Skip to main content

खालापूर तालुक्यातील दहागाव संघर्ष समितीच्या मागे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकारी असेल. शेतकऱ्यांवर होणार अन्याय खपवून घेणार नाही : आमदार जयंत पाटील


खोपोली प्रतिनिधी / किशोर साळुंखे 




महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्या


महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास  मंडळाने जमिनी संपादित करताना जो अन्याय खालापूर तालुक्यातील  दहागावाटली शेतकारी वर्गावर  करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला निर्बंध घालण्यासाठी वेळोवेळी विधान  परिषदेत आपण आवाज उठवला आहे आणि त्याचसाठी दहागाव संघर्ष समितीच्या माध्यमातून जो संघर्ष उभा  राहिला त्याला [पाठिंबा देण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचा निर्धार आज शासनाच्या विरोधात खाला

पूर तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चाचे वेळी संबोधित करणाऱ्या तडाखेबाज भाषणातून व्यक्त केला.  आमची संघर्षाची परंपरा आहे. आम्ही सिडकोचा लढा लढलो आणि न्याय मिळवून घेतला. आम्ही सेज विरुद्ध एल्गार पुकारला आणि  त्यात यशस्वी झालो. आता दहा गाव संघर्ष समितीने  पुकारलेला संघर्ष तडीस नेणारच असा विश्वास यावेळी बोलून  दाखवला. ज्यावेळी ज्या जमिनीवर धान्याचा एक कण  पिकत नव्हता  त्यावेळी कवडीमोल भावाने जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या, त्या कित्येक वर्षं ओस पडल्या होत्या मात्र  आज त्या ठिकाणी औद्योगिकरण होत असताना त्याच जमिनीला करोडोंचा भाव आलाय. याची पूर्व कल्पना त्या जमीन खरेदी करणाऱ्या धन दांडग्यांना होती. आता शासनाकडून  मूळ किमतीपेक्षा जो अधिक भाव मिळेल त्यातला ५० % टक्के वाट हा मूळ मालकाला दिला पाहिजे अशी आमची मागणी असेल. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, त्याच सोबत जमिनीचे व्यवहार करताना दलालांची लुडबुड नसावी असं आमचा आग्रह असेल असे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आणि तरुणाना विशेष करून महिलांनी  एकजुटीने राहण्याचे  त्यांनी आवाहन केले. भुसंपादन करण्याकरिता तहसीलदार यांच्या कार्यालयात बैठक न लावता गाव पातळीवर ग्रामसभा घेऊन शासनाची भूमिका पटवून दिली पाहिजे अशी मागणी यावेळी केली. जगातला पहिलया शेतकऱ्यांच्या संपाचे आम्ही जनक आहोत,  त्याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमचे अस्तित्व आहे,  म्हणून आम्हाला  न्याय आणि आणि हक्क कसे मिळवून घ्यायचे याची समज आहे. शासनाने आम्हाला जमेस धरून चालू नये असा खंबीर इशाराही यावेळी त्यांनी दिला. गुण्या  गोविंदाने द्याल तर ठीक अन्यथा आमचे हक्क  कसे प्राप्त करायचे जाण आम्हाला आहे.  आम्ही सद्या सामोपचाराने घेत आहोत म्हणून  मवाळ झालो असा गैरसमज करून घेऊ नये असे त्यांनी प्रतिपादन केले. हि संघर्षांची सुरवात आहे असे सूतोवाचही  त्यांनी केले. 


ठळक मुद्दे  १  : दहागाव संघर्ष समितीचे युवा सदस्य आणि महिला  जमीन आमच्या हक्काची, आमच्या मागण्या मेनी करा अश्या घोषणा देत होते. 

ठळक मुद्दे  २ : मोर्चामध्ये सहभागी झालेलय गावकऱ्यांनी  वारकरी पद्धतीने वारीचे वातावरण निर्माण करताना तिला मृदूंगाच्या थेकायवर भजनांचे गायन केले. 

ठळक मुद्दे  ३ : मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्या नंतर व्यासपीठ म्हणून चक्क बैलगाडीचा झालेला वापर वातावरण निमित्ती करत  होता. 

ठळक मुद्दे  ४ : महसूल आणि पोलीस प्रशासनाले बहुतांशी अधिकारी हे शेतकरी वर्गातले असल्याने मोर्चाकडे पाहण्याचा त्यांचा  दृष्टीकोन सकारात्मक होता.

ठळक मुद्दे  ५ : माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पठिंबा दिल्याचे स्वागत आम जयंत पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...