Skip to main content

खोपोली नगरपरिषदे तर्फे शंभर टक्के घरपट्टी /पाणीपट्टी भरणा करणार्या मालमत्ता करदात्यांसाठी ग्रिन कार्ड कर सवलत योजना शुभारंभ सोहळा संप्पन्न .....

किशोर साळुंखे :- 




खोपोली शहराच्या विकासाकरिता  कर भरणा करण्याचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी   केले खोपोलीकरांना  आवाहन ...............      *   खोपोली -- खोपोली नगरपरिषद , नागरिक व  शहरातील काही  व्यापारी यांच्या संकल्पनेतून खोपोली नगरपरिषद घरपट्टी / पाणीपट्टी कर सवलत योजनेचा आज दि.०५/ ०२/ २०२१ रोजी पालिकेच्या नविन इमारतींमधे ग्रिन कार्ड   कर सवलत योजनेचा शुभारंभ सोहळा संप्पन्न झाला.खोपोली शहरातील तमाम करदात्यांना मूलभूत सुखसूविधा देण्याकरता नागरीकांनी कर   लवकरात लवकर  भरणा करण्याचे खोपोली नपाचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी यावेळी  आवाहन करत नागरिकांना पालिकेत येवून वेळ वाया न घालवता  काही दिवसांमधेच  नागरिंकांना घरबसल्याच  आँनलाईन पद्धतीने कर भरणा करण्याची सुविधा सूरु करणार   असल्याचेही या सोहळ्या  प्रसंगी  बोलत होते. शहरातील करदात्यांनी  शंभर टक्के कर भरुन  शहराच्या विकासासाठी  पालिकेला सहकार्य करावे यासाठी खोपोली शहरातील काही सुज्ञ   दूकानदार ,मेडिकल व हाँटेल मालकांनी पूढाकार घेत ०१ /फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत १००%  कर भरणार्या नागरिकांसाठी ग्रिन कार्ड योजनेत सहभाग घेत शंभर टक्के कर भरणार्या मालमत्ता धारकांना वरिल मालकांने आपल्या हाँटेल,दूकानात व मेडिकलद्वारे काही टक्के सवलत दिली जाणार असल्याचे यावेळी जाहिर केले. तसेच ही सवलत सन २०२० ते २०२१ पर्यत लागू असेल ,शहरतील हाँटेल ,दूकाने व मेडिकलमधे खरेदी करणार्या करदात्यांंना  सवलत देणार्या दूकानदार,मेडिकल व हाँटेलांची नावे पूढील,प्रमाणे  कँप्पोलियन क्लब १०%  वरची खोपोली ,साई रिव्हर रिसाँर्ट १०% शिळफाटा ,  श्री . गजानन मेडिकल ५% नेहेरु गार्डन जवळ ,शास्त्रीनगर ,के.एम मेडिकल ०५  ,भाजी मार्केट शिळफाटा , हस्तीमल माणिकचंद मुळगाव 3% ,, एम्पोरिमम खोपोली बाजारपेठ १५% ,शुभम कलेक्शन खोपोली बाजार पेठ,केशरिया क्लाँथ स्टोअर्स शिळफाटा अशी नावे असून या  सोहळ्यात   पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुमन औसरमल , नगरसेवक , नगरसेविका  व शहरातील  मोठ्या संखेने  उपस्थितीत होते. खोपोली शहरातील नागरिकांनी शहराच्या विकासासाठी १००%  टक्के कर भरणा करण्यासाठी पूढाकार घेणार्या व्यापार्यांचा सत्कार  व प्रामाणिक  करदात्यांंचा यावेळी या सोहळ्यात उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ग्रिन कार्डचे वाटप करण्यात आले. पालिकेचे आर्थीक उत्पन्न वाढवून  शहराच्या विकासासाठी  वरिल संकल्पना प्रत्येक्षात उतरवणारे   कर्तव्यदक्ष व दूरदृष्टी ठेवणारे खोपोली पालिकेचे   मुख्याधिकारी गणेश शेटे यांचे सर्व स्थरातून कोतूक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .

. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ

खालापूर तालुक्यातील हाळ गावात आढळले दुर्मिळ खवले मांजर.

किशोर साळुंके-- खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ या गावात दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजाताचे सुमारास, अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर त्यांनी अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याची त्यांची खात्री झाली. हनिफ कर्जीकर यांनी प्राणी मित्र गुरुनाथ साठेकर यांच्याकरवी प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. अभिजित यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे असे सूचित करून खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना या घटनेची माहिती दिली. तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यास समवेत अभिजीत घरत यांना सर्व साधनसामुग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, परंतु हनीफ कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे अधिकारीही येईपर्यंत त