Skip to main content

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेवरच झाले पाहिजे, शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे 100 % वेतन कोष्ठमारा मार्फत देण्यात यावा. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी तात्काळ देण्यात यावी, सातव्या वेतन आयोग्याच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.2 राज्यातील नगर पंचायती मधील उद्घोषणा पुर्वीचे व उद्घोषणा नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विनाअट सरसकट समावेशन करून आहे त्या पदावर किंवा अन्य पदावर कायम करण्यात यावे व मित्रा संस्था नाशिक यांनी प्रशिक्षण न घेतल्यामुळे राहिलेल्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ समावेशन करण्यात यावे. नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांची जुनी सेवा हि सेवानिवृत्ती व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी. समावेशनापूर्वी मयत व निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीचा लाभ / एकवेळचे विशेष अनुदान मंजूर करावे त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यात यावे.3 राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील 10 /4/ 1993 पुर्वीचे व नंतरचे राहिलेल्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे त्वरीत समावेशन करण्यात यावे. 10 /9 /1993 पूर्वी कायम झालेले तसेच त्यानंतर सन 2000 पर्यंतचे काम झालेल्या सर्व सफाई कामगारांना लाड व पागे समितीच्या वशीला पद्धत लागू करून त्यांच्या वारसांना नियुक्त देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या विविध जाती-धर्माच्या सर्व सफाई कामगारांना लाड व पागे समिती वशीला पद्धत लागु करण्यात यावी. 4 राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीमधील सर्व कर्मचान्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दि. 1 जानेवारी 2016 पासून 10 ,20 ,30 ची आधासित प्रगती योजना त्वरीत लागू करण्यासंदर्भात संचालक कार्यालयाने नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावास मंजूर करून स्वतंत्र आदेश निर्गमीत करावेत. अशा अन्य मागण्यांचे मागणी पत्र पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांना देऊन यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी केली याच दरम्यान लक्ष वेदण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली मात्र या मागणी पत्रावर कोणताच निर्णय घेण्यास पालिका प्रशासन पुढे येत नाही त्यामुळे येथील कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत पालिका कार्यालया समोर घोषणा बाजी करीत सोमवारी दि 23 मे रोजी हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करून शंभर टक्के काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल अशा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिला असून या आंदोलनाचा शहराच्या स्वच्छते वर पारिणाम होणार आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त