खोपोली (किशोर साळुंके ):महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने १८ते ४५ वर्षांच्या वरिल सर्व नागरिकांना कोविड लसीकरण करण्याचे आदेश संपूर्ण राज्यातील शासकीव रुग्णालयांना दिले आहे.तसेच या आदेशा नूसार लसीकरण करण्याचे काम सूरु केले आहे.सदर लसीकरण करुन घेण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी करणार्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे.परंतू अनेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाही तर काहींना आँनलाईन नोंदणी करण्यास अडचण होत आहे.या नागरिकांना आँनलाईन नोंदणी करण्यास अडचणी येवू नये यासाठी खोपोली शहर महिला राष्ट्रवादी काँ.पक्षाच्या अध्यक्षा सुवर्णा संतोष गायकवाड यांनी पूढाकार घेत शहरातील विविध भागात त्यांच्या कार्यकर्यांनी नोंदणी सूरु केली आहे.या कार्यक्रमानूसार प्रभाग क्रमांक ३ मधील मोहोनवाडी येथील समाजमंदिरात लसीकरण करण्यासाठी नोंदणी सूरु केली असून यावेळी असंख्य नागरिकांनी राष्ट्रवादीच्या वतीने सूरु केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आहेत.या उपक्रमाचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment