खोपोली -- (किशोर साळुंके ) सहजसेवा फाउंडेशनचा सहज साद, सहज साथ कोरोना काळातील अत्यावश्यक सेवेसाठी... सहजसेवा फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सर्वत्र कौतुक ....
खोपोली शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बरेचसे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत व काही रुग्णालयात आहेत.आर्थिक नियोजन असूनही अनेकांचे नातेवाईक वा इतर सोबत कुणीही नसल्याने जेवणाची कुचंबणा होत आहे.सहज सेवा फाउंडेशनच्या मार्फत खोपोली नगरपालिका हद्दीतील अशा रुग्णांना दुपारी व रात्रीच्या जेवणाचे डब्बे त्यांच्या राहत्या घरी अथवा दवाखान्यात संस्थेच्या स्वयंसेवका मार्फत योग्य ती काळजी घेऊन संबधीत ठिकाणी पोहोच केले जातील.जेवणाचा अधिभार हा संबंधित रुग्णाचा वैयक्तिक असेल व सहज सेवेच्या माध्यमातून डब्बे नियोजित ठिकाणी पोहोच केले जातील अशी ही सहजसेवा नि:शुल्क सेवा सूरु करण्यात आली असून वरिल स्तुत्य उपक्रमाबाबत सहजसेवा फाउंडेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तरी नागरिकांनी अधिक माहितीसाठी वा सेवेसाठी 9975492470 / 8788110739 या क्रमांकावर
संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे.
सहजसेवा फाउंडेशन ही मार्च 2020 पासून कोरोना काळात कर्जत व खालापूर तालुक्यात सातत्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. समाजास या सेवेची महत्त्वपूर्ण गरज असल्याचे प्रतिपादन के.ऐम.सी. कॉलेजचे
प्रा.डाॅ.भाऊसाहेब मुरलीधर नन्नवरे सर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment