कर्जत:प्रतिनिधी
आज शुक्रवार दिनांक ०९/०६/२०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत युनिटच्या माध्यमातून अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत स्टेशन मास्टर व SSE P/Way आँफिस मधील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्टेशन मास्टर आँफिस, एस.एस.ई. P/Way, एस.एन.टी, बुकिंग आँफिस, इलेक्ट्रिक आँफिस मधील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांसह जी.आर.पी,आर.पी.एफ आँफिस मधे पेढ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कर्जत सेंट्रल कँबिन येथील कर्मचाऱ्यांना मास्कसह पेढ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महापुरूषांसह संघटनेच्या घोषणांचा जल्लोष करण्यात आला.
या प्रसंगी केंद्रीय चिटणीस मिलिंद शेळके , डिव्हिजन उपाध्यक्ष श्री बाबू सोनावणे, कर्जत युनिट अध्यक्ष कुमार भारत पेमारे, युनिट सचिव विश्वनाथ लदगे खजिनदार केतन धुळे, उपाध्यक्ष श्री रवींद्र मोडक,निलेश पडवळ, अरूण निरगुडा, सदस्य .अरविंद लोभी, निलेश लोभी, गणेश घोडविंदे पंढरीनाथ कोळंबे, श्री निलेश पाटील, रमेश शिंदे, सौरभ पिंपळे, राहूल सरकाटे, निलेश त्रिकोणे, अतुल भोईर, आकाश गवळीकर, रूपेश शिंदे, , धर्मेंद्र गुजर, विलास निकम, मंगेश दभडे इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment