Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी विजय पताका पुन्हा फडकवली.

सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी दुसऱ्यांदा मास्टर "मि.भारत श्री 2022" किताबाचे मानकरी. इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने पॉंडेचरी तामिळनाडू या ठिकाणी 22 - 23 फेब्रू 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या "मास्टर भारत श्री 2022" या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महामार्ग पाेलिस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आणि गौरवाची बाब म्हणजे हा किताब त्यांनी सलग दुसऱ्यांदा पटकाविला. 15 जुलै रोजी मालदीव येथे होणाऱ्या "मि.एशिया 2022" या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड करण्यात आलेली आहे.‍ ते सध्या मि.ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

खोनपा प्रशासनाने आश्वासन पुर्ण न केल्याने अखेर किशोर साळुंके यांनी उगारले उपोषणाचे हत्यार

खोपोली - (प्रतिनिधी ) खोपोली नगरपरिषद हद्दित मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामे , बिल्डरांकडून भाडे तत्त्वावर देण्यात आलेले सदनिका, तसेच शहरातील दूकाने, माँल , दवाखाने , ढाबे, बार , शोरुम, मेडिकल , एटी.एम , शासकीय व निमशासकीय बँका , पतपेढ्या , आदींना भाडेकरु वाढीव घरपट्टी लावणे, शासकीय भुखंडांवरिल कब्जा, त्या जागेवरिल अनाधिकृत बांधकाम तसेच शहरातील बिल्डरांकडून बांधकाम परवाणगी नूसार इमारत उभी न करता शासकीय नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, पार्कींगच्या जागेत बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, व सद्यास्थितीत सूरु असलेली बेकायदेशीर बांधकामे,अनेक वर्ष पडून असलेल्या कारखांदारांच्या व बिर्डरांच्या मोकळ्या जागेला कर अकारुन महसुल जमा करणे, कंपन्यांमध्ये झालेली बांधकामे या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन खोपोली प्रशासनाने दिले होते.परंतू त्या समस्या जैसे थे असल्याने अखेर बहुजन युथ पँथरचे खोपोली शहराध्यक्ष किशोर साळुंके हे खोपोली नगरपरिषदे समोर उपोषण करणार आहेत.बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी वैयक्तिक पातळीवर खोप

वंचित बहुजन आघाडी व वंचित युवा आघाडी भा.बौ.महासभा विहारी शाखा , नालंदा युवा मंडळ व सुजाता महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने शिवजजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.. शिवजजन्मोत्सवाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन ..

.. वतिने खोपोली -( किशोर साळुंके ) खोपोली शहरातील विहारी गावातील वंचित बहुजन आघाडी व वंचित युवा आघाडी शाखेच्या व भा.बौ.महासभा विहारी शाखा नालंदा युवा मंडळ , सुजाता महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विहारी गावातील नालंदा बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजजन्मोत्सवा निमित्त सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड सेंटर यांचे सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. नालंदा क्रिएटिव्ह ग्रुपने विहाराच्या आवारात शिवनेरी किल्ल्याचा हुबेहूब देखावा तयार केला होता .लक्षवेधून घेणार्या या सुंदर देखाव्याचे येथील निगरिकांकडून कौतूक करण्यात आले.शिवजजन्मोत्सवाच्या या कार्यक्रमास शिवसेना खोपोली शहर युवा अधिकारी काव्याताई खोपकर, वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड,राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सुवर्णाताई मोरे,भा.बौ.महासभा खोपोली शहर माजी अध्यक्ष बंडूजी कदम,पत्रकार भाई ओव्हाळ,किशोर साळुंके,सचिन यादव उपस्थित होते. वरिल मंडळाला शिवसेना खोपोली शहर उपाध्यक्ष अनिल सानप यांच्याकडून शिवाजी महाराजांचा पूतळा भेट दे

संघर्ष करुन ताब्यात घेतलेल्या सिद्धार्थनर मधील जागेत शिवजजन्मोत्सव मोठ्या उत्साहत साजरा ..

खोपोली- (किशोर साळुंके ) शिवजजन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सिद्धार्थनर मधील शिवभक्तांनीही शिवजजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.सिद्धार्थनर मधे जागे अभावी गेले अनेक वर्ष सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जात नव्हती..सिद्धार्थनर मधील तिन ते चार गुंठे असलेल्या मोकळ्या जागेत एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीने अतिक्रमण करुन या जागेवर ताबा घेतला होता .अतिक्रमण झालेली जागा गावातील नागरिकांच्या उपयोगात यावी यासाठी सिद्धार्थनर मधील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किशोर साळुंके , सामाजिक कार्यकर्ते भगवान भाऊ खंडागळे, खोपोली शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष सुवर्णा मोरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बंटी मोरे, सामाजिक कार्यकर्ते तिप्पन्ना आरमान, प्रमोद खाडे, सविता गायकवाड , उषा खंडागळे, यांनी आपला महत्वपूर्ण वेळ देत व स्वताच्या खिशाला झळ देत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व पालिका कार्यालयात सतत पाठपूरावा करुन या कामी दोन वेळा उपोषणाचे हत्यार उपसून वरिल जागा गावकिच्या ताब्यात देण्यात आली. वरिल संघर्ष करताना सामाजिक का

रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अलिबाग संस्थेच्या संचालक पदी दिपक खाडेसरांची यांची बिनविरोध निवड .. खालापूर व खोपोली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून खाडे सारांवर शुभेच्छांचा वर्षाव ..

खोपोली - (किशोर साळुंके ) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष,तसेच खालापूर तालुका शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री.दीपक श्रीधर खाडे सर यांची रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी,अलिबाग.या संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली .सदर निवड महाड येथील परिषदेच्या मेळाव्यात करण्यात आली.पॅनल प्रमुख चेअरमन आणी सर्व संच्यालक मंडळानी एकमुखी ठराव करत 15 फेब्रुवारी रोजी दिपक खाडे सरांची रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अलिबाग संस्थेच्या संचालक पदी निवड करण्यात आली. निवड होताच खोपोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून .खाडे सर यांनी आपल्या कार्यांची सुरवात केली.खाडे सरांची वरिल पदावर बिनविरोध निवड झाल्याचे समजताच खालापूर व खोपोली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व मित्रपरिवारांकडून खाडे सरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.तसेच खोपोली शहरातीत डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवारांकडून दिपक खाडे सरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील शंभर कोटी

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून "गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये" विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

खालापुर तालुक्यातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सामाजिक सप्ताह २०२२ चे आयोजन केले गेले आहे. या सप्ताहात एक पुष्प अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्पण केले गेले. देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदल, पोलीस दल किंवा प्रशासकीय यंत्रणा हेच माध्यम आहे, हा गैरसमज सर्वानी मनातून काढून प्रत्येकजण आपल्या हाती असलेल्या संसाधनातून आणि दैनंदिन जीवन जगत असताना देशाची सेवा सहजपणे करू शकतो याचे विश्लेषण संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी केले. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्कता दर्शवल्यास त्याची तीव्रता कमी होत असते हे छोट्या छोट्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. जगदिश मरागजे यांनी सहज सोप्या शैलीत शालेय विद्यार्थी देखील आपत्कालिन प्रसंगी सावधानता दर्शवून कशी मदत करू शकतो या संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेपासूनच आपण सामाजिक कार्याला प्राधान्य देण्यास शिकले पाहिजे हीच संस्कृती आणि हेच खरे संस्कार असल्याचे सांगीतले. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या प. पू. विश्वमंगल दास स्वामी आणि ब्रह्मस्वरूप दास स्वामी यांनी अपघातग्रस्तांच्या मदत

खोपोली :- स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग नामकरण करण्यासाठी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी घेतील मुख्याधिकारी यांची भेट. सुभाष नगर ग्रामस्थांच्या नामकरण मागणीचे केले समर्थन

खोपोली (खोपोली प्रतिनिधी):- सुभाष नगर ग्रामस्थांनी ५० वर्ष जुना रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाष नगर रस्त्याचे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सरखाराम गेणु जाधव मार्ग व घरा समोरील चौकास जाधव मामा चौक नामकरण करून हा परिसर सुशोभीकरण करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी केली होती. ग्रामस्थांच्या या नामकरण मागणीला खोपोली नागरपरिषदेचे *माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे*, *सुमित्रा ताई कोळंबे*, *जयश्री साळुंखे*, *माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत पुरी,* *तुकाराम जाधव,* *पुष्पा ताई साबळे,* *माजी नगरसेवक तुकाराम शेठ साबळे,* *सूर्यकांत देशमुख,* *काशिनाथ पाटील,* *लक्ष्मण साळुंखे,* *कान्हू कोळंबे,* *शंकरराव सावंत,* *प्रकाश महाडीक,* *अंकुश पवाळी,* *दत्ता वाघमारे,* *जयेंद्र शेंडे,* *रामदास रासम,* *संजय घरडे* या सर्वांनी समर्थन देत मुख्याधिकारी अनुप दुरे यांना तसे निवेदन आज १० जानेवारी २०२२ रोजी दिले आहॆ. स्वर्गीय सखाराम गेणू जाधव हे अनेक वर्ष आमच्या सर्वाबरोबर खोपोली नगर परिषदे मध्ये लोक प्रतिनिधी म्हूणन काम करणारे आमचे सहकारी. महिंद्र कंपनी मध्ये सर्विस करणार

संत रोहिदास महाराज समाज मंदिरासाठी नाममात्र दरात जागा उपलब्ध करुन देण्याबाबत शिवशाही व्यापारी संघाची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी..

खोपोली -( किशोर साळुंके ) खोपोली शहरामधे चर्मकार समाज सुमारे एक हजारांपेक्षा अधिक असून व समस्त बहुजन समाज २० ते २५ हजारांच्या लोकसंख्येत आहेत.अखंड बाराबलूतेदार बहुजन बांधवांची शैक्षणिक व आर्थिक प्रगती सुधरण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येणार असून वरिल बहुजन समाज्याच्या हितासाठी आपल्या कार्यक्षेत्रात येणारी १५ गुंठे सरकारी जागा नाममात्र भाडे आकारुन संत रोहिदास महाराज समाज मंदिरासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत खोपोली शहरातीत सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी सदैव कटिबद्ध समजली जाणारी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने खोपोली नगरपरिषदे मुख्याधिकारी दुरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली अहे. मुख्याधिकारी दुरे यांना निवेदन देताना शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक / अध्यक्ष युवराज दाखले , खोपोली शहराचे कार्याध्यक्ष तौफिक करजीकर , खोपोली शहराचे उपाध्यक्ष निलेश रंगिले ,प्रदेश अपाध्यक्ष रोहीदास जाधव , सदस्य बाबुराव मोरे आदी निवेदन देताना उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सहजसेवा फाउंडेशनचा गौरव... सहज निसर्ग शाळेचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून जागतिक उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव..

मुंबई... सहजसेवा फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असते.सातत्यपूर्ण उपक्रम ही सहजसेवेची ओळख आहे तर सामाजिक उपक्रमातुन नवनवीन जागतिक रेकॉर्ड ही संस्थेची उपलब्धी आहे. दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेली शाळा ही वंचित व उपेक्षित घटकांच्या मुलांसाठी वरदान ठरत आहे.झाडाखाली भरलेल्या शाळेला खऱ्या खुऱ्या शाळेचे रूप आलेले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था या शाळेसाठी भरीव योगदान देत आहेत. 26 जानेवारी 2022 रोजी वीटभट्टी कामगारांच्या सहज निसर्ग शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.टाटा स्टील लिमिटेडचे आस्थापण प्रमुख कपील मोदी व खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या उपक्रमाची जागतिक उपक्रम म्हणून नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यपाल यांनी संस्थेच्या सहज अन्नसेवा, सहज मनोरुग्ण स्वच्छता, सहज स्वर्गरथ, सहज वैद्यकिय उपकरणे, सहज स

देणे समाजाचे...चला,शैक्षणिक मदतीचा हात बनुया.. रमाई माता आंबेडकर जयंती निमित्त व वॅलेन्टाईन सप्ताहच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाचा सहजसेवा फाउंडेशनचा पोलिसांच्या मदतीने सामाजिक उपक्रम.. वंचित व उपेक्षित मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सहजसेवेचे पुढचे पाऊल

खोपोली... कर्जत खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी लहान मुले शाळा शिकण्याच्या वयात विविध कारणास्तव भीक मागत असतात. काहींना परिस्थितीमुळे तर काहींचे पालक कोवळ्या वयात गमावल्यामुळे ही वेळ बऱ्याच मुलांवर येते, त्यामुळे कधी कधी प्रबळ इच्छा असूनही ते शिक्षण घेऊ शकत नाहीत तसेच हातावर पोट भरणाऱ्या समाजात शिक्षणाचे महत्त्व न कळल्याने वर्षानुवर्षे शिक्षणाची दारे न बघणारी मुले आता शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या उपक्रमाचा माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभारंभ करण्यात आला तसेच जगभरात वॅलेन्टाईन सप्ताहच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ हा समाजास नवीन दिशा देणारा ठरेल. खोपोली येथील कचरा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आई वडिलांचे छत्र हरवल्याने अनाथ असलेल्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी स्वीकारून दिनांक 07 फेब्रुवारी 2022 पासून या उपक्रमाची सुरुवात करताना खालापूर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शन लाभणार आहे. यानिमित्ताने भीक मागणाऱ्या मुलांचे

खोपोली शहरात संपन्न झाले रक्तदान शिबीर

खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंके ): लायन्स क्लब खोपोली, अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था व सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक यांच्या विद्यमाने डॉ रामहरी धोटे सभागृह - लायन्स सर्व्हिस सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घघाटन अल्टा लॅबोरेटरीजचे डायरेक्टर आदित्य आणि रीचा धोत्रे यांच्या हस्ते झाले. गोदरेज बॉईज कंपनीचे सीएसआर फंडाचे इन्चार्ज तानाजी चव्हाण, पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, सहाय्यक पोलीस निरक्षक हरीश काळसेकर, समर्पण ब्लड बँकचे अभय तन्ना यांनी शिबिर प्रसंगी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. अल्टा लॅबोरेटरीजचे डायरेक्टर रीचा धोत्रे यानी उद्घाटनाच्या औपचारिकते सोबत रक्तदानाचे कर्तव्यही पार पाडले. लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे हनीफ कर्जीकर, अमोल कदम, अल्टा लॅबरोटरिजच्या कामगारांनी देखील रक्तदानाचे कर्तव्य बजावले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षा पासून सुरू केलेला रक्तदानाचा संयुक्त उपक्रम भविष्यातही "अल्टा लॅबोरेटरीजच्या स्थापना दिवसाच्या" निमित्ताने सु

खालापूर नगरपंचायतीवर भगवा फडकला, खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी रोशनी मोडवे यांची बिनविरोध निवड... *आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचा करिष्मा ,

खालापूर :(सुधीर माने ): खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज शिवसेनेने बाजी मारली असून सेनेच्या विजयी नगरसेविका रोशनी मोडवे यांची बिनविरोध निवड झाली असून सर्व पक्षीयांनी त्यांना शुभेच्छा दिल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळाले. नुकतीच आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर नगरपंचायत ची निवडणूक पार पडली. निवडनुक अत्यंत चुरचीशी पार पडल्या नंतर आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली सदर निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने रोशनी मोडवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. इतर कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे शिवसेना उमेदवार रोशनी मोडवे यांची खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, व नगरसेवक उपस्थित होते.

कर्तव्यदक्ष फाऊंडेशन संभाजीनगर संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अंकुश हाडप यांची निवड....

खोपोली - महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरीकांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी लोकांच्या सेवेसाठी कायम जागृत असलेली कर्तव्यदक्ष फाऊंडेशन संभाजीनगर , औरंगाबाद , महाराष्ट्र संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष विठ्ठल तनपुरे (पाटील) यांनी केली असून या संस्थे मार्फत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असून हे कार्य पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यामधील नेहमी चर्चेत असलेले संभाजी ब्रिगेड , शंभू राजे युवा क्रांती सेना यामधे आक्रमकतेने काम केलेले अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे डॅशिंग सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले अंकुश हाडप यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे... कर्तव्यदक्ष फाऊंडेशन संस्थेत अंकुश हाडप यांची निवड होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील गाव व शहरांमध्ये जर कोणा गरीब , गरजू , गरीब व महिला यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी संपर्क साधावा अन्याय करणार्‍यांना आम्ही कायद्याची अंमलबजावणी करत कारवाई करू असे आवाहन प्रदेश अध्यक्ष अंकुश हाडप यांनी केले

रेल्वे-मस्को गेट ते सुभाषनगर ५० वर्ष जुन्या पुर्वपार रस्त्यास स्वर्गीय सखाराम गेणु जाधव मार्ग व घरा समोरील चौकास जाधव मामा चौक नामकरण करण्यास सुभाष नगर ग्रामस्थांची आग्रही मागणी. ग्रामस्थांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट .

खोपोली : (प्रतिनिधी ) : सुभाष नगर ग्रामस्थ गेले दोन वर्ष रस्त्या साठी संघर्ष करीत आहॆ. खोपोली नगरपरिषदेने सुभाष नगर ग्रामस्थ व महिंद्र कंपनीनी कुठलेही मागणी नसतांना नवीन पर्यायी रास्ता वासरंग ठाकूरवाडी, अय्यप्पा मंदिर, सुभाष नगर ते जे. सी. एम. स्कूल चा कमाल सुरबत केली होती. ११ डिसेंबर रोजी सुभाष नगर खोपोली येथील ग्रामस्थांनी ५० वर्ष जुना रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाष नगर ( जाधव मामांचा घरा परियांत) रास्ता काम स्वरूपी जाण्या येण्यासाठी असावा नवी पर्यायी रास्ता नको याचे निवेदन तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना सर्व ग्रामस्थांनी जाऊन नगरपरिषदे मध्ये भेटून दिले होते. ग्रामस्थांची आक्रमकता बघत नगर परिषदेने सदर नवीन रस्त्याचे काम ताबडतोब थांबवले. सुभाष नगर ग्रामस्थानी नगर परिषदे कडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. 1. नवीन पर्यायी रास्ता नको 50 वर्ष जुना रास्ता कायम असावा. 2- सदर 50 वर्षे जुना रास्ता खराब झाला आहे त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. 3. या रस्त्याचे खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग व त्यांच्या घरा समोरील चौकस जाधव मामा चौक असे नामक