Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

थंडी पासून बचावासाठी गरजूंपर्यंत ब्लॅंकेट वाटप* खोपोली - प्रतिनिधी - किशोर साळुंके खोपोलीत मनसे आणि शहर पोलिस यांचा स्तुत्य उपक्रम

खोपोली (२९ जानेवारी) : सर्वत्र गुलाबी थंडीचे उबदार जाळे पसरले आहे अशातच खोपोली शहरात रात्रीच्या वेळी व पहाटे पर्यंत कडाक्याच्या थंडीचा अनुभव सद्या खोपोलीकर घेताना पहायला मिळत आहेत. थंडी पासून बचावासाठी अनेकजण स्वेटर/ब्लॅंकेट यांचा वापर करत आहेत परंतु रस्त्यावर, फुटपाथवर व गरीब वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना मात्र थंडीची हुडहुड सहन करावी लागत आहे.याची जाणीव ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत खोपोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्तविद्यमाने गरजूंना ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम घेण्यात आला होता. उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांतील गरजूंपर्यंत पोहचून ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. या उपक्रमात खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी कालसेकर, अजिंक्य पाटील, सागर शेवते, मनसेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे, मनसे टेलिकॉम सेनेचे सरचिटणीस मितेश शहा, रस्ते अस्थापणाचे रायगड जिल्हा संघटक संजय तन्ना यांच्या सह सहकारी सहभागी झाले होते.

७3 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या वतीने शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रजासत्ताक दिन उत्साहत साजरा . सिद्धार्थ स्पोर्ट क्लबचे ग्रामस्थानकडू कौतु ++++l

खोपोली-- (किशोर साळुंके ) ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खोपोली शहरातील सिद्धार्थनगर या गावातील सामाजिक कार्यात नेहेमी सक्रिय समजले जाणारे सिद्धार्थ स्पोर्ट क्लब मंडळ प्रणित विश्वरत्न मित्र मंडळ यांच्या वतीने सिद्धार्थनगर येथील डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. . या शुभ दिनी सिद्धार्थनगर या गावातील गावातील शेकडो विद्यार्थ्यांंना वह्या ,बँग,व इतर शालेयउपयोगी वस्तूंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा मोरे , खोपोली शहराचे उपाध्यक्ष अनिल सानप, बहुजन युथ पँथर चे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके व गावातील सामाजिक कार्यकर्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.संध्याकाळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये लहान मुलांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांनी , महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला ह

खोपोलीत सागर पवार मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

      खोपोली - संदीप ओव्हाळ      कोरोनाचा संसर्ग ओसरत असलातरी रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी सर्व सेवाभावी संघटना रक्तदान शिबीर आयोजित करीत असतानाही खोपोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस सागर पवार यांच्या वाढदिसानिमित्ताने मित्र मंडळाच्या वतीने सह्याद्री विद्यायलात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.       यावेळी खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडीक,राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, शिवसेना उप शहर प्रमुख छगन राठोड, रामू पवार, माजी नगरसेवक संजय पाटिल, सुनिल शिंदे, सुशांत म्हामुणकर, समाधान पवार, संदीप गाडे, दिनेश ओसवाल, शब्बीर पटेल, प्रविण महाडिक, लाखन पवार, विशाल चव्हाण, पप्पु जाधव, संतोष मोहिते, परोशन साळुंके, सागर मोहिते यांच्यासह शिळफाटा येथील तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.        कोरोना महारीच्या काळात खोपोलीत सागर पवार मित्र मंडळाने आयोजित केलेला रक्तदान शिबीर चांगला उपक्रम असल्याची प्रतिक्रीया युवा नेते प्रमोद

खालापूर तालुक्यातील हाळ गावाचे शेतकरी तथा उद्योजक दुस्ते बंधूंनी जपली सामाजिक बांधिलकी.

