खोपोली (किशोर साळुंके ):खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. यासाठी या कंपन्यामध्ये नोकरीत व ठेकेदारी मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळावे व दहा वर्षावरील मोठी वाहने पुन्हा सुरु करावीत यासाठी शिवसेना आवजड वाहतूक सेना यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील विविध कंपन्यामध्ये निवेदन देण्यात आले.
*शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* व *युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री मा.श्री आदित्य ठाकरे* यांच्या सूचनेनुसार व *शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. इंद्रजीत सिंह बल ,महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री. नरेश भाई चाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. बॉबी भाटिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री. संदीप बाबू मोरे व रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा पाटिल* यांच्या मार्गदर्शनानुसार *शिवसेना अवजड वाहतूक सेना खालापूर तालुका* यांच्यावतीने *टाटा स्टील. बी.एस.एल ला स्थानिक रोजगार भरती व 10 वर्षा पुढील वाहणे चालू करावी व M G L कंपनी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग* व *कार्यसम्राट आमदार मा.श्री.महेंद्रशेठ थोरवे* यांना निवेदन आले.
त्यावेळी *नगरसेवक कु.संकेत भासे* *शिवसेनाअवजड वाहतूक सेना खालापूर तालुका अध्यक्ष कु.रुपेश संभाजी बैलमारे* व *उप तालुका संघटक कु.जयेशभाई पाटील* *तालुका उपाध्यक्ष मोहन अरमान, तालुका उपसचिव अभिजीत दरेकर तालुका उपाध्यक्ष शाहिद शेख खोपोली शहरसचिव हुसेन शेख* पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते......
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment