रायगड जिल्ह्यातील वन्यजीव जीव रक्षकांना एकत्रितपणे चर्चासत्रात आमंत्रित करून वन्य जीवावर प्राथमिक उपचार करणेकरिता टी. टी. सी. अर्थात टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षकांनी" मार्गदर्शन केले आणि सल्लामसलत केली.
वाढत्या नागरी वस्ती, उद्योग धंदे, रस्ते त्याचप्रमाणे इतर निर्माणामुळे रायगड जिल्ह्यातील जैविक वैविध्यता संकटात आली आहे. त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याने वेळीच पावले उचलून प्राणी, पक्षी, सर्प, जलचर इत्यादींचे संवर्धन, संरक्षण होतअसताना त्यांच्यावर उपचार करून प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सर्वांनी वनखात्याशी समन्वय साधून तात्पुरते उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी "साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, गोरेगाव" येथे रायगड जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक एकत्र आले होते. वन्यजीव रक्षकांनी आपल्या समस्या रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक यांच्यासमोर मांडल्या आणि त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना व्हाव्यात याबाबतीतही चर्चा केली.
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील वन्यजीव रक्षकांनी जखमी वन्यजीवावर तत्काळ उपचार होणे कामी महाड आणि पनवेल तालुक्यात टी टी सी चे निर्माण व्हावे अशी मागणी केली.
वनखात्याच्या माध्यमातून वन्यजीव रक्षण होत असतेच ,मात्र रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि व्यापकता पाहता, वन्य जीव रक्षकांनी आपले कर्तव्य म्हणून वनखात्याला सहकार्य करावे आणि ते करत असताना कोणतीही समस्या उद्भवल्यास "रायगड जिल्हा मानद वन्यजीव रक्षक" सहकार्य करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रेमसागर मिस्त्री, गणेश मेहेंदळे, अमित चव्हाण या विद्यमान आणि उल्हास ठाकूर माजी मानद जीवरक्षकानी यावेळी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment