खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि करारी वाटणारा प्रत्येकजण अंतर्मनातून भावुक असतो हे खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर आणि इतर 18 कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभच्या वेळी दिसून आले.
ओठात अडलेले शब्द, पाणावलेले डोळे आणि आठवणींची शिदोरी घेवून बदलीच्या ठिकाणी जाताना जड होणारी पावले असेच काहीसे चित्र खोपोली शहरातील कँपोलिन हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमात होते.
अवघ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात क्षीरसागर यांनी दाखवलेले कर्तुत्व, कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन, कर्तव्यदक्षतेचे दिलेले धडे, बॅडमिंटन हॉलच्या निर्माणातून सर्वांच्या फिटनेसकडे दिलेले लक्ष आणि त्याच सोबत कर्मचारी वर्गाप्रती दाखवलेला विश्वास सर्वांच्या मनोगतातून दिसुन येत होता. खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते सर्वांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.
खोपोली पोलीस ठाण्याच्या दैनंदिन घडामोडींसोबत इतर माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी यावेळी भूषण पाटिल, गुरूनाथ साठेलकर आणि खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. खोपोलीकरानी आणि कर्मचारी यांनी आपल्याला केलेले सहकार्य, दाखवलेला विश्वासच कर्तव्यापलीकडे जावून काम करण्यास प्रेरक ठरल्याचा आशय बदली झालेल्या पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी आपल्या भावपूर्ण भाषणात बोलून दाखवला.
खोपोली पोलीस ठाण्यात काम करतांना गाठीशी जमवलेला अनुभव, सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा आपल्याला खुप पोषक ठरणार असल्याची खात्री सर्वजण देत होते. निरोप समारंभ त्याच सोबत सहभोजन अश्या आयोजनाची संकल्पना पोलीस उप निरीक्षक सतीश आस्वर यांची होती तर सूत्र संचालनातून जगदीश मारागजे यांनी कार्यक्रमाच्या आशयातील भावुकता वाढवली होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment