Skip to main content

जेष्ठ निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षलागवड व संवर्धन अभियान.*.







*डिकसळ येथे आमदार  महेंद्र थोरवे यांच्या हस्ते वृक्षारोपण* 


*कर्जत :प्रतिनिधी*

जेष्ठ निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी  प्रतिष्ठानच्या वतीने  वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.सदर कार्यक्रम तातोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी  कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


बैठकीचे जनक व पुज्यनिय दासबोध ग्रंथातून निरूपण करून डाॅ नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्माचे धडे देताना शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली.


त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.  तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांनी आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. काम, क्रोध,लोभ आणि मोक्ष ह्या सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य अर्पण केले.


अशा जेष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना स्मृतिदिनी अभिवादन करताना आमदार  महेंद्र थोरवे , यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नानासाहेबांचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रात नव्हे,जगांनी पाहिले आहे तिर्थरुप आप्पा साहेब व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  आजही बैठकीच्या माध्यमातून पुढे नेत आहे त्याचा वारसा दीपस्तंभासारखा दिशा देण्याचे काम करीत असून त्यांच्या अथांग कर्तुत्वाला सलाम म्हणून कर्जत नगरीत प्रवेश करताना  प्रवेशद्वारावर डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची कमान उभी करून तिचे भूमिपूजन दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या समाजकार्याचा वसा  व प्रबोधनाचे उल्लेखनीय  ऐतिहासिक कार्य करणारे नेतृत्व आहे.आजही प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जातात आजही लाखों श्रीसदस्य  निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करीत आहे समाजासाठी उल्लेखनीय कार्य असून समाज घडविण्याचे व युवा पिढीला दिशा देण्याचे  ईश्वरीय काम  बैठकीच्या माध्यमातून सुरू आहे  असेही आ.थोरवे यांनी सांगितले

 तीर्थरूप नानासाहेबांच्या अथांग कर्तृत्वाला आणि नेहमीच समाजकार्याचे भान राखणाऱ्या अखंड श्री सदस्य परिवाराला नमन करून जय जय रघुवीर समर्थ ! म्हणत तिर्थस्वरूप निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन केले.यावेळी आमदार  महेंद्र थोरवे यांच्या समवेत कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, उप सरपंच भारती पाटील, सदस्य प्रसाद भासे, मंगेश ठोंबरे,कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे, पत्रकार जयेश जाधव आणि मोठ्या प्रमाणात श्री सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चित्ते यांनी केले.सदर वृक्षारोपण कार्यक्रमात श्री सदस्यांनी तातोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे १५० झाडांची लागवड करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...