किशोर साळुंके खोपोली प्रतिनिधी :-
खोपोली,परळी, जांभुळपाडा, लोहाणा महाजन समाजबांधवांच्या वतीने खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरसाठी खोपोली शहरातील लोहाणा समाज हॉल मध्ये रक्तदान शिबीरियाचे आयोजन केले गेले. दरवर्षी राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत रक्तदानाचे शिबीर आयोजित करून आपले देशप्रेम प्रकट करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची परंपरा यंदाच्या स्वातंत्र्य दिनीही जपली गेली. .
कोरोना आणि साथीच्या रोगामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे अनेक संस्थांच्या सहभागातून खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरमध्ये उपलब्ध होणारे रक्त हे स्थानिक स्तरांवर अत्यंत मोलाची भूमिका पार पडत असते. खास करून खोपोलीतील रुग्णांना अशा शिबिरांचा फायदा होतो. या शिबिरात विविध क्षेत्रातल्या मान्यवर आणि रक्तदात्यानी तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.
लोहाणा महाजन समाजाचे शैलेश विठ्लानी, प्रवीण शहा, पंकज विठ्लानी, राजेश आभाणी, मनीष ठक्कर, मनीष विठ्लानी, जयेश आभाणी, दर्श आभाणी,यांनी या शिबिराच्या संपन्नतेसाठी विशेष प्रयत्न केले. खोपोली नगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक किशोर पानसरे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, गोरक्षक हनीफ कर्जीकर यांनी देखील उपस्थिती दर्शवली.
खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .
. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त
Comments
Post a Comment