2020 ह्या वर्षात जगभर कोरोनाने थैमान घातले होते,आजही संपूर्ण जगावर भीतीचे सावट आहे.नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून आपल्या नेतृत्वाची चमक दाखविणाऱ्या रेकॉर्ड मॅन सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या संकल्पनेतुन व उपक्रम प्रमुख सलीम लोगडे यांनी सहजसेवा फाऊंडेशच्या माध्यमातून 01 जानेवारी रोजी येणाऱ्या वर्षाचे स्वागत करूया अर्थातच नवीन वर्ष सुखाचे जावो या प्रार्थनेतून गीता सुधाकर घारे फाऊंडेशन,पारले बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड,खरसुंडी ,व्हिजन फ्रेश पुणे,सुवर्णा ताई मोरे सामाजिक संस्था,आशियाना ड्रीम होम्स प्रा. लिमिटेड,कोहिनुर टेलिकॉम खोपोली,महेश एजन्सी खालापूर,पद्मावती ट्रेडर्स खोपोली यांच्या सह आयोजनातून यावर्षी कर्जत व खालापूर तालुक्यातील असणाऱ्या विविध शाळेच्या प्रांगणात दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 07.00 वाजता ज्ञान दिवा प्रकाशित ( दीप प्रज्वलीत ) करून येणारे 2021 हे वर्ष आनंदाचे व मांगल्याचे असावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
समाजाप्रति संदेश देणाऱ्या या उपक्रमाची IEA Book of वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.अंधेरी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार स्वीकारण्यात आला.
यासाठी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सुधाकर घारे,कर्जत तालुका गट शिक्षण अधिकारी श्री.संतोष दौंड सर,श्री.किशोर शेळके,अभि ग्रुप देवन्हावे,रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली,खोपोली नगरपरिषद शिक्षण मंडळाचे समनव्य श्री.सुनील पाटील,ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,सद्गुरू ग्राफिक्स,शीतल गायकवाड,सहजसेवा फाऊंडेशनचे सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्ष
श्रीमती माधुरी गुजराथी,महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ.माधुरी शिरोडकर,महाराष्ट्र युवा प्रमुख श्री. गणेश पवार,सचिव
,सौ.वर्षा मोरे,खजिनदार
श्री.संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख
सौ.जयश्री कुलकर्णी,रायगड जिल्हा प्रमुख श्री.सुजित धनगर,रायगड जिल्हा महिला प्रमुख सौ.ज्योती अवघडे,खालापूर तालुका प्रमुख
तौफिक कर्जीकर,खालापूर तालुका महिला प्रमुख सौ.प्रियांका पाटील,कर्जत तालुका प्रमुख श्री.जगदीश दगडे ,कर्जत तालुका महिला प्रमुख
सौ.शर्वरी कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमाच्या माध्यमातून गावाचे,तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे व देशाच्या नावलौकीकात भर पडणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment