Skip to main content

खोपोलीत पार पडणार निशुल्क रजिस्टर विवाह...

किशोर साळुंखे (खोपोली प्रतिनिधी )


रायगड जिल्ह्यातील गरजू व दुर्बल घटकांसाठी सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम...

सहज सेवा फाउंडेशन ही समाजासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. समाजातील विविध घटकांसाठी आपले कर्तव्य मानून सेवा करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.याच सामाजिक भावनेतून दिनांक 21 मार्च  2021 रोजी रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील सुतारवाडी येथे गीता फार्म याठिकाणी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

ऋण काढून लग्न करू नका,विवाह हा आयुष्यभर कर्जात जगण्याचा मार्ग बनवू नका असा संदेश देत बऱ्याच कुटुंबातील पुरुष व महिला काबाडकष्ट करून मुलांना शिकवितात,यात बराच पैसे खर्च होतात,मात्र अपत्यांचे विवाह करताना अनेक वेळा कर्ज काढून विवाह केले जातात. आयुष्यभर हलाखीचे जगून पुढील आयुष्य लग्नात काढलेल्या कर्जातच जगावे लागते. म्हणून सहज विवाह संस्था या मान्यताप्राप्त विवाह संस्थेच्या माध्यमातून 

सहज सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने  समाजातील दुर्बल घटकांच्या अपत्यांचे विवाह  ( दोन्ही परिवाराच्या संमतीने ) रजिस्टर पद्धतीने निशुल्क करून दिले जाणार आहे.

यावेळी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष रायगड भूषण डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्ष इशीका शेलार,खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी.निरंजन, बंटी कांबळे,सहजसेवा रोहा तालुका प्रमुख सचिन साळुंखे हे उपस्थित होते.


सहजसेवा फाउंडेशन ही सामाजिक उपक्रमासाठी IEA BOOK OF WORLD RECORD,

MAHARASHTRA BOOK OF RECORD व INDIA BOOK OF RECORD मध्ये  नोंद असलेली संस्था आहे. 

वरील विवाहाच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या मुख्य कार्यालय असलेलल्या लोहाना भवन,खोपोली येथे  अथवा 8788110739 / 9975492470 या क्रमांकावर  संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या सचिव वर्षा मोरे व जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...