🛑 खोपोली -- शहरातील शिळफाटा येथे पतांजली योगपाठ हरिद्वार निशुल्क योगवर्ग शाखेचा तिसरा वर्धपान दिन शिवसहकार सेनेचे खोपोली शहरप्रमुख ,देशमुख मराठा संघ खालापूर तालुका उपाध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष एकता मित्रमंडळ शिळफाटा येथील हरिश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी हरिश काळे यांनी उपस्थितीतांना योगाबाबत मार्गदर्शन करताना बोलत होते कि , सद्यास्थितीत नागरीकांना वेगवेगळ्या अजाराने ग्रासले असून धावपळीच्या या जगण्यात आपण आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष करत आहोत , आपल्या आरोग्याची काळजी न घेतल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजारांवर मत करण्यासाठी योगा हा रामबाण उपाय असून , शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी लवकरच शहरातील विविध भागातील नगरसेवकांच्या मदतीने संपूर्ण शहरात योगावर्ग सूरु करण्यासाठी मी स्वता पुढाकार घेणार आसल्याचे हरिश काळे यांनी यावेळी सांगितले तर योगाच्या माध्यमातून अनेकांना जिवदान देणार्या त्या प्रत्येक योग गुरुंना उदंड आयुष्याच्या काळे यांनी यावेळी शुभेच्छा देत कर्जत खालापूरचे कार्यसम्राट समजले जाणारे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून खोपोली शहरातील शिळफाटा येथील शिवस्मारकाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे सव्वा कोटीचा भरघोस निधी दिल्याची गोड बातमी दिली. बोरसे सर,अनिल आंग्रे ,सुनिता भोसले, सावंतताई ,योग शिक्षिका यमुनाताई सांडभोर ,सर्व सदस्य व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ.बोरसे मँडम यांनी केले .
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment