मनसेचे इंजिन धीम्या गतीने येऊन सुद्धा पाटलांच्या लोकप्रियतेमुळे अन तरुणाईच्या उत्साहामुळे ताटकळत का होईना पण सुसाट धावलं...!
कर्जत- : कर्जत प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन तसेच डिकसळ ते उमरोली स्वयंचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहळा मनसेचे लोकप्रिय आमदार राजुदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला.आमदार साहेबांच्या लोकप्रियतेची प्रचिती आज सर्व पत्रकारांना दिसून आली मनसेचे इंजिन धीम्या गतीने का येत आहे हा प्रश्न पत्रकारांसकट कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांमध्ये पडला होता.तब्बल दोन अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर आमदार राजू पाटील साहेबांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला दोन तास ताटकळत बसून सुद्धा जमलेल्या कार्यकर्त्यांनमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला (पॉपुलैरिटी) लोकप्रियता काय असते तरुणाई आशा लोकप्रियते मागे का धावते हे आज समजलं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आज कर्जतच्या भूमीत कार्यक्रमा निमित्त येत असल्याचे समजताच जागोजागी कार्यकर्त्यांनी व हितचिंतकानी त्यांचा सत्कार केला लोकांनी एवढ्या मनोभावणेने केलेल्या सत्काराचा स्वीकार करता करता त्यांना कार्यक्रमाच्या सोहळ्याला यायला बराच वेळ लागला तरी प्रत्येकजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होता बऱ्याच तासांच्या नंतर आमदार साहेब आल्याने त्यांना बघण्यासाठी त्यांच्याशी हस्तांदोलन आणि सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांचा घोळका त्यांच्या भवती होता अखेर कार्यक्रम झाल्यावर आपण पुन्हा सेल्फी घेऊ अस सांगत पुढील कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंचाकडे प्रस्थान केले आमदार साहेब मंचावर येताच जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफक देऊन सत्कार केला तसेच कार्यकर्त्यांमधून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या यावेळी जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनीही आपले विचार मांडले त्यांनी स्पष्ट बोलून टाकले आपल्या इंजिनच्या धीम्या गतीने पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे आपण कार्यक्रमासाठी खूपच उशीर केला असो ते आता आम्हाला सर्वांना आमदार साहेबांच्या लोकप्रियतेमुळे कळलं यानंतर आमदार राजू पाटील यांनीही आपले विचार उपस्थितांपुढे व्यक्त केले.तसेच मनसेचे इंजिन धीम्या गतीने का आले ते सांगून दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर कोरोना परिस्थिती, नैसर्गिक वादळे व आपत्कालीन परिस्थिती मध्ये ज्या पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता वेळोवेळो समाजात घडणाऱ्या गोष्टी जनतेसमोर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या अशा पत्रकारांचा आमदार साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वच कर्जत-खालापूर मधील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
तसेच नव्याने सुरू होत असलेल्या डिजी ब्रेकिंग न्यूज पोर्टलचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment