किशोर साळूंखे :-
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू होत आहेत. शहरात व ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद विद्यार्थी व पालक देत आहेत. बीड येथील जिल्हा परिषदेची शाळा सुरू होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांना सहजसेवा फाउंडेशच्या माध्यमातून मास्क दिनांक 01 फेब्रुवारी रोजी देण्यात आले.
यावेळी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपक्रम प्रमुख कीर्ती ओसवाल, बी. निरंजन,रायगड जिल्हा परिषद बीड खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जैन व शिक्षक वर्ग, डॉ. थोरात, आरोग्यसेवक श्री.काळे,ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. भाऊ पवार,मयूर मुंढे,लवेश कर्णुक उपस्थित होते.
या उपक्रमासाठी उपक्रम प्रमुख श्री. कीर्ती ओसवाल यांचे विशेष सहाय्य लाभले.रायगड जिल्हा परिषद शाळा बीड खुर्द यांच्या वतीने सहजसेवा फाउंडेशन व शाळेला नेहमीच मदत करणारे लवेश लवेश कर्णुक यांचे आभार मानण्यात आले.
Comments
Post a Comment