Skip to main content

खोपोली मनसेच्या वतीने वाफेचे मशिन (स्टिमर) वाटप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस केला साजरा....



 

🌹  खोपोली --( किशोर साळुंके ) शहरातील महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या वतीने आपल्या लाडक्या नेत्याचा म्हणजे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत  खोपोली शहरातील नागरिकांच्या  व खोपोली पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेत १४  व १५ जून रोजी   वाफ घेण्याचे मशिन  (स्टिमर) वाटप करुन राज ठाकरे यांचा वाढदिवस शहरात  साजरा करण्यात आला.कोरोना काळात स्वताची व आपल्या कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा न करता या काळात आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे खोपोली पोलीसांना  वाफेचे  मशिन भेट देण्यात आले. तसेच कोरोनाच्या वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत   लोहाना हाँल खोपोली येथे शेकडो नागरिकांना  वाफ घेण्याच्या मशिनचे वाटप   खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे व  प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्यांच्या हस्ते करण्यात आले. मनसे  खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील  जनतेच्या जिव्हाळ्याचे समजले जाणार्या अनेक  महत्वाच्या प्रश्नांबाबत शहरातील मनसेने  अंदोलने करुन खोपोलीकरांना  द्याय देण्याचा प्रामाणिक  प्रयत्न केला तर    अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवणारे खोपोली मनसेच्या तमाम नेते पदाधीकारी व कार्यकर्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे...

यावेळी शहर संघटक,हुसेनभाई शेख,उपाध्यक्ष तानाजी मालकर ,नाथा पाटील ,इक्बाल शेख ,विभाग अध्यक्ष,सोहेब शेख ,धनंजय अमृते प्रसिद्धी प्रमुख ,उपाध्यक्ष खोपोली शहर मनविसे सचिन गुरसळ .

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...