खोपोली,: प्रतिनिधी - किशोर साळुंखे* * कोरोना काळात सर्वसामान्यांच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक संकटात असताना केंद्र सरकारने स्वयंपाक गॅस सिलेंडर आणि पेट्रोल,डिझेलचे दरवाढ वाढविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या पुढाकाराने रविवार दि.27 डिसेंंबर 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला समोरील पटांगणात चुल पेटवून आंदोलन करीत केंद्र शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
स्वयंपाक गॅस सिलेंडर आणि पेट्रोल,डिझेल दरवाड विरोधातील आंदोलनात पालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेविका वैशाली जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर अध्यक्ष मनेष यादव,युवक अध्यक्ष अतुल पाटील,उपाध्यक्ष संजय गायकवाड,सचिव संदेश कराळे,नगरसेवक नितीन मोरे,सोहन साखरे,महिला उपाध्यक्षा जयश्री डोंगरे,सह सचिव अंजु सरकार,बुथ अध्यक्षा अश्विनी ढोळे, सुभद्रा पगारे,अनिता यादव, शोभा गायकवाड, शारदा सोनावणे, कल्पना संताणे, यासमिन शेख यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
केंद्र सरकारने जिवणावश्यक वस्तुंंची दरवाढ करून सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आणली असतानाच स्वयंपाक गॅस सिलेंडरचे दरवाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणल्याने केंद्र सरकार विरोधात आक्रामक आंदोलन करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment