Skip to main content

सीड बॉलच्या माध्यमातून जंगलात वृक्षारोपण...


खोपोली प्रतिनिधी-- किशोर साळुंके


यंदाच्या पावसाळ्यात सहजसेवेचा आगळा वेगळा उपक्रम.


सहजसेवा फाउंडेशनने यावर्षी सीड बॉलच्या माध्यमातून जंगल भागात वृक्षारोपण करण्याचा अभिनव संकल्प घेतला होता.सहजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात 20 जून 2021 या दिवशी जवळपासच्या जंगल भागात सीड बॉलच्या माध्यमातून नकळतपणे झाडे उगविण्यास मदत करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.झाडाझुडपात यावेळी असंख्य सीड बॉल टाकण्यात आले.

याची सुरुवात विस्तीर्ण जंगल भाग असलेल्या बोरघाटात खालापूर तालुका वनविभाग व महामार्ग पोलीस मदत केंद्र, बोरघाट,दस्तुरी यांच्या मदतीने  करण्यात आली.यावेळी खालापूर तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील, खोपोली वनपाल हिरामण धाकवळ,खोपोली दक्षिणचे वनरक्षक शशिकांत पाटील, आडोशी वनरक्षक शीतल साळुंखे, आत्करगाव वनरक्षक स्वरांजली बांगर, लव्हेज वनरक्षक राजेंद्र बेवनाळे तर महामार्ग पोलीस मदत केंद्र,बोरघाटचे दुय्यम अधिकारी महेश चव्हाण,पो.ह.प्रशांत बोंबे,पो.ना. प्रशांत वर्तक, संतोष बांबळे,रुपेश कोंडे,प्रदीप कोळंबे उपस्थित होते.

यानंतर खोपोली येथील जवळच्या जंगलभागात,याक एज्युकेशन सोसायटीच्या आसपास,बीड जांबरूग येथील जंगलात सीड बॉल टाकण्यात आले.

याखेरीज सातारा,सांगली, कोल्हापूर,नाशिक,पुणे,ठाणे,रत्नागिरी जिल्ह्यातही सहजसेवा फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात आपापल्या जिल्ह्यात भाग घेतला.

चला,कळत नकळत वृक्षमित्र बनुया हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर,कार्यवाह बी.निरंजन,खालापूर तालुका प्रमुख तौफिक कर्जीकर,कर्जत खालापूर तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत खोपडे,कर्जत खालापूर तालुका महिला संघटक निलम पाटील,मंजुळा पाटील,आयुब खान,अर्जुन कदम,दुर्गेश देवकर,तुषार धुमाळ, नकुल देशमुख,मीनल गायकर,निहारीका जांभळे,आस्था गायकर,सन्मिश गायकर,सुप्रिया नांदे, सुचिता पेणकर यांनी परिश्रम घेतले.

याचसोबत नागपूर येथून शीला भागवत,कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मिनी माने,नाशिक जिल्ह्यातील योगेश तकते,सातारा जिल्ह्यातील प्रियांका जाधव,सांगली जिल्ह्यातील सुनिता काळे,सुनिता पाटील,धनश्री चौधरी,इंद्रायणी पाटील,रत्नागिरी जिल्ह्यातील रंजीता ओटारी,

पुणे जिल्ह्यातील सुहास पारसनीस, उषा पारसनीस,शशिकांत पायगुडे यांनी या उपक्रमात भाग घेतला.


 सहजसेवा फाउंडेशन च्या उपक्रमाचे कौतुक करून हरित क्रांती होत असताना पर्यावरणास पूरक झाडे लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन 

खालापूर तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...