यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या अपघात प्रवण क्षेत्रातील अति महत्वाच्या टप्प्याच्या क्षेत्रांत येणाऱ्या पळस्पे पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३२व्या रस्ता सुरक्षा सप्ताह २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु योगिता पारधी, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र संजय बारकुंड, पोलीस उपअधिक्षक रायगड विभाग संदीप भागडीकर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस पनवेल विभाग सुदाम पाचोरकर, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर आणि इतर मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
राजिप च्या अध्यक्षा कु योगिता पारधी यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन ही समाजाची गरज असल्याने त्याचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेसारख्या संस्थांनी करणेचे गरजेचे आहे असे प्रतिपादन करताना तहानभूक आणि आपलं आयुष्य विसरून महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस यंत्रणेचे आणि सामाजिक संस्थांचे त्यांनी कौतुक करून आभार मानले. कोरोना काळात लॉक डाऊन मुळे नियंत्रणात आलेले अपघाताचे प्रमाण लॉक डाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढल्याची खंत व्यक्त करताना सर्वानी वाहतुकीचे नियम हे पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणासाठी नव्हे तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी पाळावेत असे कळकळीचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सुरक्षा सप्ताहाची मुदत वाढून ती महिना भर झाल्याचा मुद्दा अधोरेखित महामार्गावर वाहन चालवतांना सुरक्षितता कशी बाळगावी या संबधी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी वाहन अपघात रोखणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव प्र्त्येकानी ठेवावी असे मत व्यक्त केले.अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर यांनी वाहतूक सुरक्षा हा विषय शालेय जीवनापासून विध्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला पाहीजे त्यासाठी अभ्यासक्रमात त्या बाबीचा समावेश झाला पाहिजे असे सांगितले. पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस पनवेल विभाग सुदाम पाचोरकरयांनी देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पळस्पे पोलीस मदत्त केंद्राची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या पोलीस सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. पुजारी यांच्या टीमचे या भव्य आयोजनाबध्दल सर्वानी कौतुक केले. या अपघातप्रसांगीं मदतीला येणाऱ्या देवदूतांचा आणि कोव्हीड काळात मदतीसाठी आलेल्या योद्धयांचा तसेच काही संस्थांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महामार्ग सुरक्षेचे नियम वलयांकित करणाऱ्या जाहिरातीचे यावेळी प्रकाशन करून तीच्या वितरणाचा प्रारंभ केला गेला.
Comments
Post a Comment