Skip to main content






 पाली खोपोली महामार्ग विनफिट कंपनी मे अखेर पुर्ण करणार

.......................................

डायरेक्टर समीर जेधे व शंकर पाटिल यांचे प्रतिपादन

........................................

स्थानिक अनुभवी रवी देवकर यांच्या सारख्या अनुभवी ठेकेदारांमुळे उत्कृष्ट दर्जाचे काम

====================

खोपोली (प्रतिनिधी )-

⭕पाली खोपोली महामार्गचे काम 2016/17 चे काळात मंजूर होऊन सुरु झाले...

⭕साधारण 40 किमी चे काम आहे..

⭕मूळ ठेकेदाराकडून कोरोना काळापर्यंत दोन पोट ठेकेदारांनी काम घेतले..

⭕दोन्ही ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम करत तुकड्या -तुकड्यात काम केले..

⭕त्याचा नाहक त्रास प्रवाशांना व नागरिकांना होत होता...

⭕सरते शेवटी विनफिट टेक्नो इंजिनियर्स प्रा. लि. कंपनीने हे काम हाती घेतले...

⭕20नोव्हेंबर 20रोजी या कंपनीने काम हाती घेतले....

⭕या कंपनीचे डायरेक्टर शंकर औराडे पाटिल व समीर जेधे यांनी सर्व रस्त्याचा सर्वे केला..

⭕सर्व ठिकाणी निकृष्ट व अर्धवट तुकड्यात काम होते....

⭕नदी, नाल्यावरील ब्रिज -मोऱ्या अर्धवट होत्या...

⭕संपूर्ण सर्वे पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली...

⭕आज मितीस 22 किमी पर्यंतचे काम पुर्ण केले आहे...

⭕आता नदी, नाल्यावरील ब्रिज व मोऱ्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु असून ते पुर्ण होताच मे महिन्याच्या अखेर पर्यंत पुर्ण रस्त्याचे काम पुर्ण करून सदर रस्ता सरकार च्या ताब्यात देण्याचा विनफिट कंपनीचा मानस..

⭕काही ठिकाणी स्थानिक विघ्न संतोषी माणसे /नेतेमंडळी कामात अडथळे आणत असल्याने कामात दिरंगाई होते...

⭕कामगारांना त्रास देणे, काम बंद पडणे, मेलटिंग प्लांट बंद करणे असे प्रकार घडतात...

⭕पण सध्या डायरेक्टर आणि इंजिनिअर समजूत घालून काम पूर्णत्वकडे नेण्यात सफल होत आहेत...

⭕रायगड मधिल प्रसिद्ध ठेकेदार रवी देवकर यांच्या सारखे अनुभवी ठेकेदार कंपनी सोबत काम करीत आहेत...

⭕रवी देवकर यांनी शीळफाटा खोपोली ते बोरघाटा पर्यंतचा महामार्गीय रस्ता उत्कृष्ट दर्जाचा बनविल्याने संपूर्ण खोपोली मध्ये त्यांचे कौतुक होत आहे...

⭕त्याच पद्धतीने त्यांनी पाली खोपोली च्या रस्त्याचे काम सुरु केले आहे...

⭕अदय यावत यंत्रणा, मनुष्यबळ,उच्च शिक्षित इंजिनियर, स्पॉट लेव्हल ला काँक्रेट मेलटिंग प्लांट, रस्त्या मधिल चढ खनून सपाठीकरण करणे, पिचिंग, उत्कृष्ठ दर्जाची खडी कॉंकरीट माल, त्यावर गोणी टाकून सतत पाण्याचा फवारा, ब्रिज साठी योग्य असे स्टील -लोखंड याचा वापर, रस्त्याच्या दोन्ही बाजूस 2 मिटर पर्यंत साईड पट्टी माती भराव.. असे उत्कृष्ठ काम सध्या सुरु आहे...

⭕हे काम पाहून स्थानिक नागरिक व प्रशासन खूष आहे..

⭕या संपूर्ण रस्त्यात काही ठिकाणी वन विभाग (फ़ॉरेस्ट)ची जागा येते...

⭕तेथे रस्ता रुंदीकरण, कॉंकरीट करण्यास मज्जाव आहे...

⭕परवानगी मिळालीच तर आहे त्यावरच डांबरीकरण होऊ शकते..

⭕विनफीट कंपनीचे डायरेक्टर शंकर औराडे पाटिल व समीर जेधे यांचा मे महिन्या अखेर सदर रस्ता पुर्ण करण्याचा मानस त्यांच्या कामाची रुपरेषा पाहून पुर्ण होईल अशी अपेक्षा प्रवासी करीत आहेत...

====================

🛑महाराष्ट्र टाईम्स 25 NEWS🛑

✒️मुख्य संपादक ✒️

सचिन यादव

7744093474

✒️कार्यकारी संपादक ✒️

अभिजित दरेकर

9764992525

✒️खोपोली प्रमुख ✒️

किशोर साळुंके

7887741917

====================


Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त