लॉकडाउन नंतर उशीरा ऍटोचालकांना व्यवसायाची परवानगी मिळाली. तोपर्यंत बॅंकांनी माफ केलेले कर्जाचे तीन हफ्ते भरण्याची वेळ आली. कोरोनाच्या भितीमुळे ग्राहक देखील ऍटोमध्ये बसण्यास घाबरत होते. त्यामुळे कमाई देखील मागील दोन महिन्यात कमीच होती. दिवाळीपासून थोडी फार ग्राहकी सुरू झाली. तोपर्यंत बॅंकांनी कर्जाचे पुर्वीचे तीन हफ्ते भरण्यासाठी तगादा सुरू केली. खासगी वित्त संस्थाचे प्रतिनिधी रस्त्यावर ऑटोचालकांना अरेरावी करण्याचे प्रकार घडले. तेव्हा हे प्रकरण चांगलेच चव्हाट्यावर आले. त्यानंतर या वित्तीय संस्थांनी वसुली व वाहन वसुलीच्या नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली. आधीच थोडी फार कमाई झाल्यानंतर मागील काही महिन्यातील उधारीच्या रकमाची फेड करणे देखील आवश्यक झालेले होते. या त्रासातही दिवाळीपासून थोडा फार व्यवसाय सुरू झाला .खोपोली : कोरोना संकटात वाढीव हफ्ते व व्याजाचा भुर्दंड बसल्यानंतर ऍटोचालकांना आता नुतनीकरणाच्या खार्चिक अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यात कमाई कमी व देणी जास्त झाली असताना प्रशासनाने गणवेश, नुतनीकरणाची सक्ती चालवल्याने ऍटोचालक अधिकच अडचणीत सापडले आहेत. नुतनीकरणाची वाढवलेली मुदत डिसेंबर मध्ये संपत असल्याने हे नुतनीकरण करणे आवश्यक झाले आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment