Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटने खोपोली शहरातील शेकडो युवक एकञ येऊन सामाजिक जनतेच्या हिताची कामे करणार - युवराज दाखले

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून खोपोली शहर संघटनात्मक बांधनी करण्या संदभॉत महत्वपूणॕ बैठक आक्षय सावंत यांच्या निवासस्थानी भानवज या ठिकाणी पार पडली. शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष- युवराज दाखले व आर पी आय कोकण प्रदेश अध्यक्ष- तुषार दादा कांबळे यांच्या सामाज हिताच्या कामाचे कौतुक करून पुष्पगुच्छ ,शाल व नारळ देऊन सत्कार केला. या बैठकीला शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/ अध्यक्ष- युवराज दाखले, आर पी आय कोकण प्रदेश अध्यक्ष- तुषार दादा कांबळे,यशवंत काका सावंत,युवा नेतृत्व आक्षय सावंत,ज्ञानेश्वर निकम (व्हि के),राकेश निकम,शेखर नरगड्डी,प्रशांत देशमुख आदी प्रमुख कायॕकतेॕ उपस्थित होते.

खोपोली शहरात होणार भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण

खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. वारंवार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेण्याचे, गाडीच्या मागे धावून पाठलाग करण्याचे प्रकार घडत असतात त्या अनुषंगाने होणारे अपघात वाढत चालले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिळफाटा - खोपोली येथील एका लहान मुलाला रेबीजमुळे आपला प्राण गमवावा लागला होता. ह्या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन खोपोलीतील सजग प्राणी मित्रांनी व्ही. पी.डब्ल्यू. ए अर्थात पशु वैद्यकीय व्यवसायिक हितवर्धिनी संघटना - डोंबिवली यांच्या माध्यमातून श्री कृपा एक्वेरियम- खोपोली, विविध प्राणी औषध निर्माण संस्था, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, covid-19 ॲनिमल फिडर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन 2 ऑक्टोंबर 2021 रोजी करायचे ठरवले आहे. 28 सप्टेंबर हा "अखिल विश्व श्वान दंश निवारण दिन" म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने ही मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण होणार आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर पासून पुढील काही दिवस ही मोहीम राबवून खोपोली शहरातील 300 कुत्र्यांना भटक्या कुत्र्यांना लस दिली जाणा

भाजप पदाधिकारी यांनी घेतली नवनियुक्त अधिकाऱ्यांची भेट.

खोपोली..(किशोर साळुंके ) खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांची भेठ भाजप पदाधिकारी यांनी घेतली. खालापूर तालुका व खोपोली शहरा मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याचे स्वागत केले व सुभेच्छा दिल्या. या वेळी झालेली चर्चे मध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणाऱ्या अडचणीचे मुद्दे राहुल जाधव यांनी मांडले. तसेच या साठी कॅम्पचे आयोजन करावे असे श्रीकांत पुरी यांनी सांगितले. मुख्याधिकारी अनुप दुरे यांना सुभाष नगरचा रास्ता (रेल्वे गेट/ मस्कॉ गेट ते जाधव मामा यांचा घरापरियांतचा रास्ता- जाधव मामा चौक) संदर्भात राहुल जाधव यांनी माहिती दिली. ग्रामस्थांनी नवी रस्त्या साठी केलेले विरोध, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी 50 वर्ष जुन्या रस्त्या डांबरीकरण केले आहॆ तसेच हा रस्ता सार्वजनीक रास्ता म्हणून घोषित करण्यात यावा या साठी खोपोली नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत मंजूर करण्यात आलेला ठराव. सुभाष नग

शिवशाही व्यापारी संघाने महाराष्ट्र टाईम्स 25 न्युजचे मानले आभार...

खोपोली प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) महाराष्ट्र टाईम्स् 25न्युज ने खोपोली शिळफाटा येथील छञपत्ती शिवाजी महाराज अश्ववृढ पुतळा परिसरात सुरक्षाकेबीन बसविण्यासाठी शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतुक आघाडीच्या शिष्टमंडळाने खोपोली नगरपरिषद उपमुख्यअधिकारी बेगळेसाहेब यांना निवेदन दिल्याबाबतची बातमी महाराष्ट्र टाईम्स 25 न्युज चँनेलने प्रसिद्ध करत प्रशासना पर्यंत पोहोचवल्याने खोपोली प्रशासनाने वरिल बातमीची तात्काळ दखल घेत निवेदनात नमुद करण्यात आलेल्या सुरक्षा केबिनची मागणी मान्य करत सुरक्षा केबिन बसवण्यात आल्याने शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.युवराज दाखले यांनी महाराष्ट्र टाईम्स 25 न्युजचे मानले आभार..

खालापुरात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन : वेध सह्याद्री मार्फत स्तुत्य उपक्रम*

खालापूर : खालापूर शहरातील प्राचीन असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत होत्या. खालापूर तालुक्याला ऐतिहासिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून आज खालापूराकडे पहिले जाते. अनेक परिसरात आज विविध प्रकारचे ऐतिहासिक अवशेष सापडताना पहायला मिळत आहेत. ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या वास्तू जतन करणे हे आपले कर्तव्य असून पुढील पीढीसाठी या अवशेषांचे जतन होणे गरजेचे असल्याची संकल्पना घेत वेध सह्याद्री तर्फे खालापूरत सोमेश्वर मंदीर परिसरात संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमे दरम्यान मातीत गाडले गेलेल्या समाधी शिळा, नंदी यांना जमिनीतून बाहेर काढत मोकळे करून स्वच्छता करण्यात आली तसेच शिळा व वीरगळ यांची स्वच्छता करण्यात आली. विरगळीला इतिहास महत्वाचे स्थान असून जो वीरपुरूष जमीन, पशु अथवा आपली स्त्री यांच्या सौरक्षणासाठी लढत असत त्यांच्या मृत्यू नंतर वीरगळ बनवण्यात येत होती. या विरघळी खालापूर परिसरात सापडत आहेत या वरून ऐतिहासिक दृष्ट्या आपल्या परीसराचे महत्व

शिळफाटा येथील छञपत्ती शिवाजी महाराज अश्वमेघ पुतळा परिसरात सुरक्षारक्षकास केबीन तात्काळ बसवा.- युवराज दाखले.

खोपोली किशोर साळुंके -: संदभॉत उपमुख्यअधिकारी बगळे साहेब यांना समक्ष भेटुन शिवशाही व्यापारी संघाच मागणीचे निवेदन दिले. खोपोली- खोपोली नगरपरिषद अंतर्गत शिळफाटा या ठिकाणी सुंदर अश्वमेघ पुतळा उभारण्यात आलेला आहे. परंतु साहेब त्या ठिकाणी सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सुरक्षा करण्यासाठी ऊन,वारा,पाऊस यापासून खुप ञास सहन करावा लागत आहे ही गंभीर बाब उपमुख्यअधिकारी बगळेसाहेब यांच्या निदर्शनास आनुन दिली. या संदभॉत गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षाकेबीन तात्काळ बसवण्याचे आदेश संबधीत प्रशासनाला द्यावेत आशी विनंती केली तात्काळ सकारात्मक चचाॕ करून लवकरच सुरक्षाकेबीन बसवन्याचे आदेश देतो आसा शब्द दिला. यावेळी शिवशाही व्यापारी संघाच्या शिष्टमंडळात संस्थापक /अध्यक्ष- युवराज दाखले,आर पी आय कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार दादा कांबळे,शिवशाही वाहतुक आघाडीचे कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव,रायगड जिल्हाअध्यक्ष शेखर छोञे,खलापुर तालुका अध्यक्ष मा सरपंच आनिल म्हामुनकर , शिवशाही व्यापारी संघ खोपोली शहर कायाॕध्यक्ष तौफीक करजीकर,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भारत बंद’ला शिवशाहीचा संपूर्ण पाठिंबा, बंदमध्ये सामील व्हा; युवराज दाखले यांचं आवाहन

‘ खोपोली :(किशोर साळुंके )- देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शिवशाही व्यापारी संघाने या बंदला पाठिंबा दिला आहे. शिवशाही व्यापारी संघाचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन युवराज दाखले यांनी केलं आहे. युवराज दाखले यांनी खोपोली या ठिकाणी हॉटेल यादगार या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं दाखले यांनी सांगितलं. यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतुक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव,रायगड जिल्हाअध्यक्ष शेखर छोञे,खलापुर तालुका अध्यक्ष तथा मा सरपंच आनिल म्हामुनकर,खलापुर तालुका संघटक आमित जाधव,शिवशाही व्यापारी संघ खपोली शहर कायाॕध्यक्ष तौफीक करजीकर,रायगड जिल्हा संघटक भाऊ सनस,स्वयंमसेवक शाहीद शेख उपस्थित होते.

खोपोली शहरातील प्रभाग ५ मधील २00 नागरिकांसाठी मोफत लसीकरण .. नगरसेवक समीर मसूरकर व नगरसेविका केविना गायकवड यांचे नागरिकांनी मानले आभार...

खोपोली प्रतिनिधी-- किशोर साळुंके:- कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका टाळण्यासाठी तसेच आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू नये या करता प्रभाग क्रमांक ५ मधील विकासकामात व सामाजिक सक्रिय समजले जाणरे विद्यमान नगरसेवक तथा बांधकाम सभापती व नगरसेविका सौ. केविना गायकवाड यांच्या प्रयत्नातून स्वताच्या खिशला झळ देत सामाजिक बांधिलकी जपत २०० नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड डोस खोपोली शहरातील गगनगिरीनगर आश्रमात उपलब्ध करुन दिल्याबद्दल येथील नागरिकांनी कार्यसम्राट नगरसेवक समीर मसूरकर व नगरसेविका केविना गायकवाड यांचे आभार मानले..या दोन्हीही कर्तव्य दक्ष नगरसेवक ..नगरसेविका यांनी राबवलेल्या उपक्रमाचा आदर्श घेवून इतर नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवून नागरिकांना होणारा त्रास कमी करुन प्रत्येक विभागात अशा प्रकारे मोफत लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया लसीकरण घेणार्या नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी समोर व्येक्त केली..यामधे पहिला डोस महीला व पुरुष यांचे लसीकरण करण्यात आले, यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल ग

खोपोली बाजारातील ठेकेदारी पावती बंद.. खो.न.पा.कर्मचारी वसुली करणार..

खोपोली: (सचिन यादव ): खोपोली नगर परिषद ने संपूर्ण हद्दीतील रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यवसाईकांनी कर आकाराणी करण्यासाठी त्यांची पावती फडण्यांचा ठेका दिला होता. त्याची मुदत संपली असून आज पासून खोपोली नगर परिषद चे कर्मचारी /अधिकारी स्वतः कर वसुल करणार यासाठी... खोपोली/शीळफाटा..भाजी मार्केट.. याठिकाणी नोटीसा बजावताना.. खो. न. पा. अधिकारी.. बांदिवडेकर.. सह अधीकारी... =========-========= सचिन यादव.. (पत्रकार ) खोपोली -7744093474.

पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना

सांगली / प्रतिनिधी :- कोल्हापुरला निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सोमवारी पहाटे कराडात पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यानंतर सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे, पवार आणि मुश्रीफांवर गंभीर आरोप केले. काहीही झाले तरी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगून त्यांनी हे सरकार ठोकशाही करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा मुंबईला रवाना झाले. यावेळी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थमंत्रालय, आयकर खात्याचे अध्यक्ष, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २ हजार ७०० पानांचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरु झाली असून मी अधिक माहिती मागविली आहे, ती माहिती दोन दिवसांत मला मिळेल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरु आहे. त्या भीतीनेच राष्ट्रवादी

गणेशोत्सवात योगदान देणाऱ्यांचा खोपोली नगर पालिका प्रशासनाने केला गौरव.

. खोपोली : २० सप्टेंबर २०२१ खोपोली नगर परिषद हद्दीतील घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर यंदाच्या गणेशोत्सव आयोजनात, आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत सुरक्षा, स्वच्छता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका वठवलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे खोपोली नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात गौरव आणि कौतुक करण्यात आले. खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी अनुप दुरे, पोलीस अधिकारी हरेश कळसेकर, यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, बेबी शेठ सॅम्युअल, किशोर पानसरे यांच्या उपस्थितित सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. गणेशोत्सव काळात सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल पोलीस अधिकारी हरेश कळसेकर, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, नगराध्यक्षा सुमनगणेशोत्सवात योगदान देणाऱ्यांचा खोपोली नगर पालिका प्रशासनाने केला गौरव खोपोली नगर परिषद हद्दीतील वर्ष 2021च्या गणेश उत्सव आयोजनात आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत गणेश भक्तांची सुरक्षा, सार्वजनिक स्वच्छता आणि

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जोडो मारो आंदोलन

किशोर साळुंके /खोपोली :-- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना जोरदार घोषणाबाजी केली. आ.दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन करीत निषेध व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.              पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल करीत राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे असा टोला लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेश दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दरेकरांचा खरपूस समाचार घेत महिला पदाधिकाऱ्यांंना राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश देताच राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहराच्या वतीने गुरूवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी -11 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात जोरदार घोषणाबाजी करीत दरेकरांच्या फोटो जोडे मा

प्रभाग क्रमांक ३ मध्ये विकासकामांची बुलेट ट्रेन थांबता थांबेना.. कार्यसम्राट नगरसेवक किशोर पानसरेंच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ३ मधील मोहोनवाडीमध्ये २२ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन..

खोपोली -- (किशोर साळुंके )कोरोनामुळे शहरातील अनेक प्रभागामध्ये विकासकामे ठप्प असताना मात्र कोरोनाकाळात प्रभाग क्र.३ मधील नागरिकांना मुलभूत सुखसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी कोरोना काळातही सातत्याने शासनदरबारी पाठपूरावा करुन आपल्या प्रभागातील मधील नागरिकांसाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त करुन देत केवळ भूमिपूजन करुन चमकोगिरी न करता भूमिपूजन करण्यात आलेल्या त्या सर्वच महत्वाची विकासकामे सूरु करुन आपल्या प्रभागातील विकासकामांची बुलेट ट्रेन सूरूच ठेवण्यात पानसरे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. .१० सप्टेंबर रोजी मोहोनवाडी मधील युवा उद्योजक तथा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभाग ३ मधील मोहोनवाडी गावासाठी तब्बल २२ लाखांचा निधी उपलब्ध करुन देत मोहोनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपंन्न झाला.जून महिन्यांपासून नाँनस्टाँप पडणार्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरावस्था होवून येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याने ही अडचण दूर

प्रभाग क्रमांक ३ मध्ये विकासकामांची बुलेट ट्रेन थांबता थांबेना.. कार्यसम्राट नगरसेवक किशोर पानसरेंच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ३ मधील मोहोनवाडीमध्ये २२ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन..

खोपोली -- (किशोर साळुंके )कोरोनामुळे शहरातील अनेक प्रभागामध्ये विकासकामे ठप्प असताना मात्र कोरोनाकाळात प्रभाग क्र.३ मधील नागरिकांना मुलभूत सुखसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी कोरोना काळातही सातत्याने शासनदरबारी पाठपूरावा करुन आपल्या प्रभागातील मधील नागरिकांसाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त करुन देत केवळ भूमिपूजन करुन चमकोगिरी न करता भूमिपूजन करण्यात आलेल्या त्या सर्वच महत्वाची विकासकामे सूरु करुन आपल्या प्रभागातील विकासकामांची बुलेट ट्रेन सूरूच ठेवण्यात पानसरे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. .१० सप्टेंबर रोजी मोहोनवाडी मधील युवा उद्योजक तथा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभाग ३ मधील मोहोनवाडी गावासाठी तब्बल २२ लाखांचा निधी उपलब्ध करुन देत मोहोनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपंन्न झाला.जून महिन्यांपासून नाँनस्टाँप पडणार्या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरावस्था होवून येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याने ही अडचण दूर

पळसदारी ग्रामपंचायतीच्या सौ.पुजा प्रताप सुर्वे (राजमाता जिजाऊ फाऊंडेशन )यांना "वुमन अचिवमेंट "पुरस्काराने सन्मानित..

कर्जत /अभिजीत दरेकर :- सौ पुजा प्रताप सुर्वे यांचा नामांकित लोकमत प्रिंट मीडिया समूहाने त्यांच्या राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,नवी मुंबई पोलीस आयुक्त अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला . त्यांचा झालेला सन्मान म्हणजे त्यांनी 6 जून 2018 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा या शुभदिनी राजमाता जिजाऊ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. वरिल फाउंडेशनच्या मार्फत विविध शिबीराचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सक्षमी करणासाठी सौ.पुजा प्रताप सुर्वे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. सामाजिक ,राजकीय , क्रिडा , सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सौ पुजा प्रताप सुर्वे यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती भोईर "वुमन अचिवमेंट "पुरस्काराने सन्मानित..

कर्जत: जयेश जाधव कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती संदीप भोईर यांचा नामांकित लोकमत प्रिंट मीडिया समूहाने त्यांच्या सरपंचाच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,नवी मुंबई पोलीस आयुक्त अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .त्यांचा झालेला सन्मान म्हणजे भविष्यात त्यांना गरुड भरारी घेण्यास प्रेरणादायी ठरणार आहे शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून थेट नागरिकांमधून निवडून आलेल्या सरपंच आरती संदीप भोईर यांच्या निवडीला अडीच वर्षात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला त्याच्या कार्यामुळे शिरसे ग्रामपंचायतीला २०१८-१९ वर्षात आर आर पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार त्यांना १४ फेब्रुवारी २०२०रोजी प्रदान करण्यात आला तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना 'उत्कृष्ट सरपंच' म्हणून

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजपचे युवा नेते राहुल जाधव यांच्या ई- आरती संग्रहाचे प्रकाशन.

खोपोली..(किशोर साळुंके ) ..काहीच दिवसांनी येणाऱ्या गणेशोत्सव सणासाठी श्री गजाननाचे आगमन होणर आहे. आशा या भक्ती भावाचा वातावरणात घरगुती व सार्वजनिक मंडळांमध्ये दिड दिवस, पाच दिवस, दाह दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने भाजपचे युवा नेते राहुल जाधव यांच्या ई- आरती संग्रहाचे प्रकाशन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज खोपोली मध्ये लोहना समाज हॉल येथे प्रकाशन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाची उत्तम माहिती असणाऱ्या राहुल जाधव यांनी भाजप मध्ये विविध जवाबदऱ्या संभाल्या आहॆ, सोशल मीडिया मध्ये सक्रीय असून त्यामध्ये चांगली पकड आहॆ. या वेळी आमदार प्रशांत दादा ठाकुर यांनी सांगितले की आता हा काळ हा ऑनलाइनचा आहॆ ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन ऑर्डर्स व वेगवेगळ्या ऑनलाइन पद्धतीच्या तंत्रन्यांनाचा आहॆ. त्यामुळे अशा या ऑनलाइन तंत्रणयानावर्ती आपल्या सर्वांसाठी सहजपणे उपलब्ध वाहव्या आणि ते चीर कल टिकावे असे ई-आरती संग्रह राहुल जाधव यांनी उपलब्ध करून दिले आहॆ. राहुल जाधव यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य सातत्याने चालू ठेवले आहॆ, समाजाच्या वेगवेगळ्या वर

खोपोलीत शांतता कमिटीची बैठक संपन्न गणेश उत्सवाच्या पार्श्व भूमीवर सुरक्षा आणि कायदा विषयक झाली सकारात्मक चर्चा.

खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटि सदस्य, समन्वय समिति सदस्य, पत्रकार वा सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी यांची संयुक्तिक सभा पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडली. या वेळी मा.नगराध्यक्षा सुमन औसरमल,उपनगराध्यक्ष विनिता कांबळे, महावितरणचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या वेळी सर्वांनी आपली व समाजाची काळजी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी खोपोली पोलीस तसेच खालापूर तहसीलदारांची परवानगी बंधनकारक राहील. दर्शनाला येणाऱ्यांची भाविक भ

रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवले वासराचे प्राण खोल दरीत उतरून अडकलेल्या वासराला दीले जिवदान

खोपोली (किशोर साळुंके ):- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटातल्या मंकी हिल जवळ दरड कोसळल्याने काही काळ रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तात्काळ त्या ठिकाणी कर्मचारीवर्ग पोचला आणि महामार्गावरचा अडथळा दूर केला होता. त्यासोबत कर्मचाऱ्यांनी काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावर सर्वेक्षण सुरू केले असताना रेल्वे रुळावरून गाईचे वासरू वाट चुकून रुळावरून चालताना त्यांना दिसले. अपघात होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यानी त्या वासराला बाजूला करण्याचे प्रयत्न केले, तोवर समोरून ट्रेन आली. ट्रेनचालकाने सावधानता दाखवत वेग कमी करून हॉर्न वाजवून वासराला सावध केले. अचानक घडलेल्या घडामोडीत भांबावलेले वासरू सैरभैर होवून दरीत कोसळले. ट्रेन पुढे जाताच गणेश पर्चंड, प्रचंड अमोल साठे, हरिष मौर्य आणि इतरजण वासराचा मागोवा घेण्यासाठी दरीत उतरले. दरित कोसळलेले वासरू सुदैवाने लगतच्या पाईपलाईन मध्ये अडकलेले आढळले. सर्वांनी शिकस्त करून वासराला सुखरूप बाहेर काढले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे वासराचे प्राण वाचले. भूतदया दाखवल्या बद्दल रेल्वेच्या अधिकारी वर्गाकड

अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमने सागरला खोल दरीतून सुखरुप वर काढले...

खोपोली -- (गुरुनाथ साठेलकर ) सायंकाळचे सात वाजले होते फुटबॉल या खेळाची आवड असेलला सागर नाईट फुटबॉल खेळण्यासाठी लोणावळा येथून खोपोलीकडे निघाला होता. आपल्या झेन कार मधून दररोजच्या प्रमाण त्याने खोपोलीच्या दिशेने शिंग्रोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूला असलेल्या खिंडीतून प्रवास सुरु केला. आपल्या मोबाईल वरती छान गाणं लावून, ते ऐकत ड्राईव्ह करत होता. अचानक त्याच्या गाडीला जोरदार धक्का बसला, काही कळायच्या आत त्याची चक्क कार उडाली आणि दरीच्या दिशेने कोसळली. कार खोल दरीत खोल कोसळतच धक्के खात खाली पडत होती त्या दरम्यान दोन तीन वेळा ती उलटली देखील. स्टेरिंग वरती बसलेला सागर अचानक झालेल्या या धडकेने पुरता हादरून गेला होता. गाडीचा दरवाजा धक्क्याने उघडला गेला आणि सागर खाली कोसळला, त्याचा मोबाईल देखील दूरवर जाऊन पडला. रात्रीचा किर्र अंधार, आजूबाजूला भयान झाडी झुडपं, वरून पडणारा पाऊस आणि घडलेला प्रकार यामुळे भांबावलेला सागर गांगरून गेला. मात्र मुळातच तो स्पोर्ट्समन असल्याने, पुढे काय करायचं याचं भान त्याला काही क्षणातच आलं. त्या नीरव शांततेत कुठेतरी त्याच्या मोबाईल वरचं गाणं त्याला ऐकू येत हो

रायगड जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा संपन्न. आता प्रतीक्षा राज्य स्पर्धेची.

खोपोली (किशोर साळुंके ) रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, खालापूर तालुका कुस्तीगीर संघ आणि लायन्स क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय २३ वर्षाच्या आतील मुले आणि मुली यांची कुस्ती निवड चाचणी २०२१ ही, दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी लायन्स क्लब खोपोलीच्या सभागृहात संपन्न झाली. अत्यंत सुसज्ज पद्धतीने चाचणीचे आयोजन केले गेले होते. ग्रीको रोमन आणि फ्री स्टाईल प्रकारच्या कुस्त्या यावेळी खेळल्या गेल्या. खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, लायन्स क्लब खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, खालापूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चाचणी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष घासे यांनी केले, कुस्तीगीर संघाचे सदस्य राजू गायकवाड, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे महेश राठी, खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, खालापूर कुस्ती संघाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी कुस्तीगिरांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर यांनी आभार प्र

खोपोलीमधिल मत्स्य व्यवसायिकामुळे पाताळगंगा दूषित

खोपोली - खोपोली नगरीतील महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत सुरु असलेल्या केंद्रातील घाण पाणी पाताळगंगेत सोडल्याने पाणी प्रदूषित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. खोपोली नगरीतील परम पूज्य गगनगिरी आश्रमा समोर महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात मत्स्य विभागाचे केंद्र सुरु असून नव्याने लाखो रुपयांचा ठेका भरून एका व्यवसायिकाने येथे काही वर्षांसाठी काम घेतले आहे. त्याच्या जागेतील सांडपानी /दुर्गंधीयुक्त पाणी /सडलेल्या माशाच्या अवयवांचे पाणी हे पाताळगंगेत सोडण्यात येत असून त्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. खोपोली पासून पेण पर्यंत या गंगेचा प्रवाह सुरु असून अनेक ठिकाणी या गंगेचे पाणी पिले जाते व आवश्यक कामासाठी वापरले जाते. पण सध्या येथिल व्यवसायिकामुळे पाणी प्रदूषित होत असून संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी मागणी होत आहे.. .... संबंधित व्हिडीओ मध्ये सांडपानी पाताळगंगेत सोडताना live दिसत आहे. ............... ⭕️संपादक ⭕️