आरोग्य सहकार संस्था आणि अतुल पाटील मित्रपरिवार आयोजित नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली - किशोर साळुंके
पैसे अभावी रूग्णांची उपचारासाठी गैरसोय होवू नये तसेच तातडीने रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आरोग्य सहकार चँरिटेबल संस्था पुणे जिल्ह्यात सेवाभावी आणि सहकारी तत्वावर काम करीत असतानाच खोपोली शहरातील नागरिकांना सेवा देण्यासाठी अतुल पाटील मित्रपरिवाराच्या सयुंक्त विद्यामाने एन.पी.फार्म येथे मोफत नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीर अयोजित केले होते या शिबीरात खोपोली शहरातील बहुसंख्य नागरिक महिलांनी नेत्रतपासणी केली आहे.
नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी युवा उद्योजक सनी पाटील,एन पी ट्रस्टचे इंद्रसेन घोडके,रमाकांत रावळ,सोहन साखरे,योगेश वाघमारे, विकी पाटील,आरोग्य सहकार संस्थेचे डॉ. शेळके,डॉ. खडसे,शिबिर प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री राहुल सावंत,शहर समन्वयक संदीप कुंजीर उपस्थित होते.नेत्र तपासणी शिबीरात १२० जणांनी नेत्रतपासणी केली असून गरूजांना चष्मे देण्यात आले आहेत.यामधील १५ रूग्णांची नेत्र शस्त्रक्रिया पुण्यातील सुप्रसिद्ध एस.व्ही.देसाई नेत्र रूग्णालयात करण्यात येणार आहे.
आरोग्य सहकार चँरिटेबल संस्था पुणे शहरात गरीब आणि गरजू रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात काम करीत असून कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात देण्याचा संस्थेने काम केले असून चँरिटेबल संस्था कोणत्याही राजकीय बँनरखाली काम करीत नसल्याने खोपोली संस्थेच्या माध्यमातून काम सुरू करण्यासाठी अतुल पाटील यांच्या सहकार्यातून काम सुरू केले आहे.नेत्र तपासणी शिबीरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याबद्दल संस्थेच्या वतीने आयोजकांचे आभार समन्वयक संदीप कुंजीर यांनी व्यक्त केले.
आरोग्य सहकार चँरिटेबल संस्था पुणे जिल्ह्यात सेवाभावी आणि सहकारी तत्वावर चांगले कार्य करीत असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अतुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
फोटो व कँप्शन
Comments
Post a Comment