खोपोली प्रतिनिधी :- कर्जत खोपोली रस्त्याचे रखडलेले काम आपल्या मालिकीच्या जागेतून नेण्यास दिली सहमती. अपघातांची मालिका खंडित होणार. कर्जत खोपोली या दोन्ही शहरांना जोडणारा मार्ग निर्माण होत असताना जांबरुंग फाटा या ठिकाणी शेतकरी आणि शासन यांच्या समन्वयात अडचण निर्माण झाली आणि आर्थिक देवाणघेवाणीत अडचणी आल्या. या कारणे रस्त्याचे रुंदीकरण थांबले होते. त्या ठिकाणी अर्धवट परिस्थितीत असलेले निर्माण काम कित्येक महिने वारंवार अपघाताना कारणीभूत ठरत होते किंबहुना अपघातांची मालिका संपतच नव्हती. सामाजिक कार्यकर्ते मुस्तुफा आणि इकबाल दुस्ते बंधूंनी पुढाकार घेऊन होणारे अपघात टाळण्यासाठी तथा वाहतुकीची अडचण दूर व्हावी या हेतूने आपल्याला मोबदला मिळेल न मिळेल किंवा त्या मधल्या तांत्रिक बाबींचा उलगडा कधी होईल न होईल, याची वाट न पाहता बिनशर्त रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगी दिली आहे. आता लवकरच कर्जत खापोली रस्ता पूर्णत्वास येईल. मुस्तुफा दुस्ते हे सामाजिक स्तरावर कार्यरत असतात त्यातही ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्ण

खोपोली - नगर परिषदेतील अनागोंदी कारभाराविरोधात किशोर साळुंके यांचा उपोषणाचा इशारा ... * अनाधिकृत बांधकाम / वाढीव बांधकाम व भाडेकरु घरपट्टीबाबत अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ..

-खोपोली प्रतिनिधी - खोपोली नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे, भाडेतत्वावरिल गाळे,माँल, बिल्डरांनी भाडेतत्वावरिल देलेल्या इमारती,ए.टी.एम,बँका,दवाखाने ,पतपेढ्या, ढाबे, शोरुमची दूकाने ,गोडाउन आदींना वाढीव घरपट्टी तसेच बंगले, इमारती , दूकानांच्या गाळ्यांवर करण्यात आलेले अनाधिकृत बांधकामे , अनाधिकृत बांधकामांना शास्ती लावणे व शहरात सूरु असलेल्या अनेक इमारती या शासनाचे नियम धाब्यावर बसवत असून ग्राहकांची दिशाभूल करणार्या बेकायदेशीर बांधकामांबाबत नगरपरिषदेत वारंवार तक्रार अर्ज करुनही खोपोली नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी पत्रकार , आर,टी. आय कार्यकर्ते तथा बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी २६ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या गेटसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. खोपोली नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर ,बाजारपेठ , आदोशी , शास्त्रीनगर , शिळफाटा , मोगलवाडी अशा विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतव बांधकामे करण्यात आली आहे.वरिल ठिकाणी नगरपरिषदेचे परवाणगी न घेताच मोठ्या प्रमाणात वाढी

वेध सह्याद्रीतर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी रक्तदान शिबिरात ५० हुन अधिक रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

खोपोली : स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती १२ जानेवारी रोजी वेध सह्याद्री मार्फत खोपोली सह संपूर्ण खालापूर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.खोपोली येथील प्रथम सत्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिळफाटा येथे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फक्के व वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात वेध सह्याद्री मार्फत समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ५० हुन अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उदघाटन खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते पार पडले शिबिरात महिलांची विशेष उपस्थिती पहायला मिळाली. या सर्व कार्यक्रमास खोपोली चे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, शिवसेना खोपोली शहर प्रमुख तथा मा.नगरससेवक सुनील पाटील, मा.नगरसेवक मोहन औसरमल, मनीष यादव, मनसेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे, भाजपाचे हेमंत नांदे, अजय इंगुलकर, युवक राष्ट्रवादीचे अतुल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यक

खोपोलीतील अनधिकृत बांधकामांकडे खोनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

खोपोली :(प्रतिनिधी ) : खोपोली नगरपरिषद कार्यक्षेत्रात येणार्या लक्ष्मीनगर ,शहरातील मुख्यबाजारपेठ ,शास्त्रीनगर,आदोशी, साजगाव ,व आदी ठिकाणी नगरपरिषदेच्या जागेत व मालकिच्या जागेतील चाळी , गाळे, राहात्या इमारती वरिल टेरेसवर बेकायदेशीर वाढीव बांधकामे पालिका प्रशासनाची परवाणगी न घेताच उभी केली जात आहेत.तसेच नगरपरिषदेने नेमून दिलेल्या बांधकाम परवाणगीचे नियम धाब्यावर बसवत बांधकाम परवाणगी , नूसार इमारतीचे बांधकाम करत नसल्याचे दिसून येत आहेत , बांधकाम नियम डावलून अधिकारी व वरिल मंडळींच्या संगनमताने शहरातील बेकायदेशीर इमारती उभ्या केल्या जात आहेत..पार्कीग न ठेवणे, सामासीक अंतर न ठेवणे, बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी रोड नसतानाही प्लानमधे रोड दाखवून इमारती उभ्या करणे, बेकायदेशीर रस्त्ते बांधून सदनिका विकून ग्राहकांची फसवणूक करणे अशा पद्धतीने ग्राहकांची सरळसरळ दिशाभूल सूरु असल्याचे चित्र खोपोली शहरात दिसून येत आहे.परिषदेचे अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या खुल्या आर्थिक भ्रष्टाचारामुळे बिल्डर व धनदांडग्यांकडून सूरु असलेले व यापूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर बा

