खोपोली =किशोर साळुंके )
सहजसेवा फाउंडेशन ही समाजाप्रती जागरूक आलेली सामाजिक संस्था, समाजकार्यातून प्रभावी संदेश देणारे उपक्रम राबविण्यात संस्था अग्रेसर असते. मनापासून वेळ देणारे सहकारी असल्याने या वर्षभरात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात संस्था वेगाने वाढत आहे.
कोरोनामुळे सर्व जगाला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजनचे महत्त्व लक्षात आले.वृक्ष हे आपले कुटुंबातील जणू एक घटक आहे.वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत नात्यांची वीण घट्ट करताना ,त्यांचा आदर करून त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडताना वृक्षतोड कशी थांबेल व वृक्षवाढ कशी झपाट्याने होईल,याचा प्रसार करण्यासाठी सहजसेवा फाउंडेशनने महाराष्ट्रातील विविध शाखांच्या माध्यमातून जवळपास 12000 वृक्षांना रविवार 22 ऑगस्ट रोजी अर्थातच रक्षाबंधनच्या दिवशी झाडांना राखी बांधून वृक्षावर असणाऱ्या प्रेमाचे नाते दृढ करून समाजास आगळावेगळा संदेश दिला आहे.
निसर्ग चळवळीत आवड असेल त्यांनी नक्कीच सामील व्हा,या आवाहनाला साथ देऊन संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागासाठी मुंबई शहरातून कल्याणी आपटे,मुंबई उपनगर येथून डॉ.अलका नाईक,ठाणे जिल्ह्यातून सीमा घिजे, रायगड जिल्ह्यातून जयश्री गावंड,रत्नागिरी जिल्ह्यातून दीक्षा माने,सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्वाती पाटील,नाशिक विभागातून
नाशिक जिल्ह्यातील कविता जाधव, भाग्यश्री महाजन,धुळे जिल्ह्यातून रसिका दोशी,नंदूरबार जिल्ह्यातुन सुनीता शाह,जळगाव जिल्ह्यातून स्मिता भिवसने,अहमदनगर जिल्ह्यातून अर्चना तांबे,पुणे विभागातून पुणे जिल्ह्यासाठी माधुरी गुजराथी,ॲड आरती सोनाग्रा,
सातारा जिल्ह्यासाठी प्रियांका जाधव,
सांगली जिल्ह्यासाठी प्रतिभा पाटील,
कोल्हापूर जिल्ह्यासाठी पद्मिनी माने,
सोलापूर जिल्ह्यासाठी जयश्री पाटील, तर औरंगाबाद विभागातून औरंगाबाद जिल्ह्यासाठी उज्वला शिंदे,हिंगोली जिल्ह्यासाठी सुनंदा वाघमारे,बीड जिल्ह्यासाठी अर्चना सानप,नांदेड जिल्ह्यासाठी विजया कोचा,उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सौ.उज्जवला कांबळे,लातूर जिल्ह्यासाठी स्मिता लातूरकर,
तर अमरावती विभागासाठी अमरावती जिल्ह्यातुन कविता उंबरे,
बुलढाणा जिल्ह्यातुन राजश्री माने,अकोला जिल्ह्यातुन सुनंदा सोनावणे,नागपूर विभागासाठी
नागपूर जिल्ह्यातून स्नेहल भागवत,
चंद्रपूर जिल्ह्यातुन मेघा रामगुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाडांना राखी बांधण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा श्रीमती माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा सौ. इशिका शेलार,सचिव सौ.वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर,कार्यवाह बी.निरंजन व जनसंपर्क प्रमुख सौ. जयश्री कुलकर्णी,आयुब खान, बंटी कांबळे, आफताब सय्यद,उपक्रम प्रमुख ॲड.आरती सोनाग्रा यांनी परिश्रम घेतले.
संपुर्ण राज्यातून या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळालाआहे,निसर्गाप्रति समाजात आदरयुक्त भावना निर्माण होण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध निसर्गपुरक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन उपक्रम प्रमुख
ॲड.आरती सोनाग्रा यांनी केले आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment