Skip to main content

खोपोली पालिकेच्या शिवसेना नगरसेविका माधवी रिठे यांना मोठा दिलासा ...







    खोपोली (किशोर साळुंके ): खोपोली नगरपालिकेमधील  शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका माधवी रिठे घनकचरा संकलन व्यवस्थापन कामा साठी नेमलेल्या ठेकेदार कंपनीशी व्यावसायिक व आर्थिक संबध आसल्या बाबत खोपोली शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल वाघमारे व मनोज माने यांनी खोपोली न.पा .नगरसेविका माधवी रिठे यांच्या विरुद्ध २०१७ या वर्षात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याच  तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी नगरसेविका माधवी रिठे, संबधित ठेकेदाराशी सदर कामात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे थेठ संबध असल्याचे सांगून महाराष्ट्र नगरपालिका व औद्योगिक १९६५ ,कलम ४४ अन्वये नगरसेविका माधवी रिठे यांना अपात्र ठरविण्याचे आदेश दि. १८/१२/२०२० रोजी देण्यात आला होता. या आदेशाने खोपोली शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. तर रिठे यांनाही जबर हादरा बसला होता. वरिल विषयाची माहिती  रिठे यांना मिळताच  नगरसेविका  माधवी रिठे व त्यांचे पती लक्ष्मण ( तात्या)  रिठे  यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार  महेंद्र थोरवे यांच्याकडे धाव घेत  शिवसेनेचे व मंत्री एकनाथ शिंदे यांची   मुंबई येथील  मंत्रालयात  भेट घेवून आपली सविस्तरपणे बाजू मांडून   १८/12/2020 च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशास तात्पूरती स्थगिती मिळविण्या यश मिळवले असून, पूढील काही महिने रिठे यांचे पद कायम राहिल्याने खोपोली  शिवसेनेच्या गटात उत्हाहाचे वातावर  निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परंतू खोपोली शहरातील जागृत समजलेजाणारे आर.टी . आय कर्यकर्ते पत्रकार अनिल वाघमारे व मनोज माने यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा व वरिल आदेशाचा धसका मात्र ठेकेदारीमध्ये गुंतले असलेल्या  काही  नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांनी घेतल्याचे  समजते...

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...