Skip to main content

खोपोली शहरात अत्याधुनिक कुस्ती संकुलाचे निर्माण

खोपोली प्रतिनिधी-- (किशोर साळुंके )राजू कुंभार यांनी साकारले "कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल". कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे दि.29 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साधून उद्घाटन आणि क्रीडा शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. संकुलाचे उद्घाटन रायगड भूषण आणि रायगड केसरी सन्माननीय प्रकाश हातमोडे आणि गोदरेज आणि बॉईस कंपनीचे प्रबंधक तानाजी चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानीय क्रीडा अधिकारी संदिप वांजळे, छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर ,दत्तात्रय पालांडे, कर्जत तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे, सुभाष घासे, दिलीप देशमुख, गुरूनाथ साठेलकर, सुनील नांदे,एकनाथ कुरळे,दिनेश मरागजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. या संकुलाची निर्मिती करणाऱ्या राजू कुंभार यांनी कुस्ती या क्रिडाप्रकारात विषेश करून महिला खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळी पासुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणार असल्याचे आणि यापूर्वीपासुन सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगत कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या आशीर्वादाने दैदिप्यमान यश संपादन करु असा संकल्प व्यक्त केला. रायगड भुषण तथा रायगड श्री प्रकाश हातमोडे यांनी क्रिडा संकुलाची स्वबळावर निर्मिती करणाऱ्या राजू कुंभार यांचे कौतुक करताना त्यानी महिला कुस्ती पटू घडविण्याचा जो ध्यास घेतला आहे त्यासाठी शुभेच्छा देत आपलंही सदैव सहकार्य असेल असे प्रतिपादन केले. या प्रसंगी तानाजी चव्हाण साहेब आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपाच्या आयोजनात काही प्रदर्शनीय कुस्त्यानी रंगत आणली तर क्रिडा शिक्षकांचा यथोच्छ गौरव करण्यात आला. सूत्र संचलनाच्या माध्यमातून संकुलाचे उद्दिष्ट, निर्मितीसाठी आलेल्या अडचणी, ज्यांनी ज्यांनी केलेले सहकार्य, त्याच सोबत क्रिडा शिक्षकांचा तसेच खेळाडूंचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न जगदीश मरागजे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री भरत शिंदे हयांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कुस्तीची प्रात्यक्षिकं करण्यात आली. राजू कुंभार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातून अभूतपूर्व यश संपादन करण्याचा निर्धार प्रत्येकाने केलाय. दररोज सायंकाळी कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात महिला व बाल कुस्तीगीराना क्रिडा अधिकारी तथा राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती राजू कुंभार यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...