देवन्हावे सरपंच , उप सरपंच ,सदस्य व तमाम गावकर्यांनी खासदार सुनील तटकरे याचे मानले आभार.. प्रतिनिधी - ( किशोर साळुंके )

प्रतिनिधी - ( किशोर साळुंके ) खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवनाव्हे ग्रामस्थनांना भेडसावणार्या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी लावण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे स्मृतिचिन्ह देऊन ग्रुप ग्रामपंचायत देवन्हावेचे कर्तव्यदक्ष सरपंच अंकित साखरे उप सरपंच संदेश चौधरी , विद्यमान सदस्य व तमाम ग्रामस्थ यांच्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे तसेच संबंधित अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल यावेळी कौतुक करून आभार मानले. याप्रसंगी सरपंच अंकित साखरे, उपसरपंच संदेश चौधरी,सदस्य भगवान पाटील, देवन्हावे ग्रामस्थ संजय मामा कडव, भूषण कडव, बंटी नलावडे, रोहीदास पाटील, नितीन चौधरी आदी उपस्थित होते.

खोपोली पोलिसांची कडक कारवाई, मास्क न वापरणाऱ्यानविरोधात दांडात्मक कारवाई ,

खोपोली :(प्रतिनिधी ): संपूर्ण देश भारत कोरोना तथा ओमायक्रोन चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाने खोपोली पोलीस ठाण्याकडून कडक कारवाई सुरु केली असून खोपोली बाजार पेठेत मास्क न वापरणाऱ्यानविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना तसेस ओमायक्रोन चे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त झाल्याने महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध कडक करून शाळांही बंद केल्या आहेत. त्यात मास्क लावणे बंधन कारक केले असून मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार शासकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. याच अनुषंगाने दि.9 जानेवारी रोजी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक अस्वर व कर्मचाऱ्यांनी खोपोली बाजार पेठेत मास्क न लावणाऱ्यानविरोधात धडक कारवाई करत अनेक व्यापारी, ग्राहक, पादचारी, वाहन चालक यांच्या कडून दांडात्मक रक्कम वसुल केली.

केंद्र सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषांच्या यादीतून वगळल्याने पिंपरीत निदर्शने.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी-- साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत वगळल्यामुळे भारतरत्न डॉ.पिंपरी चिंचवड मातंग समजामध्ये तिव्र संतापाची लाट पसरली असून पिंपरी चिंचवड येथील डाँ. बाबासाहेब आज केंद्र सरकार विरोधात आज दि. ८ जानेवारी रोजी निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार विरोधात संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले असून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने सूरु झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज *पिंपरी चिंचवडमधील मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.* यावेळी केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते. संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतात . त्यांचे म्हणणे असे आहे की, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समाविष्ट केले गेले न

छत्रपती शिवाजी विद्यालय वावोशीच्या 1984 मधल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

खोपोली प्रतिनिधी :=( किशोर साळुंके ) कधीकाळी शिक्षण घेण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी 37 वर्षानंतर स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. विद्यार्थीदशेत निर्माण झालेली भावनात्मक बांधिलकी जपत आपल्या तत्कालीन शिक्षक, शिक्षका आणि मित्रांसमवेत एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी विद्यालय वावोशी मध्ये 1984 या वर्षी पास आउट झालेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आपला स्नेह द्विगुणित केला. 2 जानेवारी 2022 रोजी वावोशी जवळच्या आपटी गावातल्या राजेंद्र पाटील यांच्या फार्महाऊसवर या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल विभुते यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, निवृत्त शिक्षक एस के पाटील आणि एम डी पाटील आणि निवृत्त शिक्षिका श्रीमती प्रमिला पवार आणि श्रीमती रंजना पाटील इत्यादी मान्यवर निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होते. आजवर आपण पोलीस दलात कामगिरी बजावत असताना क्राईम डिटेक्शनमध्

खोपोली सुभाष नगर ग्रामस्थांच्या पथ दिप (स्ट्रीट लाईट) च्या मागणीला यश नवीन विद्युत पोल उभारणी कामाला सुरुवात - नागरिकांमध्ये समाधान

खोपोली :(प्रतिनिधी ): खोपोली शहरातील सुभाष नगर या भागात मोठ्या प्रमाणत लोकवस्ती असुन या ठिकाणी नागरी सुविधा व्हाव्यात यासाठी येथील प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव यांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता, त्यामध्ये निवेदन देऊन मागणी केलेल्या सुविधेमध्ये यापूर्वी रस्त्याची समस्या काही प्रमाणात सुटली असून नुकताच या भागातून प्रवास करताना उजेड नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने पालिकेच्या माध्यमातून या भागात रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट खांब बसविण्याचे काम सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुभाष नगर भाग हा मोठ्या लोकवस्तीचा असून या भागात 50 वर्षांपासून वस्ती आहे. या भागात मोठमोठे कारखाने असल्याने पालिकेला नागरी सुविधा देताना अडचणी भासत होत्या. मात्र येथील प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव व येथील गावकऱ्यांनी खोपोली नगरपालिकेकडे कडे नागरी सुविधाचा अभाव असल्याचे निवेदन दिले होते. त्यामध्ये रस्ता लाईट सह अन्य मागण्या केल्या होत्या, त्यानुसार रस्त्या बनविताना काही तांत्रिक अडचणी सोडवून रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले असून रस्त्याच्या बाजूने लाईट नसल्याने रात्रीच्या दरम्यान विशेष

*खोपोली – सोमवार दि. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त @चला कृतज्ञ होऊ या ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांना समजून घेऊ या@ या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने केले होते.*

शिक्षणाचे आद्य समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, श्री. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.* *सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सौ. सुमनताई ओसरमल माजी नगराध्यक्ष, विनिता ताई कांबळे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेविका सौ. वैशाली ताई जाधव, सौ. केविना ताई गायकवाड, यशस्वी उद्योजिका सौ. कांचन ताई जाधव, सौ. सुवर्णा ताई मोरे, शिवशाही व्यापारी संघ चे संस्थापक अध्यक्ष श्री. युवराज दाखले, सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल जाधव, अनिल सानब हे होते.* *सदर कार्यक्रमासाठी खोपोली मधील सामाजिक व राजकीय शेत्रात काम करणारे यांच्यासह युवा वर्ग व इतर समाज बांधव उपस्थित होते.* *यावेळी सौ. सुमनताई ओसरमल, सौ. विनिता कांबळे, सौ. केविना ताई गायकवाड यांनी सावित्रीआईंच्या त्या काळातील शिक्षणासाठी चाललेल्या धडपडीच्या आठवणींना उजाळा दिला. व त्यांच्याच मुळे आज स्त्री शिकली, सशक्त झाली, चूल व मूल बाजूला ठेऊन आम्ही नगर सेविका, न

*क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी साप्ताहिक पत्री सरकार चा वर्धापन दिन संपन्न*

खोपोली :(रोहिदास वाणी ):रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारे मराठी साप्ताहिक पत्री सरकार चा १७ वा वर्धापन दिन क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंती दिनी जनता विद्यालय प्राथमिक शाळा येथे जल्लोषात साजरा झाला. रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक, राजकीय, वैयक्तिक, सरकारी, न्यायालयीन अशा विविध स्तरावरील विषयांवर भाष्य करणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे मराठी साप्ताहिक पत्री सरकार यांस नविन वर्षात १७ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने संपादक सचिन यादव यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धाचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेत विविध विषय दिले असताना शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेत हि निबंध स्पर्धा यशस्वी पार पडली. मान्यवर शिक्षकांनी यथा योग्य असे परीक्षण करून त्यात विजयी विद्यार्थी निवडले. यात माध्यमिक शाळेतील विजयी विद्यार्थी होते आदित्य धनाजी थिटे (प्रथम क्रमांक ), ऋतुजा संतोष पाटिल(द्वितीय क्रमांक ), अस्मिता गणेश साठे (तृतीय क्रमांक )तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सन्मिष संतोष गाय

बहुजन युथ पँथरचा दणका .. पिडीत महिलेला मिळवून दिला न्याय ..

