आम्ही खोपोलीकर यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
खोपोली (किशोर साळुंके)-संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याने रक्ताची गरज वाढत आहे.. याच अनुषंगाने खोपोली मधील तरुण एकत्र आले व आज रक्तदान शिबीर आयोजित केले..
महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज रक्तदान करून अनेक रक्तदात्यांनी अनोखी क्रांती केली..या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालापूर चे तहसीलदार इरेश चप्पलवार, शिवसेना शहर प्रमुख सुनिल पाटिल, माजी उप नगराध्यक्ष राजु गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खोपोली अध्यक्ष अनिल मिंडे तसेच सर्व मित्र पक्षीय नेते, मित्र परिवार, कार्यकर्ते यांनी भेट देऊन सदर पदाधिकारी यांनी उपक्रमाचे कौतुक केले..
सदर आयोजक सदस्य.. महेश काजळे, किशोर साळुंके (पत्रकार), संदेश माने, इंद्रसेन घोडके, तोसीफ शेख, अल्ताफ मान्सूरी, सागर बिरवाडकार, विलास चाळके, महेश गायकवाड, प्रवीण गायकवाड, इरफान शेख, प्रदीप देशमुख, दिनेश जाधव, संजय तन्ना, सतीश येरुणकर, राकेश मिरवणकर, प्रदीप मोरे, निलेश मोडवे, अजय सोनावणे, संदीप कांबळे, आकाश घरडे, k. K. कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली...
Comments
Post a Comment