प्रजासत्ताक दिना निमित्त सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या वतीने गरीब ,गरजू मुलांना शालेयउपयोगी वस्तूंचे वाटप व विविथ कार्यक्रमाचे आयोजन ..
खोपोली-- (किशोर साळुंके ) प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खोपोली शहरातील सिद्धार्थनगर या गावातील , सामाजिक कार्यात सक्रिय आसलेला सिद्धार्थ स्पोर्ट क्लब या मंडळाच्या वतीने येथील डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये विविथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सिद्धार्थनगर या गावातील शेकडो गरीब व गरजू विद्यार्थ्यांंना वह्या ,बँग,व इतर शालेयउपयोगी वस्तूंचे प्रभाग ३ मधील विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा मोरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.संध्याकाळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये लहान मुलांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांनी महिलांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे व्येक्तिला स्वतंत्र्य ,हक्क ,कायद्याने बहाल करणारा दिवस असून २६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले.डाँ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात भारतातील प्रत्येकाला एकमत देण्याचा अधिकार देवून त्यामताच्या अधारेच प्रजेची सत्ता निर्माण केली आसल्याचे या कार्यक्रमा प्रसंगी नगरसेक किशोर पानसरे यांनी असे आपले विचार मांडत प्रतीवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांंना वह्या वाटप करत सामाजिक बांधिलकी जपणार्या वरिल मंडळाच्या सर्व सभासदांचे पानसरे यांनी कौतुक केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनीही यावेळी आपले विचार मांडत, सिद्धार्थ स्पोर्ट क्लबने केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत उपस्थितीत नागरीक व लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी नगरसेवक किशोर पानसरे,रा.काँ.पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे,भगवान खंडागळे , उद्योजक सुनिल तेलवणे , सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ सोनकांबळे , सौ .उमाताई खंडागळे,सौ. पगारे ,विठ्ठल मोरे, यादव ,किशोर साळुंके व अन्य मान्यवर उपस्थितीत होते
Comments
Post a Comment