कर्जत - प्रतिनिधी-- कर्जत तालुक्यातील सालवड येथे एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबध ठेवून फसवणूक केल्यानंतर त्या पिडीत महिलेला न्याय देण्यासाठी सर्वसामांन्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारी बहुजन युथ पँथर मैदानात उतरून फसवणूक करणार्या इसमाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या सालवड येथील महिले बरोबर एका इसमाने लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबध ठेवले .परंतू कालांतराने वरिल इसम पलटला व लग्न न करता त्या महिलेची फसवणूक करत असल्याचे सदर पिडीत महिलेच्या लक्षात येताच त्या पिडीत महिलेने बहुजन युथ पँथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांच्याकडे दाद मागितली आणि त्यांनी आपल्या सहकार्यांसह तात्काळ कर्जत पोलीस ठाणे जावून रात्रभर कायदेशीर प्रक्रिया करत करत सदर फसवणूक कराणार्या इसमाविरोधात ३७६, ४२०, ३४ , अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला सदर पिडीत महीलेला न्याय देण्यासाठी बहुजन युथ पँथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशिलभाई जाधव , यांच्यासह खालापूर तालुका सरचिटणीस सुरज केदारी, चौक शहर अध्यक्ष निलेश मोरे, कर्जत तालुका अध्

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था

खोपोली प्रतिनिधी-- ( किशोर साळुंके ) जिल्हाधिकारी रायगड यांनी केले संस्थेच्या कार्याचे कौतुक आणि केले सहकार्य. गेली अनेक वर्षे आपत्कालीन परिस्थितीत आणि अनेक जोखमीच्या प्रसंगात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून दिल्या गेलेल्या योगदानाची दखल मा. रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून घेतली गेलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये योगदान देताना आवश्यक असलेली उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणारी उपकरणे आणि साहित्य दिनांक 3 जाने, 2022 रोजी मा. महेंद्र कल्याणकर - जिल्हाधिकारी रायगड यांच्या हस्ते, मा. सागर पाठक - रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, मा. पद्मश्री बैनाडे - निवासी उपजिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी राजन जगताप यांच्या उपस्थितीत आमच्या संस्थेला उपलब्ध करून दिले आहे, त्यामधे दहा आसनी रबरी बोट, बोटीसाठीचे इंजिन, लाईफ जॅकेट्स, स्ट्रेचरस् ई. साहित्याचा समावेश आहे. संस्थेचा वतीने गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, महेश सानप, हनीफ कर्जीकर, भक्ती साठेलकर, हरेश सानप हे उपस्थित होते. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने राय

सहज निसर्ग शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप व वैद्यकीय तपासणी.....

खोपोली प्रतिनिधी-- ( किशोर साळुंके ) सहजसेवा फाऊंडेशन सातत्याने सातत्यपूर्ण व समाजास चालना देणारे उपक्रम राबवित असते. लोकसहभागातून समाजकार्य ही संस्थेची ओळख आहे.समाजातील विविध घटकांसाठी कार्यातील एक भाग म्हणून रविवार,19 डिसेंबर 2021 रोजी महड येथून सुरुवात झालेली वीट भट्टी कामगार व मजुरांच्या मुलांसाठी सुरू झालेला दर रविवारचा निसर्ग शाळा उपक्रम आता चळवळ होत आहे.समाजातील अनेक दानशूर उपेक्षित घटकांना शिक्षित करण्यासाठी सरसावले आहेत. दिनांक 02 जानेवारी 2022 रोजी खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते सतिश येरूणकर यांनी सामाजिक बांधिलकी जपून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्याचा संकल्प पूर्ण केला तर वसंत देशमुख मेमोरिअल स्कूल,खोपोलीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप केले याचवेळी वावोशी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ.प्रदीप नथुराम पाटील यांनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली.सामाजिक कार्यकर्ते अशोक ठकेकर,युवा पिढीतील आकाश राजेंद्र फक्के, ज्योती भुजबळ व रामसापीर सेवा मंडळ,खोपोली यांनी शैक्षणिक साहित्यासाठी सहकार्य केले. व