कर्जत (प्रतिनिधी ):-
संपूर्ण भारतात जल्लोषात ७५ वा स्वतंत्र्य दिन साजरा होत असताना कर्जत तालुक्यातील पळसदरी या गावामधे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहना सोबतच विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाचनालयाचे उद्धघाटन करण्यात आले,सद्यास्थितीत तरुण पिढी मोबाईल व टीव्हीच्या आहारी जावून तरुण वर्ग वाचन संकृती पासून दूर जात असल्याने पळसदरी गावातील जागृत तरुणांनी पूढाकार घेत आपल्या गावातील सुशिक्षित युवा पिढींमधे वाचनाची आवड निर्माण व्हावी या प्रामाणिक उद्देशाने गावातील जेष्ठ मंडळींंच्या मदतीने वाचनालयाचे उद्धघाटन करण्यात आले.सुरु करण्यात आलेले वाचनालय हे मोफत असून या ठिकाणी विविध भाषेतील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध असतील.तसेच पळसदरी गावात वृत्तपत्र येत नसल्याने नव्याने सूरु करण्यात आलेल्या वाचनालयात वृत्तपत्र वाचता यावे यासाठी सहा प्रकारची वृत्तपत्र सुद्धा उपलब्ध करुन दिली जाणार आहेत .वाचनालय सूरु करण्यासाठी गावातील जेष्ठ मंडळींंच्या मदतीने गावातील तरुणांनी पुढाकार घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी गावातील जेष्ठ मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाचनालयाचे उद्धघाटन करण्यात आले.गावातील तरुण वर्गांना वाचनासाठी लागणारी पुस्तके आम्ही उपलब्ध करुन देवू अशी ग्वाही यावेळी ग्रामस्थांनी दिली...
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment