खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंखे )-:
गेली 60 वर्षांपासून वास्तव्यास असणार्या इमारतीवर कारवाई करत सदर कुटुंबीयांचे बेघर करणार्या खोपोली पालिकेच्या विरोधात 15 डिसेंबर पासून ओसवाल कुटुंबीयांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर उपोषण सूरु.....उपोषणाचा आज
चा दूसरा दिवस ... शहरातील विविथ राजकिय संघटणा व व्यापारी संघटनेचा उपोषणकर्त्या कुटुंबीयांना पाठींबा देत आज दूपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली.. ओसवाल परिवारास न्याय न मिळाल्यास संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा व्यापार्यांनी घेतला निर्णय ....सर्वसामांन्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे खोपोली नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे , खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित बांधकाम सभापती समीर मसुरकर , सेक्रेटरी रा.काँ.पा.खोपोली व न्यु. अभिजित मित्रमंडळ अध्यक्ष सत्यजीत देशमुख यांनी आज सकाळी नऊच्या दरम्यान उपोषणकर्त्यांना दिली भेट....सदर इमारतीचा विषय न्यायप्रविष्ट असतानाही पालिकेने भर पावसात इमारतीवर कारवाई केल्याने बेघर झालेल्या चंदनमल मेनमल ओसवाल यांनी आपल्या परिवारा समवेत खोपोली शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर पालिके विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे
Comments
Post a Comment