किशोर साळुंके खोपोली :-
कोरोनामुळे सर्व जगाला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजनचे महत्त्व लक्षात आले.वृक्ष हे आपले कुटुंबातील जणू एक घटक आहे.वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत नात्यांची वीण घट्ट करताना ,त्यांचा आदर करून त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडताना वृक्षतोड कशी थांबेल व वृक्षवाढ कशी झपाट्याने होईल,याचा प्रसार करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशन महाराष्ट्रातील विविध शाखांच्या माध्यमातून किंवन 10000 वृक्षांना रविवार 22 ऑगस्ट रोजी अर्थातच रक्षाबंधन च्या दिवशी झाडांना राखी बांधून वृक्षावर असणाऱ्या प्रेमाचे नाते दृढ करण्याचा संकल्प करणार आहेत.
या निसर्ग चळवळीत आवड असेल त्यांनी नक्कीच सामील व्हा, असे आवाहन सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा श्रीमती माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा सौ. इशिका शेलार, सचिव सौ. वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर,कार्यवाह बी. निरंजन व जनसंपर्क प्रमुख सौ. जयश्री कुलकर्णी यांनी केले आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment