अलिबाग -: तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अचानक बदली करण्यात आली. यानंतरही त्या जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नाला लागल्या होत्या. तशी चर्चा प्रशासनातही होती. मात्र आता कल्याणकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर यातील स्पर्धा संपली.जिल्हाधिकारी पद सांभाळताना निधी चौधरी यांचे स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद हेते. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी चौधरी यांचे अनेकदा खटके उडाले होते.
नियोजन मंडळाच्या निधी वाटपाच्या मुद्यावर पालकमंत्र्यांचे त्यांच्याशी चक्क भांडण झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच्या वितुष्टानंतर त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. नव्याने डॉ. कल्याणकर याच्याकडे पदाची सूत्रे त्यांनी सोपवली. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता. ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच त्यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शासकीय सेवा, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, पीक कर्जवाटपात केलेली लक्षणीय वाढ यासह काही महत्वाकांक्षी योजनांची उत्तम अंमलबजावणी केल्याने प्रशासनाने त्यांना गौरवण्यात आले होते. रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी मंगळवारी सकाळी मावळत्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.
जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून केलेली कामे, शासकीय जत्रेसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून एकाच ठिकाणी केलेले काही लाख दाखल्यांचे वाटप, जिल्हा प्रशासनाचे पहिले कौशल्य विकास केंद्र, सर्वाधिक पेसा गावांसाठी केलेले प्रयत्न या कामांची दखल घेऊन हा विशेष गौरव करण्यात आला होता. ठाणे येथे जिल्हा प्रशासनाचे कौशल्य विकास केंद्र सुरू करून त्यांनी इतर जिल्ह्यांसमोर आदर्श ठेवला होता. या केंद्रातून अनेक गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांमुलीनी प्रशिक्षण घेतले व त्यांना नोकर्याही लागल्या होत्या. ठाण्यातच जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एक दिवसभरासाठीच्या सर्वात मोठे नेत्र चिकित्सा शिबिर त्यांनी आयोजित केले होते , या शिबिरात विशेषत: ग्रामीण भागातून शेकडो नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली होती. शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला 'डिजिटल चॅम्पियनशिप' डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली. याशिवाय अनधिकृत रेती उत्खनन करणार्या रेतीमाफियांवर सडेतोड कारवाई करून राज्यात सर्वाधिक दंड वसुली त्यांनी करून दिली होती
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment