महापुरुषांच्या सन्मानाबाबत विविध उपक्रम, जयंती, मयंती, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय /राजकीय /सामाजिक मदत मिळवून देण्यात अग्रेसर असतात.असेच उपक्रम राबवीत असताना संत गाडगेबाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथी निमित्त मंगेश वाघमारे यांनी वारकरी संप्रदायास एकत्र आणत वारकरी परिषदेचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाची दखल संपूर्ण वारकरी संप्रदायानी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे

वनिता काळे यांच्या प्रयत्नाने शिळफाटा येथे स्पीड ब्रेकर ची निर्मिती

खोपोली (प्रतिनिधी )- खोपोली शिळफाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर स्पीड ब्रेकर बसविण्याची महत्वाची मागणी खोपोली नगर पालिकेच्या नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक सुनिल पाटिल व उद्योजक हरीश काळे यांनी करताच सदर महामार्गचे प्रकल्प अधिकारी यांनी त्वरित ग्रीन पार्क व सेलिब्रेशन हॉटेल समोर स्पीड ब्रेकर ची निर्मिती केली. शिळफाटा खोपोली येथे शाळा असल्याने विद्यार्थी व पालक यांची मोठी वरदळ असते. तसेच व्यापारी, दुकाने येथे ग्राहकांची रेलचेल असते. त्यात महामार्ग अरुंद आहे. वाहने भरधाव पळत असतात. अपघात घडण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक सुनील पाटील, उद्योजक हरीश काळे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे स्पीड ब्रेकर निर्माण करण्याची मागणी करताच त्यांनी त्वरित ती मागणी मान्य करत त्वरित ब्रेकर निर्माण केले. स्थानिक नागरिकांनी लोकसेवकांचे आभार मानले.

खालापूर तालुक्यात सहज निसर्ग शाळेचा शुभारंभ. वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सहजसेवा फाउंडेशनचे साक्षरता वर्गाचे धडे...

प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खालापूर तालुक्यात विविध वीटभट्टी व कंपन्या आहेत.यातील बऱ्याचशा कामगारांची व मजुरांची मुले कायम अशिक्षित राहतात. पर्यायाने ही मुले कायम निरक्षर राहतात. समाजातील हा उपेक्षित घटक साक्षर व्हावा या सामाजिक भावनेतून सहजसेवा फाउंडेशनने महड फाटा येथील वीटभट्टी येथे रविवार दिनांक 19 डिसेंबर पासून झाडाच्या सावलीखालील शाळेचा शुभारंभ केला आहे.दर रविवारी भरणाऱ्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षर बनविण्याचे धडे दिले जातील. याच सोबत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रम सुद्धा राबविले जातील शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना ओळखपत्र पुरविण्यात आले. मुलांना साक्षर बनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असण्याबरोबरच या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी प्रबोधन केले जाईल तसेच वीटभट्टी काम करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य व स्वच्छतेचे धडे देण्यात येतील. या उपक्रमाचा शुभारंभ राजेंद्र फक्के, राजेश पाटील,मोहन केदार,नितीन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी ध्यास प्रतिष्ठान,पुणेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील,चै

संदेश चौधरी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड सर्वस्तरातून संदेश चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

खोपोली - ( किशोर साळुंके ) - खालापूर तालुक्यातील देवन्हावे गृप ग्रामपंचायतीवर समर्थ आघाडीचे बहुमत असल्यामुळे पुढील एक वर्षांंच्या कालावधीसाठी गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारे, कार्यसम्राट समजले जाणारे संदेश चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संदेश चौधरी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने समर्थ विकास अघाडीच्या गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून नवनिर्वाचीत उपसरपंच चौधरी यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मी गेले अनेक वर्ष गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामचे फळ आज मला मिळाले आहे.या पदासाठी माझी निवड सूरवातीलाच व्हावी अशी माझ्या सर्व पक्षातील अनेकांची इच्या होती परंतू राष्ट्रवादी काँ.पक्षाचे सर्वासर्वे आदरणीय नेते शरदचंद्र पवार यांच्या आदेशानूसार प्रथम प्राधान्य महिलांना देण्याच्या आदेशाचे पालन करत मी वरिल पद हे शेवटच्या वर्षी घेतले तसेच आमचे व सर्वांचे लाडके सरपंच अंकित साखरे हे आमचे सर्वच बाबतीत स्ट्राँग असल्यामुळे गावातील विकासकामे मार्गी लावण्यात अडचणी येणार नाहीत .तसेच गावातील विकासकामे करत असताना सत्ताधारी व विरोधक एकत्

खोनपाच्या वतीने आर्टिफिशिआर टेस्टिंग आणि मास्क विरोधात दंडात्मक कारवाई सुरु

खोपोली (प्रतिनिधी)- खोपोली नगर परिषद च्या वतीने खोपोली बाजार पेठेतील व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोफत आर्टिफिशिआर टेस्टिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली.खोपोली नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 15डिसेंबर रोजी ही मोहीम राबविली. तसेच शासनाने कोरोना प्रतिबंधित करण्यासाठी नव्याने कडक नियम राबवीला असून खोपोली नगर परिषदेच्या वतीने बाजार, हॉटेल, मॉल, दुकान, रेसॉर्ट, ढाबे अशा विविध ठिकाणी मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरोधात कडक दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये जितेंद्र गोमासे (कोविड ऍडमिनिस्टर), राजेश मोते (सहाय्यक)तृप्ती पानसरे (परिचारिका), लतिका भोईर (परिचारिका ), आलेख बडगे (डाटा ऑपरेटर ), स्वप्नील गुरव (वार्डबॉय ), संतोष बिराडे (चालक )व खोपोली नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

अस्पष्ट दिसणारे भारताचे संविधान प्रस्ताविका बदलण्याची खोपोली शिवशाही व्यापारी संघाची मागणी

खोपोली - (किशोर साळुंके ) भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली प्रस्ताविका खोपोली नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील भिंतीवर लावण्यात आली आहे. सदरील लावण्यात आलेले संविधान प्रस्ताविका अस्पष्ट शब्दांमधे दिसत असल्याचे खोपोली शहरातील शिवशाही व्यापरी संघाचे अध्यक्ष शिवराज दाखले, कार्याध्यक्ष तौफिक करजीकर व काही पदाधिकार्यांच्या निदर्शनास आली असता पालिकेत लावण्यात आलेले भारताचे संविधान प्रस्ताविका येथे येणार्या नागरिकांना स्पष्टपणे वाचता यावे यासाठी अस्पष्ट शब्दांमधे लावण्यात आलेले प्रस्ताविका बदलून स्पष्ट असे वाचन करता येवू शकेल अशी प्रस्ताविका लावण्यात यावी अशी मागणी खोपोली शहर शिवशाही व्यापारी संघटने मार्फत खोपोली पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवशाही व्यापारी संघ भिवंडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी बाळू लहू नाईक यांची निवड जाहीर.

* प्रतिनिधी-- ( अभिजित दरेकर ) शिवशाही व्यापारी संघ मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष भाई शेट्टी यांच्या सूचनेने व प्रदेश उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी तसेच पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन अण्णा लिमकर यांच्या अनुमोदनाने श्री बाळू लहू नाईक यांचे मुंबईमधील भिवंडी विधानसभा अध्यक्षपदी अध्यक्षपदी निवड संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी शिवशाही व्यापारी संघ मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून निवड जाहीर केली.* नवनियुक्त भिवंडी विधानसभा अध्यक्ष बाळू नाईक यांनी विधानसभेतील व्यापारी वर्ग सर्वसामान्य नागरिक माता-भगिनी दिव्यांग बांधव यांचे यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या.
🔷खोपोली पोलीस टोविंगची धडक कारवाई 🔷 .... LIVE.... 🟡4040 नंबरच्या गाडीवर केली कारवाई 🟡 🟣अनधिकृत पणे खोपोली बाजारात होती.. गाडी उभी🟣 ==================== सचिन यादव -पत्रकार खोपोली -7744093474 ====================

हरवलेल्या मुलीला आईच्या ताब्यात देण्यात रेल्वे यंत्रणेला यश.

प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) कर्जत स्थानकावरून कडून सी एस टी कडे निघालेल्या एका लोकल ट्रेनमध्ये अंबरनाथला दोन महिला आपापल्या मुलांना घेऊन लोकलमध्ये चढत असताना त्यांच्या हातून एक मुलगी अंबरनाथ स्टेशनवर राहून गेली. आई दिसत नाही असे पाहून ती मुलगी रडू लागली. आपल्या अभियानातील रेल्वे कर्मचारी शशी धुळे आणि इतर कर्मचारी वर्गाने या गोष्टीची दखल घेतली. प्रसंगावधान राखून लागलीच लोकलच्या मार्गावरील सर्व स्थानकावर निवेदन प्रसारित करण्यात आले. उल्हासनगर येथे या मुलीच्या आईचा संपर्क झाला. मुलीची आई आणि तिचा मामा अंबरनाथ स्टेशनमध्ये येऊन त्या मुलीला ताब्यात घेण्याची प्रोसिजर केली. आज त्या लहानगीचे आणि तिच्या आईचे नशीब बलवत्तर म्हणून शशी धुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत मिळाली म्हणून मोठी दुर्घटना टळली. अंबरनाथ रेल्वे स्टेशन मास्टर, रेल्वे पोलीस, आणि होमगार्ड यांच्या माध्यमातून हे सोपस्कार पूर्ण झाले. शशी धुळे आणि टीमचे खरोखर कौतुक.
खोपोली - प्रतिनिधी-- किशोर साळुंके . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं ०६ डिसेंबर रोजी शिवशाही व्यापारी संघटणा खोपोली शहराच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारी शिवशाही व्यापरी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष युवराज दाखले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खोपोली पालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक मनिष यादव,आर पी आय(A )गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार कांबळे,शिवशाही व्यापारी संघटनेचे खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफिक करजीकर, शिळफाटा प्रभाग क्रमांक 07 उपाध्यक्ष मयुर पातकर,सोनु परदेशी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रभाग ३ चे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून विहारी ठाकुरवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी शेकडो कोव्हिशिल्डचे लसीकरण. मुख्याधिकारी अनुप दुरे , नगराध्यक्षा सुमन औसरमल व प्रभाग ३ चे लोकनेते तथा कर्तव्यदक्ष नगरसेवक किशोर पानसरें यांचे आदिवासी बांधवांनी मानले आभार... .

खोपोली.- प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका टाळण्यासाठी तसेच आपल्या प्रभागातील विहारी ठाकुरवाडी येथील आदिवासी बांधवांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू नये या प्रामाणिक उद्देशाने प्रभाग क्रमांक ३ मधील विकासपुरुष ,लोकनेते तथा सामाजिक कार्यात सक्रिय असणारे खोपोली पालिकेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून खोपोली शहरातील विहारी ठाकुरवाडीतील शेकडो आदिवासी बांधवांसाठी कोव्हिशिल्ड या दूसर्या डोसचे लसीकरण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या माध्यमातून शहरातील काही गावांमधील नागरिकांना पहिल्या डोसचे लसीकरण सूरु करण्यात आले होते परंतू वरिल डोस घेण्याकरता आँनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी महागडा स्मार्टफोन त्यासाठी लागणारा महागडा मोबाईल डाटा यांसारखी खर्चिक बाब व रजिस्ट्रेशन करण्यासाठी किचकट असलेल्या प्रक्रियेमुळे आदीवासी बांधवांनी लसीकरणाकडे पाट फिरवली होती .सदर बाब नगरसेवक पानसरे यांच्या लक्षात आली असता पालिकेच्या वतीने यावेळी संपूर्ण शहरातील गावागावात लसीकरण मोहीम सूरु करण्यात आली असताना , विहारी ठाकुरवाडी येथील आदीवासी

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खालापूर प्रेस क्लब च्या पुढाकारातून स्पंदन हॉस्पिटलमध्ये पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

खोपोली - प्रतिनिधी-- देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा आज 83 वा वर्धापन दिन राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा होत आहे.. त्याचे औचित्य साधून खालापूर प्रेस क्लब ने खोपोली येथील स्पंदन हॉस्पिटलचे डॉ प्रसाद पाटील यांच्या सहकार्याने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरासाठी खोपोली खालापुर तालुक्यातील जवळपास 35 हुन अधिक पत्रकारांनी सहभाग घेऊन तपासण्या करून घेतल्या त्यामुळे बऱ्याच कालावधी नंतर सर्वच पत्रकार एकत्र आल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली मराठी पत्राकर परिषदेची स्थापना दिन हा महाराष्ट्रात 3 डिसेंबर रोजी साजरा होत असल्याने मुख्य विस्वस्त रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पत्रकार बधुंची आरोग्य तपासणी होत आहे त्यामुळे खालापूर प्रेस क्लब ने ही पुढाकार घेत खोपोली खालापुरातील पत्राकर बंधूंची आरोग्य तपासणी शिबीर खोपोली मधील स्पंदन हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले यावेळी जेष्ट पत्रकार भाई ओव्हाळ,गोकुलंदास येशिकर, प्रशांत गोपाळे ,बाबू पोटे,अमोल पाटील,जयवंत माडपे

खोपोलीमध्ये केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजने अंतर्गत कुस्ती केंद्राचे उद्घाटन.

खोपोली :किशोर साळुंके रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, संचलित "खेलो इंडिया" या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत "जिल्हा कुस्ती केंद्राचे" उद्घाटन रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेल्या अवघ्या तीन कुस्ती केंद्रात खोपोलीच्या स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुलात कुस्ती केंद्र मंजूर करून कुस्तीगिरांचे भवितव्य घडविण्याचा संकल्प या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केला गेला. स्वर्गीय भाऊ कुंभार यांचे स्मरण करून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी त्यांच्याच नावे निर्माण झालेल्या संकुलात कुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्याचा अपूर्व योग आल्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगून या योजने अंतर्गत जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. राज्य क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खोपोली शहरातील कुस्तीगीरांची संख्या पाहता, याच ठिकाणी कुस्ती केंद्र असावे असा आग्रह होता त्या नुसार प्रशासकीय पूर्तता करू