Skip to main content

अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमने सागरला खोल दरीतून सुखरुप वर काढले...

खोपोली -- (गुरुनाथ साठेलकर ) सायंकाळचे सात वाजले होते फुटबॉल या खेळाची आवड असेलला सागर नाईट फुटबॉल खेळण्यासाठी लोणावळा येथून खोपोलीकडे निघाला होता. आपल्या झेन कार मधून दररोजच्या प्रमाण त्याने खोपोलीच्या दिशेने शिंग्रोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूला असलेल्या खिंडीतून प्रवास सुरु केला. आपल्या मोबाईल वरती छान गाणं लावून, ते ऐकत ड्राईव्ह करत होता. अचानक त्याच्या गाडीला जोरदार धक्का बसला, काही कळायच्या आत त्याची चक्क कार उडाली आणि दरीच्या दिशेने कोसळली. कार खोल दरीत खोल कोसळतच धक्के खात खाली पडत होती त्या दरम्यान दोन तीन वेळा ती उलटली देखील. स्टेरिंग वरती बसलेला सागर अचानक झालेल्या या धडकेने पुरता हादरून गेला होता. गाडीचा दरवाजा धक्क्याने उघडला गेला आणि सागर खाली कोसळला, त्याचा मोबाईल देखील दूरवर जाऊन पडला.
रात्रीचा किर्र अंधार, आजूबाजूला भयान झाडी झुडपं, वरून पडणारा पाऊस आणि घडलेला प्रकार यामुळे भांबावलेला सागर गांगरून गेला. मात्र मुळातच तो स्पोर्ट्समन असल्याने, पुढे काय करायचं याचं भान त्याला काही क्षणातच आलं. त्या नीरव शांततेत कुठेतरी त्याच्या मोबाईल वरचं गाणं त्याला ऐकू येत होतं. त्याच्या डोक्याला आणि गुडघ्याला मार लागला होता त्याचं संपूर्ण अंग ठणकत होतं. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी चाचपडत आपला मोबाईल शोधून काढला. त्याने आपल्या मित्रांना फोन लावला आणि घरच्यांशी संपर्क साधला आपल्यावर जे काही संकट ओढवलं, त्याची कल्पना त्यांने सर्वांना दिली. आपण खोल दरीत पडलो असून आपल्याला वाचवायला कोणाला तरी यावं लागेल असे त्याने सांगितले. सागरचा निरोप मिळताच सगळेच हादरले, कोणीतरी शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळ्याच्या सुनील गायकवाड यांना फोन केला. सुनील गायकवाड यांनी क्षणाचीही उसंत न घेता, त्या संदर्भातला मेसेज अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या ग्रुपवर पोस्ट केला. तातडीचा आल्यानंतर लागलीच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम अलर्ट झाली, सर्वजण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले देखील. प्रथम गुरुनाथ आणि भक्ती साठेलकर जेथे अपघात झाला होता तेथे पोहोचले .त्या ठिकाणी असलेल्या सागरच्या काही मित्र आणि अबु जळगावकर यांनी घटनास्थळ दाखवले. एकंदर परिस्थिती भयान होती आपल्या मित्राला वाचण्यासाठी हे दोघेचजण काय करणार अशी शंका त्या मित्राने उपस्थित केली. मात्र अबू जळगावकर याने गुरुनाथ याना घटनाक्रम सांगितला, क्षणाचाही विलंब न करता गुरुनाथ दरीच्या दिशेने निघाले देखील. काळाकुट्ट अंधार, रिपरिप बरसणारा पाऊस, निसरडी झालेली माती, काट्याकुट्यांनी भरलेली झुडपं, तीव्र उतार, उभा कातळ या कोणत्याच अडथळ्याचा विचार न करता गुरूनाथ यांनी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. आता दुहेरी संकट उभे राहिले की काय ? अशी शंका त्या ठिकाणी असलेल्या सर्वांच्या मनात निर्माण झाली. कारण दरीत उतरलेल्या गुरुनाथ यांचा आवाज देखील येईनासा झाला होता. तोवर वर असलेल्या भक्तीने प्रसंगावधान राखून अमोल कदम, हनिफ कर्जीकर, दिनेश ओसवाल, विजय भोसले, अमोल ठकेकर, नीलेश कुदळे, अरुण म्हापणकर सर्वांना लोकेशन वर संसाधने आणि रेस्कयु साहित्य घेऊन तातडीने बोलवले. यासिन शेख यांची रुग्ण वाहिका स्पॉटवर पोचली. वेळ पुढे सरकत होती. गुरुनाथ मजल दरमजल करत सागरच्या दिशेने उतरत होते. त्यांचाही तोल जात होता, काटे कुठे टोचत होते, ठेच लागत होती, मात्र कोणत्याही परिस्थितीत सागरकडे पोचायचेच या इराद्याने ते पुढे निघाले. सागरला हाक मारायला सुरुवात केली, एका टप्प्यावर सागरने त्यांच्या हाकेला ओ दिला. दोघांचं कम्युनिकेशन होत गेलं, सागर हाकेच्या टप्प्यात आला होता, आता अडचण अशी होती सागर आणि गुरुनाथ यांच्या मध्ये उभा कातळ होता. टार्गेट समोर दिसताच गुरुनाथ त्या कातळावरून घसरून सागर पर्यंत पोचले देखील. सागर जवळ पोहोचताच, आपण दोघेही सुरक्षित असल्याचा मेसेज त्यांनी मोबाईल वरून सर्वांना दिला. आता पुढचे प्लॅनिंग करण्यापुर्वी दोघेही काही क्षणासाठी रिलॅक्स झाले. गुरुनाथ चिखलाने माखले होते, सागर ची देखील तीच परिस्थिती होती. केली सागर ने आपल्याला मार लागलेला आहे, तरी देखील आपण वर चढू शकतो असा विश्वास गुरुनाथ यांना दिला. दोघांची पॉलिसी ठरली, अंधाराला चिरण्यासाठी सागर च्या मोबाईलची बॅटरी कामाला आली. सागरला पुढे ठेऊन गुरुनाथ यांनी वर चढण्यास सज्ज झाले. उभ्या कातळा वरुन वर चढणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी आडवाट निवडली. दोघांनी एकमेकाला सावरायचं ठरवलं. सागरच्या पायात एकच चप्पल उरली होती. वाट काट्याची होती, पाय निसरड्या वाटेवरून घसरत होते, तरीही एकमेकाला आधार देत दोघेही वर चढत होते. एक-दोन वेळा तर चक्क दोघेही घसरले. त्यांनी आता चिखलाने माखलेल्या वाटेवर अनवाणी चालण्याचा निर्णय घेतला. तोवर दिनेश ओसवाल त्या दोघांच्या मदतीला दरीत उतरण्यासाठी सज्ज होवून दोन टप्प्यांमध्ये कम्युनिकेशन होऊ लागलं. मिनिटातच दिनेश, गुरुनाथ आणि सागर एकमेकाच्या नजरेच्या टप्प्यात आले. परंतु पुन्हा तीच अडचण समोर आली, तो म्हणजे उभा कातळ. गाडी खाली पडत असताना तुटलेल्या झाडाच्या फांद्या त्यावेळी कामाला आल्या. त्यांचा आधार घेत सागर आणि गुरुनाथ वर चढले दिनेशनी देखील थोडं पुढे येऊन त्यांना आधारासाठी हात दिला. मग ते तिघेही एकाच सुरक्षित ठिकाणी थांबले. पुढचा टप्पा कसा सर करायचा हे ठरलं. पहिल्यांदा सागरला वर पाठवायचं, त्यानंतर दिनेश यांनी सागरला फॉलो करायचं आणि शेवटी गुरुनाथ हे राहणार होते. तोवर वर अपघातचे टीम मेंबर अमोल ठकेकर, निलेश कुदळे, अमोल कदम मदतीला आले होते. खाली दोर सोडला गेला, दोरापर्यंत पोचणे देखील कसरतीचे होते, सरते शेवटी दोर हाताला लागला ठरल्याप्रमाणे सागर वर चढू लागला. टप्प्याटप्प्याने त्याला वर खेचलं गेलं, मागोमाग दिनेश आणि त्यानंतर गुरुनाथ असे तिघेही वर येऊ लागले. शेवटच्या टप्प्यात महामार्गावरील देवदूत यंत्रणा, बोरघाटचे पीएसआय जगदीश परदेशी,. मृत्युंजय देवदूतचे सदस्य, हनीफ आणि फरहान कर्जीकर, अबू जळगावकर, भक्ती साठेलकर, उदय कोळंबे हे पुढे आले, त्यांनी सागरला सुखरूप वर काढले. तोवर सागरचे बाबा लोणावळ्याहून त्या ठिकाणी पोहोचले होते, आपला मुलगा गंभीर परिस्थिती तर नसेल ना अशी शंका त्यांना भेडसावत होती त्याच सोबत सगळे मित्रही हवालदिल झाले होते. जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सागरला सुखरुप पाहिलं, तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. खंडाळा घाटाच्या दरीतून नव्हे तर साक्षात मृत्यूच्या दाढेतून त्यांचा लाडका सागर बाहेर आला होता. टाळ्या वाजून सर्वांनी अपघातच्या टीमच कौतुक केलं. सागर चे बाबा आणि नातेवाईक अक्षरशः हात जोडून आभार मानत होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमने या प्रसंगावर मात केली होती. सागरला ॲम्बुलन्स मधून उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले गेले. या प्रसंगामध्ये पुढाकार घेऊन, सागरला वर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या गुरुनाथ यांना या धावपळीत थोडा त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे लागलीच सर्वांनी मिळून गुरूनाथ यांना देखील डॉक्टर रणजीत मोहिते यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून काही काळजी करण्याचे कारण नाही असे सांगितल्यावर सगळ्यांच्या मनावरचा ट्रेस कमी केला. शेवटी नगरपालिका रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सागरची सर्वांनी भेट घेऊन ख्याली खुशाली जाणून घेतली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या वाटचालीतला एक अवघड रेस्क्यु ऑपरेशन सार्थपणे यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते..

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...