किशोर साळुंखे (खोपोली प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्यातील गरजू व दुर्बल घटकांसाठी सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम... सहज सेवा फाउंडेशन ही समाजासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी आपले कर्तव्य मानून सेवा करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.याच सामाजिक भावनेतून दिनांक 21 मार्च 2021 रोजी रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील सुतारवाडी येथे गीता फार्म याठिकाणी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ऋण काढून लग्न करू नका,विवाह हा आयुष्यभर कर्जात जगण्याचा मार्ग बनवू नका असा संदेश देत बऱ्याच कुटुंबातील पुरुष व महिला काबाडकष्ट करून मुलांना शिकवितात,यात बराच पैसे खर्च होतात,मात्र अपत्यांचे विवाह करताना अनेक वेळा कर्ज काढून विवाह केले जातात. आयुष्यभर हलाखीचे जगून पुढील आयुष्य लग्नात काढलेल्या कर्जातच जगावे लागते. म्हणून सहज विवाह संस्था या मान्यताप्राप्त विवाह संस्थेच्या माध्यमातून सहज सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने समाजातील दुर्बल घटकांच्या अपत्यांचे विवाह ( दोन्ही परिवाराच्या संमतीने )...