यंदाच्या पर्यटन मोसमात वीक एन्ड आणि हॉलीडेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात खालापूर तालुक्यात दाखल होत असताना नदी, तलाव, धबधबे त्याच प्रमाणे धरणात बुडून होणाऱ्या पर्यटकांच्या मृत्यूला आळा घालण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून पर्यटकांसाठी जिल्हा बंदीचे निर्देश दिले होते. पर्यटनावर बंदी आणि अतिवृष्टीने हाहाकार उडालेला असूनहा पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथून बेधुंद पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे निर्बंध जुगारत पर्यटनाचा असुरी आनंद घेताना दिसले, परिणामांती अनेक पर्यटकांना जीवाशी मुकावे लागले.
पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनेने व्यथित झालेल्या खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी असे दुदैवी अपघात घडूच नयेत म्हणून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या कार्यकारिणीसोबत याबाबतीत उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करून तातडीने उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या परवानगीने अपघात प्रवण क्षेत्रांत पोलीस कर्मचारी नेमन्याचा, दंडात्मक कारवाई करण्याचा आणि संबंधित विभागातील पोलीस पाटील यांना सतर्क ठेवण्याचा निर्णय घेतला. या उपाय योजनांच्या अनुषंगाने खालापूर पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात येणाऱ्या चौक आणि वावोशी पर्यंतच्या हद्दीत पर्यटकांना येण्यासाठी मज्जाव केला गेला. पोलीस यंत्रणेकडून अवलंबलेल्या कार्यवाहीमुळे साधारणपणे मागील दोन आठवड्याचे वीक एन्ड आणि महत्वाच्या सुट्ट्यांच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पर्यटकांच्या उत्साहाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपायांमुळे मृत्यूला रोखण्यात यश आल्याचे समाधान पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त करत अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने आपण दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न कारणात आहोत असे प्रतिपादन केले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment