खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंखे ) :-
अलाना कंपनीने स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्याने तीसर्या दिवसांनी उपोषण मागे... --------------------------------
स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी १६ डिसेंबर पासून आलाना कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले साखळी उपोषण ग्रामपंचायत हद्दीतील १० स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घ्यायचे आश्वासन व्यवस्थापनाने दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मागे घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशी उपोषणाला भेट देवून रुद्रावतार धारण करत आक्रमक पवित्रा घेतल्याने व्यवस्थापनाने नमती भूमिका घेवून १० जणांना तात्काळ नोकरी देण्याचे मान्य केले.
खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला साहेब, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील साहेब, जेष्ठ पत्रकार , संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे यांनी या कामी मोलाची भूमिका बजावल्याने सहा वर्षांनंतर केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं.
यावेळी उपोषण सुरू असताना भेट देवून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, आंदोलनात सहभागी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांचे यावेळी उपोषणकर्यांनी आभार मानले.
हा आपल्या एकजुटीचा विजय असून भविष्यात तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी व आपल्या गावाच्या हितासाठी अशीच एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे...
Comments
Post a Comment